हजारो मृत्यू , २४ तास अंत्यसंस्कार भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेत झालं ते चीनमध्ये आता घडतंय.

जगात कोविडमुळे हाहाकार मजला होता मात्र जिथून करोनाची सुरवात झाली त्या चीनमध्ये मात्र करोना कंट्रोलमध्ये असल्याच सांगितलं जात होतं. एकतर चीन आतमध्ये काय घडतंय हे बाहेर येऊन देत नव्हतं आणि दुसरा म्हणजे झिरो कोविड पॉलिसी अत्यंत कडकपणे राबवत चीन करोना पेशेंटना लगेच वेगळं करत होतं. त्यासाठी गेल्या २ वर्षात चीनमध्ये सतत लॉकडाऊन लावण्यात येत होते. मात्र हि स्टॅटेजी चीनला जास्त कला टिकवता आलेली नाहीये आणि आता चीनमध्ये काऱोणाचा पुन्हा हाहाकार उडाला आहे.

कोविड-19 निर्बंध शिथिल केल्यानंतर चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

चीनमध्ये रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत. एरिक फीगल-डिंग या साथीच्या रोगाच्या तज्ञाने याबद्दल डिटलामध्ये माहिती दिली आहे. जर ती पहिली तर चीनमध्ये करून संकट किती गडद झालं आहे याची आयडिया येते.

एपिडेमियोलॉजिस्टच्या अंदाजानुसार पुढील 90 दिवसांत चीनची 60% लोकसंख्या म्हणजेच पृथ्वीच्या 10% लोकसंख्येला करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. 

त्यामुळे लाखोंच्या संख्येने मृत्यू होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे चीनमधील हॉस्पिटलमध्ये भारतात जशी दुसऱ्या लाटेच्या दरम्यान परिस्थिती होती अगदी तशीच झाली आहे. हॉस्पिटलमध्ये बेड नाहीयेत, आयसीयू बेडचा तुटवडा आहे अशी परिस्थिती चीनच्या अनेक भागात आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

बीजिंगमधील अनेक स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत. शवगृहे ओव्हरलोड आहेत. लोक आयबुप्रोफेन  हे औषध विकत घेण्यासाठी विकत घेण्यासाठी फार्मास्युटिकल फॅक्टरीच्या बाहेर रांगा  लावत आहेत. दुसऱ्या लाटेत जे आपण अनुभवलं ते आज सगळं चीनमध्ये घडत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, बीजिंग इमर्जन्सी मेडिकल सेंटरने केवळ गंभीर आजारी रुग्णांसाठीच  रुग्णवाहिका बोलवण्याचे आवाहन केले होतं तरीही इमर्जन्सीसाठी  दररोज सरासरी 5,000 असलेले कॉल आज 30,000 पर्यंत वाढलेत.

चीनमध्ये ही करोनाची पहिलीच लाट असेल असं एक्स्पर्ट सांगत आहेत. चीनने आता जेवढे होतायेत तेवढे लोकं लवकर इन्फेक्ट होऊ द्या, त्यामुळे इम्युनिटी विकसित होईल, संसर्गाचा आकडा शिखरावर जाईल आणि मग केसेस कमी होतील ही स्टॅटेजी अंमलात आणली आहे. त्यामुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात केसेस आता समोर येत आहेत आणि आता ते कंट्रोल करणं देखील शक्य होत नाहीये.

त्यामुळे एकदम झिरो कोविड पॉलिसी मागे घेणे, त्यानंतर रेस्ट्रिक्शन उठवणे याचबरोबर चीननं जि लस आणली होती ती ही तितकी प्रभावी नसल्याने चीनमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाच्या केसेस वाढल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र यामुळे भारतातती पुन्हा लाट येणार का ?

भारताने आत्तापर्यंत तीन कोविड-19 लहरींचा सामना केला असून, गेल्या वर्षी डेल्टा व्हेरिएंटची दुसरी लाट सगळ्यात  वाईट होती. मात्र त्यानंतर भारत रिकव्हर झाला होता. आज भारतात सक्रिय संसर्गाची संख्या 3,559 इतकी कमी आहे.

सध्या चीनमध्ये ओमिक्रॉनच्या BF.7 च्या व्हेरिएंटने धुमाकूळ घातला आहे. मात्र भारतात हा स्ट्रेन पहिल्यापासून आहे त्यामुळे भारताला जास्त चिंता करण्याची गरज नाही असं जाणकार सांगतात. त्याचबरोबर भारतात मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणाचा फायदा देखील होत आहे असं जाणकार सांगतात. त्यामुळे जोपर्यंत चीनमध्ये वेगळ्या व्हॅरिएंटची निर्माती होत नाही आणि त्याचा प्रसार भारतापर्यंत येत नाही तोपर्यंत भारताला याचा परिणाम सहन करावा लागणार नाही असं सांगितलं जात आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.