तुर्किश एअरलाईन्सला जगात भारी बनवणारा व्यक्ती आता एअर इंडियाची कमान सांभाळणार आहे

एअर इंडिया नुकतंच परत त्यांच्या घरी गेलंय. म्हणजे काय तर एअर इंडिया आधी टाटा यांचं होतं  मात्र ते नंतर भारत सरकारने खरेदी केलं आणि यंदा परत २०२२ मध्ये एअर इंडियाची मालकी टाटा कंपनी ला देण्यात आली आहे. त्यामुळेच ‘घरवापसी’ असं म्हटलं जातंय. टाटाकडे एअर इंडिया गेल्यानंतर त्यांनी बरेच बदल केले आहे. या विमानांतून प्रवास करणाऱ्या सगळ्यांना मिळणाऱ्या सेवांमधून टाटा यांच्या यशाचं गमक कशात आहे, याची जाणीव होतेय.

खानपान, अनाऊन्समेंट आणि अशा इतर बदलांनंतर आता एअर इंडियाने त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतील? याचा शोध सुरु केला, आणि त्यांच्या हा शोध थेट तुर्कस्थानात जाऊन थांबल्याचं दिसतंय. एअर इंडियाने त्यांचे नवीन एमडी आणि सीईओ  घोषित केले आहे. माहितीनुसार ‘इल्कर आयची’ असं त्यांचं नाव असून ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष आहेत. 

आता टाटाचं तर आपल्याला माहीतच आहे, जे करणार ते दर्जा असलेलंच करणार. मग त्यांचे हे नवीन सीईओ देखील किती भारी आहेत आणि ज्या एअरलाइन्सच्या अध्यक्षांची टाटांनी निवड केलीये ती एअरलाइन नेमकं काय आहे, हे जरा जाणून घेऊ…

आधी बघूया तुर्किश एअरलाइन्स काय आहे?

भारताला तुर्किश एअरलाइन्स परिचित असण्याचा एक लय भारी किस्सा आहे. गोष्ट आहे २०१५ ची. तुर्की विमानात टॉयलेटच्या काचेवर लिपस्टिकने एक संदेश लिहिला होता बघुन विमानला आपत्कालीन लँडिंग करावी लागली आणि ही लँडिंग झाली भारतात. त्या संदेशात विमानात ‘बॉम्ब’ असल्याचं लिहिलं होतं. म्हणून तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करावे लागले. मालाची तपासणी करण्यासाठी NSG कमांडोही पोहोचले आणि त्यांनी प्रवाशांची चौकशीही केली.

मात्र विमानात काहीच सापडलं नाही आणि १ दिवस मुक्काम करून विमानाने परत प्रवासाला सुरुवात केली.  

अशा या तुर्की एअरलाइन्सची स्थापना १९३३ ला झाली होती. देशांतर्गत वाहक म्हणून सुरु करण्यात आलेली ही एअरलाइन दुसऱ्या महायुद्धानंतर आंतराराष्ट्रीय सेवांसाठी खुली झाली. १९४७ चं हे वर्ष होतं. यानंतर १९६७ मध्ये तुर्की एअरलाइन्सने त्यांचे पहिले जेट मॅकडोनेल डग्लस डीसी-9 चालवण्यास सुरुवात केली.

१९८०-९० च्या दशकात या विमान कंपनीला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. खराब ग्राहक सेवा आणि विलंब यासाठी अशी त्यांची ओळख झाली. तसेच काही वेळा हायजॅक झाले तर काही अपघात झाले. सरकारही काही मदत करत नसल्याने एअरलाइन्स बंद करावी लागते की काय अशी स्थिती झाली होती. 

मात्र १९८३ मध्ये नवीन सरकार सत्तेवर आले ज्याने तुर्कस्थानसाठी या एअरलाइन्सचं महत्त्व ओळखलं. तुर्कस्थानसाठी जागाचं प्रवेशद्वार म्हणून त्यांनी एअरलाइनच्या आधुनिक मेकओव्हरची सुरुवात केली. आणि तेव्हापासून आजपर्यंत ही एअरलाइन्स तठस्थ काम करत आहे. 

आज तुर्किश एअरलाइन्सला त्यांच्या अतुलनीय फ्लाइट नेटवर्कमुळे, आरामदायी सीट्ससाठी आणि स्वादिष्ट पदार्थांमुळे ओळखलं जातं. याच्याच जोरावर त्यांनी युरोपमधील सर्वोत्कृष्ट एअरलाइनचा मान मिळवलाय. जवळपास जगभरातील सर्व देशांमध्ये तुर्किश एअरलाईन्सचं उड्डाण केलं जातं. म्हणून त्यांना जगातील बहुतेक देशांमध्ये उड्डाण करणारी एअरलाईनची पदवी मिळाली आहे. इस्तंबूल विमानतळावरून ३७१ विमानांच्या ताफ्यासह १२० देशांसाठी उड्डाणे आयोजित केली जातात.

इल्कर आयची यांनी त्यांच्या कार्यकाळात तुर्की एअरलाइन्सला सध्याच्या यशापर्यंत नेलं आहे. अशा या एअरलाइन्स नेतृत्व करणारे इल्कर आयची एअर इंडियासाठी काम करणार आहेत. 

इल्कर आयची हे ५१ वर्षांचे आहे. तुर्कीतील बिलकेंट विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन विभागाच्या १९९४ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. ते तुर्कीचा व्यापारी आहे. २०१५ मध्ये त्यांची तुर्की एअरलाइन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. २६ जानेवारी २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता त्यांना एअर इंडियाची कमान मिळाली आहे.

इल्कर आयची हे विमान उद्योगातील एक मोठं नाव आहे. तो या उद्योगाचा नेता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाला नवी ओळख मिळेल आणि नव्या युगाची सुरुवात होईल, असं टाटा संसचे चेयरमैन एन चंद्रशेखरण म्हणाले आहेत.

आयची १ एप्रिलपासून एअर इंडियाचे नवीन CEO आणि MD म्हणून पदभार स्वीकारतील. आयची यांनी एअर इंडियाला ‘आयकॉनिक एअरलाइन’ म्हटलं आहे. तर आम्ही एअर इंडियाचा वारसा जपून तिला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवू. प्रवाशाचा अनुभव चित्तथरारक आणि अनोखा असेल, जे भारताचे आदरातिथ्य दर्शवेल, असं आयची यांचं म्हणणं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.