‘पाकिस्तान’ या नावामागचं लॉजिक निव्वळ पोरखेळ वाटण्यासारखंच आहे

पाकिस्तानचा जन्म कसा झाला याचं उत्तर तुम्ही नेट बघितलं तर वेगळा पाकिस्तानच्या मागणीतच  बेसिकमध्येच लोचा असल्याचं दिसून येइल. मोहम्मद अली जिना यांचाच विषय घ्या की आधी एकदम  हार्ड सेक्युलर असलेले जिना फक्त स्वतःची राजकारणातील राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाकिस्तनाची मागणी करण्यास तयार झाले.

त्यानंतर जिनांना केमालपाशाने जसं आधुनिक तुर्की बनवली तसाच त्यांना पाकिस्तान घडवायचा होता.

मात्र केमालपाशानं धर्माला राजकारणापासून दूर करून मॉडर्न तुर्की बनवली तर जीना धर्माच्या नावाखाली देश मागत होते. एवढंच नाही तर पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताच बांगलादेश आणि पश्चिम पाकिस्तान यांना कनेक्ट करायला जिनांनी बिहार, उत्तरप्रदेशचा भागपण मागितला होता. आता एवढे सारे किस्से झाल्यानंतर आपल्या मेन मुद्यावर येऊ.

तर ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिणाऱ्या मोहम्मद इक्बाल यांनीच पहिल्यांदा द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला.

त्यात त्यांनी हिंदू आणि मुस्लीम यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या देशांची मागणी केली. आता जेव्हा अशा  वेगळ्या राज्याच्या, देशाच्या मागण्या होतात तेव्हा कॉलेजातली पोरं पहिली पुढं असतात आतापर्यंतचा हा इतिहास. इथंपण तसंच झालं इक्बालच्या या आयडियाने प्रेरित झालेली केम्ब्रिजमधली पोरी यावर जोरदार चर्चा करू लागली. 

असाच एक ग्रुप होता रेहमत अली याचा. आपल्या धर्मासाठी आपलं वेगळं राज्य असायला पाहिजे  या भावनेनेच तो आता या ‘पाक’ कामाच्या मागे लागला होता. 

मग विषय निघाले वेगळ्या देशाच्या सीमा काय असतील, त्याची रचना काय असेल यांवर रेहमत अलीच्या ग्रुपवर जोरदार चर्चा झडल्या. आता विषय आला नवीन देशाचं नाव काय ठेवायचं. मग रेहमत अली जो केम्ब्रिजमध्ये शिकत होता त्याचं लॉजिक कसं होतं हे आता तुम्हीच ठरवा.  

मुस्लिमांसाठी वेगळ्या देशासाठी पंजाब, सिंध, बलुचिस्तान ,काश्मीर आणि बंगाल यांची मागणी होत होती. तेव्हा मग पंजाब, अफघाणीया ,काश्मीर, सिंध यांचा नावाचं पाहिलं अक्षर आणि बलुचिस्तानचं स्तान घेऊन रेहमत अली याने मग सुरवातीला पाकस्तान हे नाव बनवलं मग पुढे त्यात I टाकून पाकिस्तान असं नाव करण्यात आलं.

सुरवातीला हे लॉजिक पोरखेळ असल्याची टीकाही झाली होती. मात्र रेहमात अली आपण सुचवलेलं नाव मुस्लिम लीगच्या इतर नेत्यांसमोर ठेवण्यासाठी कंबर कसत होता. लंडनमध्ये त्यावेळी होऊ घातलेल्या तिसऱ्या राउंड टेबल कॉन्फरसच्या एक मोठी संधी रेहमत अली याच्याकडे चालू आली.

 २८जानेवारी १९३३ रोजी त्याने एक चार पाणी पत्रक काढलं त्यामध्ये पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदाच अधिकृतरित्या वापरण्यात आला. त्या पत्रकाला त्यानं ‘पाकिस्तान डिक्लरेशन’ असं म्हटलं.

‘Now or Never’ Are we to live or Perish for Ever?’  या मथळ्याखाली ही पत्रिका लिहण्यात आली होती. 

रहमत अलीने ‘नाऊ ऑर नेव्हर’ प्रकाशित केले तेव्हा त्यात पाकिस्तानचा नकाशाही समाविष्ट करण्यात आला होता. या नकाशात भारतामध्ये तीन भिन्न मुस्लिम देश दाखवण्यात आले होते.

हे देश होते- पाकिस्तान, बंगिस्तान म्हणजे पूर्व बंगाल आणि उस्मानिस्तान म्हणजे निजामाचे संस्थान हैदराबाद. 

विशेष म्हणजे रहमत अलीच्या पाकिस्तान आणि अल्लामा इक्बालच्या सेपरेट मुस्लिम नेशनमध्ये कुठेही बंगालचा उल्लेख नाही. पण पाकिस्तान हा स्वतंत्र देश झाल्यावर पूर्व बंगालचाही त्यात ‘पूर्व पाकिस्तान’ म्हणून समावेश करण्यात आला.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.