बाबा राम रहिमची लाडकी ‘मानसकन्या’ हनीप्रीत त्याची गादी चालवणार का ?

बाबा राम रहीम आठवतोय का ? डेरा सच्चा सौदा चा प्रमुख जो बलात्काराच्या आणि खुनाच्या गुन्ह्यामुळे जेलची हवा खातोय, पण त्याच्या जेलमध्ये जाण्यानंतरही एक व्यक्ती मात्र खूप चर्चेत आली होती ती म्हणजे त्याची मानलेली मुलगी. हनीप्रीत उर्फ प्रियांका तनेजा.

हनीप्रीत पुन्हा चार्चेत येण्याचं कारण कि ती म्हणे आता बाबा रामरहीम चा वारसा पुढे चालवणार आहे.

सध्या गुरमीत राम रहीम कोरोनाच्या आजाराशी तोंड देतोय त्यामुळे त्याला तुरुंगातून थेट त्याला रोहतक च्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आहे, शिवाय त्याला दररोज भेटायला जाणारी त्याची मानसकन्या हनीप्रीत सध्या मीडियात चर्चेत आहे.

१६ वर्षाची असतांना प्रियांका राम रहीम च्या डेरया मध्ये आली होती आणि इथलीच होऊन गेली. 

मुळची हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील प्रियांका तनेजा १९९६ मध्ये डेरे कॉलेजमध्ये ११ वीच्या शिक्षणासाठी आली होती. दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण फतेहाबाद येथील डीएव्ही स्कूलमधून पूर्ण केले. डीएव्ही स्कूलमधील प्रियांकाच्या तेंव्हाच्या क्लासटीचर सुनीता मदन यांनी सांगितल्या प्रमाणे, ती अभ्यासात फार हुशार नव्हती पण तिला नृत्य, गायन आणि अभिनयाची खूप आवड होती …

मुलींना आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने राम रहीम या शाळेत आला आणि त्याची नजर प्रियांकावर पडली. तो तिच्यावर नजर ठेवून होता, तिला तो डेरयामध्ये बोलवायचा, हळहळू प्रियांकाचा राम रहीम वर विश्वास बसायला लागला.

असं म्हणलं जातं कि, राम रहीम ने प्रियांका ला वश केलं, आणि तिचं नामकरण केलं. आता प्रियांका राम रहीम ची हनीप्रीत बनली होती !

हळूहळू हनीप्रीत आणि राम रहीम यांच्यातील जवळीक वाढली. रामरहीम चे व्यवहार, त्याची अनेक गुपितंही हनीप्रीतसमोर येऊ लागली. हनीप्रीत आता गुरमीतच्या सर्वात जवळची आणि विश्वासू माणूस होती. गुरमीत तिच्यावर इतका मेहरबान होता कि, त्याने प्रियांकाला डेरयामधून कधी बाहेरही जाऊ दिले नाही, तिच्या पुढील शिक्षणाची सोय त्याने डेरयातच केली. पुढे चालून तिच्या नावाने  त्याने अनेक उद्योग, व्यवसाय उभारले.

खरं तर नंतर प्रियांका तनेजाचं संपूर्ण कुटुंबच गेल्या अनेक वर्षांपासून डेराचे अनुयायी आहे. आजही डेरामधील अनेक मोठे प्रकल्प हनीप्रीतच्या नावाने सुरू आहेत. हनीप्रीतच्या नावावर तंबूच्या आत एक बुटीकदेखील आहे.

इतकेच नव्हे तर प्रियांकाचा भाऊ साहिल तनेजा यालाही रामरहीमचे ‘आशीर्वाद’ मिळाले. तो तंबूत मोठे मोठे व्यवसाय करतो.

हनीप्रीतचे वडील रामानंद तनेजा यापूर्वी जुन्या दिल्लीसमोर एमआरएफ टायर्स शोरूम चालवत असायचे.पण नंतर त्यांनीही तंबूतच एक मोठा बियाण्यांचा प्रकल्प चालू केला आणि त्यावर लाखो रुपये कमावले असतीलच. शिवाय हनीप्रीतचे काका अजूनही सिरसा येथील परशुराम चौकात एमआरएफ टायर शोरूम चालवतात. तिचे मामाही आणि अनेक नातेवाईक सिरसाच्या मुख्य मार्गांवर टायरचा व्यवसाय करतात.

आता तिचे वडील रामानंद तनेजा हे डेराच्या खरेदी समितीचे प्रमुख आहेत. बाजारातील सर्व व्यवहार ही तेच पाहतात. इतक्या महत्वाच्या जबाबदाऱ्या प्रियांका वर आणि तिच्या वडिलांवर आहेत त्यामुळे इथून पुढचे डेरयाचे सर्वेसर्वा तीच असल्याचे स्पष्ट आहे.

हनीप्रीतची एक लहान बहीण निशु तनेजा जिचे लग्न झाले, ती नेहेमी म्हणत असते बाबाने आपल्या वैवाहिक जीवनात त्यांनी फार लक्ष घातले म्हणून आमचं व्यवस्थित चाललंय.

हनीप्रीतचं लग्न रामरहीमने विश्वास गुप्ता यांच्यासोबत १४ फेब्रुवारी १९९९ रोजी लावून दिलं होतं परंतु दोघांचे लग्न फार काळ टिकलं नाही. असं कारण सांगितलं जातं कि, तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी केल्यामुळे ती वापस निघून आली.

पण नंतर सत्य असंही समोर आलं होतं कि,

राम रहीम ने हनीप्रीत चं लग्न विश्वास सोबत लावून दिलं परंतु तिच्यासोबत शारीरिक सबंध ठेवण्याची परवानगी नव्हती दिली. तसेच गुप्ता यांनी राम रहीमवर हनीप्रीतशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही केला होता. आता सत्य काय आहे हे कुणीच सांगू शकत नाही.

राम रहीमच्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तिने ‘एमएसजी: द वॉरियर लायन हार्ट’ हे दिग्दर्शनही केले आहे. राम रहीमच्या सुनावणी दरम्यान ती राम रहीमसोबत अगदी सावलीप्रमाणे सोबत होती अगदी त्याला जेलमध्ये पाठवेपर्यंत..

तिने राम रहीमची चित्रपट निर्मिती हाताळली होती, रामरहीमचे सर्व चित्रपट हनीप्रीतनेच  दिग्दर्शित केले होते.

हनीप्रीत हि त्या डेरा समर्थकांपैकी एक आहे ज्यांची गणना राम रहीमच्या जवळच्या लोकांमध्ये केली जाते. तिने डेरासाठी तिने अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत.

बाबा राम रहीम कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच हनीप्रीतचा सल्ला घेत असायचा,

तसेच डेरयाच्या काही महत्वाच्या चाव्याही तिच्याच ताब्यात असायच्या, डेरयाच्या लोकांत तिच्या शब्दाला मोठे वजन होते. कोटींच्या उलाढालीपासून ते एक-एक रुपयापर्यंत सर्व व्यवहार तिच्या नजरेखाली व्हायचे.

यावरून असच दिसतं कि, रामरहीम ने उभारलेले डेरा आणि एकंदरीत त्याच्या दुनियेची आणि त्याच्या उद्योगाची उत्तराधिकारी म्हणून ती समोर आली आहे.

इथून पुढे बघता येईल २० वर्षाची शिक्षा पूर्ण होयीपर्यंत हनीप्रीतच हे सांभाळणार हे नक्कीच परंतु फक्त रखवालदार म्हणून नाही तर त्याची वारसदार म्हणूनच !

हे ही वाच भिडू .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.