बेनझीर भुत्तोंच्या विरोधात पण अविश्वास ठराव आला, पण बाईनं तो हातोहात हाणून पाडला

इम्रान खानचं साडेतीन वर्षाचं सरकार पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठराव पास झाल्यामुळं पडलंय. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय एवढ्या पंतप्रधानाला अविश्वास ठराव हरल्यामुळे घरी बसावं लागणार आहे. पण अश्याच प्रकारचा अविश्वास ठराव पाकिस्तानच्या इतिहासात आधी दोन वेळा आणण्यात आला होता. आणि त्यातलाच एक होता बेनझीर भुत्तो यांच्या विरोधातला.

वर्ष होतं १९८८. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. बेनझीर भुत्तो त्यावेळी पाकिस्तानच्या सगळ्यात लोकप्रिय नेत्या होत्या.

झिया उल हाक यांच्या दीर्घकाळ चाललेल्या लष्करी राजवटीनंतर आणि माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या फाशीनानंतरच्या या पहिल्याच निवडणुका होत्या. 

त्यामुळे वडिलांच्या हत्येच्या सहनभुतीच्या जोरावर बेनझीर भुत्तो हे इलेक्शन आरामात मारतील अशी एकंदरीत परिस्तिथी होती.

मात्र पाकिस्तानची आर्मी, ISI आणि तेव्हाचे राष्ट्रपती हे मात्र बेनझीर भुत्तोच्या या लोकप्रियतेने आणि त्यांचा सत्तेत येणाच्या शक्यतेने खुश नव्हते.  मग त्यांनी बेनझीर यांना काउंटर करण्यासाठी IJI म्हणजे इस्लामी जमहूरी इत्तेहाद या पक्षाच्या बॅनरखाली विरोधकांची मोट बांधली.

९ सितारे भाई भाई बेनझीर की शामत आई

या घोषणेखाली विरोधकांनी आपलं टार्गेट फिक्स केलं होतं. या विरोधी गटाचे सगळ्यात लोकप्रिय नेते होते नवाझ शरीफ. बाकीचे ८ नेते पण होते मात्र पाकिस्तानात पण बेनझीर भुत्तो यांच्या लोकप्रियतेला नवाझ शरीफच सुरुंग लावू शकतात असं पाकिस्तानच्या आर्मी आणि इतर एस्टॅब्लिशमेंटला वाटत होतं. त्यामुळे या IJI पक्षाच्या माग मोठी रसद जमा करण्यात येत होती.

त्यातच नवाझ शरीफ  यांना १९८८च्या हवाई दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लष्करशहा झिया उल हक यांचा राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्यात येत होतं.  

मात्र एवढं सगळं करूनही जेव्हा रिझल्ट आला तेव्हा या IJI च्या मोठमोठ्या नेत्यांना पाकिस्तानच्या जनतेने घरी बसवलं होतं. IJI चे पंप्रधान पदाचे उमेदवार गुलाम मुस्तफा जटूइ यांचा लाजिरवाणा पराभव झाला होता.

इकडे बेनझीर भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने पाक संसदेत २०७ जागांपैकी ९२ जागा जिंकल्या होत्या. आणि IJI ला एस्टॅब्लिशमेंटचा पाठिंबा असून देखील फक्त ५४ जागाच जिंकता आल्या होत्या.

मात्र बहुमताच्या आकड्यापासून बेनझीर भुत्तो अजूनही लांबच होत्या. 

११९ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना आजून छोट्या मोठ्या पक्षांच्या पाठिंब्याची गरज लागणार होती. त्यात अल्ताफ हुसेनच्या MQM आणि दुसरा एक पक्ष ANP यांनी बेन्झी भुत्तो यांना पाठिंबा जाहीर केला. 

मात्र बेनझीर भुत्तो यांच्या मार्गातले अडथळे इथंच संपत नव्हते. 

बहुमताचा कड्याची जमवाजमव केल्यानंतर राष्ट्रपतींनी बेनझीर भुत्तो यांना सत्तास्थापनेचं आमंत्रणच दिलं नाही.म्हणजे आपल्याकडे कधी कधी राज्यपाल जसं करतात अगदी तसं. 

हे एवढ्या डिटेलमध्ये यासाठी सांगतोय की मुस्लिम जगतातली महिला पंतप्रधान बनण्याचा बेनझीर भुत्तो यांचा प्रवास किती अवघड होता याबद्दल तुम्हाला आयडिया यावी. चाल पुन्हा आपल्या स्टोरीवर येऊ.

शेवटी मग बेनझीर भुत्तो यांनी आर्मीचं बजेट कमी करणार नाही आणि बापाच्या हत्येचा बदल म्हंणून आर्मीतल्या अधिकाऱ्यांवर सूडभावनेनें कारवाई करणार नाही ही आश्वासनं दिल्यानंतर आर्मीने त्यांना ग्रीन सिग्नल दिला आणि राष्ट्रपतींनी बेनझीर यांना सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं. 

 २ डिसेंबर १९८८ला बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानच्या पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.  

मात्र पारंपरिक कट्टर विचारांच्या असणाऱ्या IJI आणि इतर पक्षांनी मात्र त्यांच्या शपथविधीला पण उपस्तीथी लावली नाही. त्यामुळे आपल्या पुढं काय वाढून ठेवलंय याचा अंदाज बेनझीर भुट्टो यांना आला होता. पण संसदेत ११९ मतांची गरज असताना १४८ मतं मिळाल्याने त्यांचं मजबूत सरकार बनलं होतं. त्यांच्या विरोधात फक्त ५३ मतं पडली होती.

मात्र या १४८ मध्ये जे हौशे नौशे गौशे आले होते त्यात बऱ्याच अश्या पार्ट्या होत्या ज्या कधीही सरकारची साथ सोडून जाऊ शकत होत्या. 

त्यात पाक आर्मीने जरी नाइलाजाने भुत्तो यांचं सरकार बनू दिलं असलं तरी ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवशीच त्यांचं सरकार पडण्याच्या दृष्टीने हालचाली चालू झाल्या होत्या. 

मात्र त्यांना सरकार संसदीय आयुधंचा वापर करूनच पाडायचं होतं. मात्र त्यासाठी बेनझीर विरोधकांकडे नंबर्स नव्हते. मग या आकड्यांची जमवाजमव करण्याची जबाबदारी पाक आर्मीने ISI या पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेला दिली. 

 तेवढ्यात एंट्री झाली भारताच्या RAW  या गुप्तहेर संस्थेची. 

 RAW चे हेड मसूद शरीफ खटक यांनी ISI च्या अधिकारांचं भुत्तो यांच्या PPP पार्टीत फूट पाडण्यासंबंधीच संभाषण रेकॉर्ड केलं आणि ते बेनझीर भुत्तो यांना पाठवून दिलं . भुत्तो यांच्या  सरकार विरोधातील पहिला प्लॅन यशस्वी झाला होता.

मात्र विरोधकांनी आपले प्रयत्न चालूच ठेवले. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली. ज्या छोट्या छोट्या पार्टी भुत्तो सरकारला पाठिंबा दिला होता त्यांनी एक एक करून पाठिंबा काढायला सुरवात केली. 

ऑक्टोबर १९८९ मध्ये बेनझीर भुत्तो यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरु झाली.

MQM जी भुत्तो यांच्या सरकरमधली सगळ्यात मोठी पार्टी होती तिनं देखील आता साथ सोडली होती.  विरोधकांनी आता त्यांच्याकडे १२९चा आकडा असल्याचं दावा करायला सुरवात केली होती. 

भुत्तो यांच्या विरोधातील अडचणी दिवसेंदिवस वाढत होत्या. विरोधकांनी पण बाईचं सरकार लवकरच पडणार असा प्रचार कार्याला सुरवात केली होती. बाईचं शासन हे इस्लामविरोधी असल्याचा प्रचार केला जात होता. अनेक ठिकाणी शुक्रवारच्या जुम्म्यामध्ये सरकार पाडण्यासाठी दुआ मागितली जात होती. 

मात्र तरी बाई मागे हटायला तयार नव्हती.  त्यांनी पण आमच्याकडे बहुमत कायम असल्याचा दावा ठोकायला सुरवात केली. 

आणि चालू झाला फोडाफोडीचा खेळ. दोन्ही साइड्सनी आपआपले खासदार हॉटेलमध्ये नेऊन ठेवण्यास सुरवात केली. त्याचबरोबर अपक्ष खासदारांना अक्षरशः बोली लागत होत्या. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा तेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या नवाझ शरीफ यांनी पोलीस ऍक्शन करून भुत्तोंच्या PPP च्या  खासदारांना आपल्याकडे आणण्याची योजना आखली. 

आणि यात एकमेकांवर होणारे आरोप रोज वेगळीच सीमा गाठत होते.

DAUGHTER OF DESTINY या आपल्या आत्मचरित्रात बेनझीर भुत्तो यांनी विरोधकांना खासदार विकत घेण्यासाठी ओसामा बिन लादेन यानं करोडो रुपये दिल्याचा आरोप लावला होता. सौदी अरेबियाच्या विमानात आंब्यांच्या पेट्यात भरून हे पैसे आल्याचा त्यांनी म्हटलं होतं.

आणि आला १ नोव्हेंबर १९८९ चा दिवस ज्या दिवशी अविश्वास ठरावावर मतदान होणार होतं. मात्र एवढे प्रयत्न करूनही आदल्या दिवसापासूनच विरोधी पक्षाचा कॉन्फिडन्स डाऊन झाला होता. मात्र बेनझीर भुत्तो यांचे पती असिफ अली झरदारी कोणत्याही परिस्तिथीत आम्ही अविश्वास ठराव हाणून पाडू असं सांगत होते.  त्यात लास्ट मिनिटाला भुत्तो यांनी एक गेम खेळाला त्यांनी विरोधकांना त्यांचे सदस्य पाहिले  आणायला सांगितले आणि त्यांना मोजण्यात आलं. तो आकडा फक्त १०७ निघाला.

भुत्तो यांच्या विरोधातला अविश्वास ठराव फेटाळला गेला. 

नंतर बेनझीर यांनी आपले समर्थक सदस्य संसदेत आणले त्यांची मोजणी केली तेव्हा ते १२४ भरले होते.

भुत्तो यांनी आपल बहुमत पुन्हा सिद्ध करून दाखवलं होतं. एका बाई पाकिस्तानसारख्या कट्टरतावादी देशात पुरुष राजकारण्यांना पुरून उरली होती. मात्र हे सरकार पुढे  ८ -९ महिनेच टिकलं. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी असेम्ब्ली भंग करत हे ऑगस्ट १९९० मध्ये बेनझीर भुत्तो यांचं  सरकार बरखास्त  केलं.

कधीकाळी  बेनझीर भुत्तो यांचा कॉलेज फ्रेंड असणाऱ्या इम्रान खानला मात्र भुत्तोंसारखं लढता आलेलं नाहीये.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.