अदानीनंतर हिंडेनबर्गचं टार्गेट जॅक डॉर्सी….पण जॅक नक्की कशात घावलाय ?

अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने आज सकाळीच एक ट्विट केलं आणि एक मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केलेलं. अदानी समूहावर हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे अदानी ग्रुपच्या बाजार मूल्यापैकी $१०० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते, त्याच्या दोन महिन्यांनी हिंडेनबर्गचा अहवाल आलाय. 

त्यामुळे सकाळपासून सोशल मीडियावर हिंडेनबर्गच्या निशाण्यावर अदानी नंतर आता कोण असेल याची चर्चा सुरु होती. 

तेवढ्यात सायंकाळी हिंडेनबर्गने ट्विट करत खुलासा केला. या खुलाश्यात ट्विटरचे ट्विटरचे संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डॉर्सीचं नाव आलं. हिंडेनबर्गने जॅक डोर्सीच्या पेमेंट कंपनी ब्लॉक इंकबद्दल मोठा खुलासा केला आहे. हिंडेनबर्ग यांनी ट्विटरवर तपशीलवार दस्तऐवज अपलोड केलेत – 

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात सांगितलं कि, डॉर्सीने ब्लॉक इंकच्या युजर्सची संख्या वाढवून सांगितली आहे. इतकंच नाही तर ब्लॉक इंक कंपनीने युजर्सची एक्वीजिशन कॉस्ट देखील कमी दाखवली आहे.  तसेच ब्लॉक इंकने पेमेंट फर्म ब्लॉकमध्ये हेराफेरी केल्याचेही आरोप झालेत. 

हेच आरोप दाखवून देण्यासाठी हिंडेनबर्गने २ वर्षांच्या संशोधनाचा हवाला दिला.

हिंडेनबर्गने २ वर्षांचा काळ देऊन, रिसर्च करून निष्कर्ष काढला की जॅक डोर्सी आणि जेम्स मॅककेल्वे यांनी ब्लॉक इंकच्या माध्यमातून पद्धतशीरपणे कोविडच्या काळात कंपनीचे शेअर्स वाढल्यानंतर एकत्रितपणे $१ अब्ज पेक्षा जास्त स्टॉक विकले होते. यावर रॉयटर्स एजन्सीने ब्लॉकला जाब विचारला होता मात्र जॅकने अजूनही त्याबाबत उत्तरं दिलेलं नाहीये. 

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जॅक डोर्सीने ५ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य उभे केले आहे.  ब्लॉक इंकने टेक्नॉलॉजीच्या मदतीने मोठा घोटाळा केला आहे. तसेच, कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार ४० ते ७५ टक्के खाती बनावट आहेत. एकाच व्यक्तीशी संबंधित हे सर्व खाते आहेत. कंपनीने सतत गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आहे, असंही हिंडेनबर्गनं सांगितलं आहे.

या अहवालानंतर व्हायचं तेच झालं Hindenburg अहवाल बाहेर आल्यानंतर Block Inc. चे शेअर्स २० टक्क्यांपर्यंत घसरले. शेअर्स पडल्याने जॅकच्या कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये ब्लॉकचे शेअर्स १८% घसरले. ऑर्टेक्स डेटानुसार, २२ मार्चपर्यंत ब्लॉकचे सुमारे ५.२% फ्री फ्लोट शेअर्स कमी होते. 

जो फटका अदानींना सहन करावा लागला तीच वेळ जॅक च्या कंपनीवर येऊ शकते. २४ जानेवारी २०२३ रोजी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाचे शेअर्स कमी केले होते. रिसर्च रिपोर्टमध्ये अदानी समुहावर स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा ठपका ठेवत अहवाल जारी करण्यात आला होता. 

संशोधन अहवालात अदानी ग्रुपच्या मोठ्या थकीत कर्जाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता, त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली होती. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.