पोलिसांना घाबरून हर्शेल गिब्स भारतात खेळायलाच यायचा नाही…

हर्शेल गिब्ज हे नाव आपल्या ध्यानात राहतं ते त्याने मारलेल्या ६ सिक्सर्ससाठी. युवराज सिंग, रवी शास्त्री यांच्या ६ सिक्सर्सच्या यादीत त्याने स्थान मिळवलं. या ना त्या प्रकारे हर्शेल गिब्ज कायम चर्चेत असायचा. तो खेळायचाही जबरदस्त आणि क्रिकेट हा एन्जॉय करायचा खेळ आहे असं त्याच मत असायचं. पण आजचा किस्सा जरा वेगळाय. या मध्ये मधली बरीच वर्ष हर्शेल गिब्ज भारतात खेळायला येत नसायचा.

तर त्याच झालं असं कि १९९९-२००० साली साऊथ आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. हा दौरा जास्त स्पेशल का आहे याचं कारण अनेक क्रिकेट रसिकांना ठाऊक असेल. या सिरीजमुळे भारतात जो धुमाकूळ झाला होता तो इतर कुठल्याही देशात झाला नव्हता. सिरीज खेळायला म्हणून आलेला आफ्रिका संघ भारताला गोत्यात आणून माघारी गेला.

साऊथ आफ्रिका आणि भारतीय संघात खेळवल्या जाणाऱ्या या सिरीजमध्ये एक मोठी गडबड झाली होती. ७ एप्रिल २००० साली दिल्ली क्राईम ब्रान्चचे अधिकारी ईश्वर सिंग रेधू यांना बातमी मिळाली कि एका रेकॉर्डिंग नुसार आफ्रिकेचा हॅन्सी क्रोनिए मॅच फिक्सिंगबद्दल बोलतो आहे. संजय चावला हा त्याकाळचा कुख्यात आणि प्रसिद्ध सट्टेबाज होता.

हॅन्सी क्रोनिए आणि संजय चावला यांच्यात झालेल्या रेकॉर्डिंगमध्ये असं आढळून आलं कि या मॅच फिक्सिंगमध्ये अजून ३ आफ्रिकन खेळाडू आहे.

ते तीन आफ्रिकन खेळाडू होते हर्शेल गिब्ज, निक्की बोजे आणि पीटर शॅडोन यात सामील आहे. ह्या घटनेमुळे हि सिरीज राहिली बाजूला आणि हेच प्रकरण सगळीकडे चर्चिलं जाऊ लागलं.

जेव्हा हि बातमी जगभर पसरू लागली तेव्हा मात्र आपल्या खेळाडूंना वाचवण्यासाठी आफ्रिकन बोर्डाने स्पष्टीकरण दिलं कि आफ्रिकन खेळाडूंची यात काहीच चूक नाही त्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावं. पण हॅन्सी क्रोनिएने प्रामाणिकपणे कबूल केलं कि त्याने मॅच फिक्सिंगसाठी पैसे घेतले होते. एका नामवंत बुकीकडून त्याने १५ हजार डॉलर स्वीकारले होते.

आता माफी मिळेल म्हणून क्रोनिए शरण गेला आणि त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आलं. बीसीसीआयने पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करायला लावली कि कोणी भारतीय प्लेयर तर यात सामील नाही ना ! पण इथं तर वेगळाच गेम झालेला होता. मनोज प्रभाकर सगळ्यात आधी यात सापडला आणि त्याच्यावर क्रिकेट बॅन लागला.

हर्षेल गिब्जने या प्रकरणाबद्दल सांगितलं कि नागपूरमधल्या ५ व्या वनडे सामन्यात २० पेक्षा कमी धावा करणे आणि बॉलिंगमध्ये भरपूर रन देणे यासाठी १५ हजार डॉलरची मला विचारणा करण्यात आली होती.

पण हर्शेल गिब्ज हा स्वतःच्याच धुंदीत खेळणारा प्लेअर होता. त्याने त्या मॅचमध्ये ५३ चेंडूत ७४ धावा तडकावल्या.

हॅन्सी क्रोनिएने अझरुद्दीनच नाव घेत सांगितलं कि अझहरने तिसऱ्या टेस्टच्या वेळी एका बुकीशी माझी ओळख करून दिली होती. हॅन्सी क्रोनिएने देखील आपली कबुली दिली. पण एका विमान अपघातात तो मृत्युमुखी पडला. या घटनेनंतर भारतात पोलिसांनी सूत्र हलवली यात मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, नयन मोंगिया, मनोज प्रभाकर हे दोषी सापडले. गिब्जला या प्रकरणात ६० हजारांचा दंड ठोठावला गेला.

हे प्रकरण इतकं चिघळलं होतं कि जगभरातून भारताला शिव्या पडत होत्या. हर्शेल गिब्ज मात्र साऊथ आफ्रिकेत गेला आणि ज्या ज्या वेळी भारताविरुद्ध मॅच असायची तो भारतात येत नसायचा. यात मुख्य कारण होतं कि त्याला भीती वाटायची कि जर आपण भारतात गेलो तर पोलीस आपल्याला पकडतील आणि परत क्रिकेट खेळायला मिळणार नाही.

असं बराच काळ चाललं. पुढं आयपीएल सुरु झालं, सिझन थेट साऊथ आफ्रिकेत खेळवला गेला. त्यावेळी गिब्ब्ज डेक्कन चार्जर्स हैद्राबाद या संघाकडून बरेच सामने खेळला. त्या सिझन मध्ये त्याने चांगली कामगिरी देखील केली. तिथून पुढे मात्र त्याच धाडस वाढल आणि तो भारतात येऊ लागला. तोवर भारतातील मॅच फिक्सिंगच वादळ शांत झालं होतं. गिब्ज देखील मॅच फिक्सिंगशी आपला काहीही संबंध नाही हेच तो दाखवत आला. साधारण २०१२ पर्यंत तो आयपीएल खेळला.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.