इंग्लिश खेळाडूंना वाटायचं,” अझरच्या गळ्यातल्या ताबिझमधली काळी जादू त्याच्या मनगटात उतरलीय”

मोहम्मद अझरुद्दीन च्या आयुष्याइतके टर्न आणि ट्विस्ट अपवादानेच कोणाच्या आयुष्यात असेल. अगदी क्रिकेटच्या पदार्पणापासून कौतुक आणि टीकेच्या गोत्यात अझरुद्दीन अडकत राहिला. त्याच्या मनगटात जी जादू होती ती इतर कुणातही नव्हती. पण आयुष्यात घडलेल्या घटनांनी मनगट वाचलं मात्र जादू निघून गेली असा प्रकार म्हणावा लागेल.

९०च्या दशकाची सुरवात झाली होती. मोहम्मद अझरुद्दीन काळ्याभोर मिश्या, गळ्यात कायम लटकत राहणार तावीज, मनगटाचा वापर करून  कुठल्याही बॉलला तो कुठल्याही दिशेला मूव्ह करून टोलवायचा. त्याच्या हातात विलक्षण जादू होती.

क्रिकेटमध्ये रस असल्याने तो क्रिकेटच्या पुरता प्रेमात होता मात्र पुढे काही वादळी घटनांनी त्याच आयुष्यच बदलून गेलं. पत्नीला दिलेला घटस्फोट, मॅच फिक्सिंग आणि सचिन तेंडुलकर बरोबर झालेले वाद, संगीता बिजलानी प्रेमप्रकरण अशा अनेक गोष्टींच्या जाळ्यात अझहर अडकत राहिला.

१९९६ च्या वर्ल्डकपला जेव्हा तो मैदानावर उतरायचा त्यांच्याइतका रुबाबदार खेळाडू दुसरा कोणी नव्हता. फिल्डिंग करताना ज्या चपळाईने तो बॉल फेकायचा त्याच्या दहशतीने बॅट्समन रन काढायला धजावायचा नाही. त्याच्या मनगटी जादूने ऑफ स्टॅम्पवर आलेला चेंडू इतर खेळाडू कव्हरला शॉट मारायचे पण अझरुद्दीन फ्लिक करून मिड ऑन किंवा मिडविकेटला चेंडू टोलवायचा.

सुरवातीला बँकेत नोकरी करणारा अझरुद्दीन क्रिकेटकडे वळला. इंग्लंडचा संघ ज्यावेळी भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा तीन धमाकेदार शतक ठोकले होते, त्याचा हा भीमपराक्रम पाहून क्रिकेट समीक्षक अवाक झाले होते. जॉन वुडकॉक ने तर विधान केलेलं कि इंग्लंडच्या खेळाडूंकडून अझरुद्दीनसारख्या खेळाची अपेक्षा करणं हाच सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे.

अझरुद्दीनचा खेळ पाहून त्याची तुलना गुंडाप्पा विश्वनाथ , जहीर अब्बास,ग्रेग चॅपल यांसारख्या दिग्गज लोकांशी होऊ लागली, माईक गेटिंग म्हणाला होता कि जेव्हा अझरुद्दीन बॅटिंगला यायचा तेव्हा त्याच्या गळ्यात असलेली ती काळी गोष्ट जेव्हा आम्हाला बाहेर आलेली दिसायची तेव्हाच आम्हाला वाटायचं कि आता आपली टीम मुश्किलीत अडकणार आहे.

ती काली गोष्ट म्हणे अझरच्या गळ्यातली तावीझ होती. त्याला बघून फॉरेनच्या प्लेयर्सना वाटायचं ती तावीझ अझर च्या मनगटाच्या खेळीमागची काळी जादू आहे..

ज्या ज्या वेळी फलंदाजीत मनगटाचा सर्वोत्कृष्ट वापर जर कोणी केला असेल तर तो म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन अशी विधान त्यावेळी लोक करू लागले.

भारतीय संघाचा ज्यावेळी कठीण काळ आला तेव्हा १९९० मध्ये अझरुद्दीनला कर्णधारपद देण्यात आलं. १९९१ साली अझरुद्दीनची निवड विजडन क्रिकेटर ऑफ द इअर म्हणून झाली त्यावेळची त्याची लोकप्रियता हि तत्कालीन मुख्यमंत्रांपेक्षा अधिक होती.

सुरवातीच्या काळात धार्मिक असलेला अझरुद्दीन पुढे त्याच्या करियरचा ग्राफ ढासळू लागला. त्याच्या आयुष्यात संगीता बिजलानी आल्यानंतर त्याच्या क्रिकेटवर हा परिणाम दिसून आला. याच सगळं खापर बिजलानीवर फोडण्यात आलं.

वर्ल्ड कपच्या वेळी सगळ्यात उत्तम फिल्डर म्हणून त्याची ओळख होती. सेमीफायनलमध्ये त्याने चामिंडा वासला धावबाद केलेला थ्रो आजही उत्कृष्ट मानला जातो पण त्यानंतर बॅटिंगमध्ये त्याने ज्या तर्हेने आपली विकेट दिली त्यावरही बरीच चर्चा झाली.

त्याच्यावर फिक्सिंगचा ठपका ठेवण्यात आला, संघातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते आणि यात सगळीकडून अझरुद्दीनकडे बोट दाखवण्यात आलं होतं. परिणामी अझरुद्दीनच कर्णधारपद काढून घेऊन सचिनला देण्यात आलं. सचिनच्या कॅप्टन्सीमध्ये खेळताना त्याच्यात गर्विष्ठपणा आला होता आणि तो कायम म्हणायचा कि सचिनमध्ये कर्णधार बनण्याची क्षमता नाही.

अगदीच चांगल्या वाईट काळाचा सामना अझरुद्दीनने केला, एक चुकीचा शॉट आणि एक चुकीचा निर्णय याचं उत्तर अझहरपेक्षा दुसरं कोण सांगू शकेल. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याच्यावर प्रचंड टीका झाली, पाकिस्तानकडून खेळतो पासून ते धार्मिक गोष्टींपर्यंत त्याच्यावर चर्चा झाली. २००० साली अझरुद्दीनवर बीसीसीआय आणि आयसीसीने कायमची बंदी घातली.

हे हि कमी होतं म्हणून तो निवडणूकही लढला तिथेही तो यशस्वी ठरला. सिद्धू सोबत त्याच वादाचं प्रकरण असो किंवा त्याच्या लव्ह अफेअरच्या गप्पा यात सगळीकडे अझरुद्दीन दोषी ठरत गेला. त्याच्यावर ज्यावेळी चित्रपट बनवण्याचं एकता कपूरने ठरवलं तेव्हा तीसपेक्षा जास्तवेळा त्याला पटवण्यातच त्यांचा वेळ गेला, चित्रपटाच्या लॉन्चिंग वेळेस तो म्हणाला होता ,

भाई जान अब बहुत कमी चाहनेवाले बचे हे मेरे पास. लोग कहते हे मियाँ फिल्डिंग बडी उमदा करते थे आप, मै केहता हू खाकसार नफिस बल्लेबाजी भी कर लेता था कभी.

इतक्या प्रकरणात त्याचा सहभाग आणि नाव होतं. पण शेवटी तेच झालं कलाई तो बचाली मगर जादू टूट गया…….

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.