नितीन देसाईंच्या कामाने प्रभावित होऊन मोदींनी ५०० एकर जमिनीची ऑफर दिली होती

मराठी,हिंदी, हॉलिवूड सिनेमा  सृष्टीतील प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील आपल्या एन. डी. स्टुडीओत गळफास घेऊन जीवन संपवल. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सिनेमा,राजकिय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक दिग्गजानां आणि सहकाऱ्यांनां एक धक्का बसला. त्यांनी लगान,मंगल पांडे, स्वदेस, आर या पार, इश्क, जोधा अकबर यासारख्या चर्चेत असलेल्या पिक्चरचं कला दिग्दर्शन केलं. कला दिग्दर्शनाबरोबरचं त्यांनी गणेशउत्सवातही आपल्या कामाने एक वेगळी ओळख निर्माण केली. लालबागचा राजा. मुंबईचा राजा आशा नावाजलेल्या गणपती मंडळाचे कामही त्यांनी केले. गणेशउत्सवात आपल्या देखाव्यामुळे ते सर्वपरिचीत होते.

नितीन देसाई यांचा राजकीय नेत्यांबरोबरही अनेक वेळा संबध आला आहे. 

त्यांनी आत्ता पर्यंत अनेक राजकीय नेत्यांच्या शपथविधीचेही स्टेज बनवले आहेत. असाच एक गाजलेला स्टेज म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा स्टेज. या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून ते ते त्यांच्या पुतळ्या पर्यंत सर्वकाही होतं. जेव्हा पहिल्यांदा भाजप शिवसेना  युतीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले, त्यावेळीही स्टेजची सजावट नितीन देसाई यांनीच केली. 

तर, २०१४ मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यावेळीही सजावट देसाईंचीच होती. म्हणजे महाराष्ट्रातील अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्टेजवरूनचं शपथ घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची चर्चा ही राजकिय पटलावर पण होतीच. देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी हे ही नितीन देसाईंचे खुप मोठे फॅन होते. त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील लॉन्चींगच्या इंन्ट्रीची संकल्पना ही त्यांचीच होती.

नरेंद्र मोदींच्या ओपनिंगची भन्नाट संकल्पना त्यांनीचं मांडली होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २००१ ला गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांचं काम आणि नेतृत्व पाहून  त्यांनां राष्ट्रीय स्तरावर लॉन्च करण्याचं भाजपनं ठरवलं. त्यावेळी त्यांची मुंबईत सभा ठेवण्यात आली. आणि त्या सभेच्या स्टेजची संपूर्ण जिम्मेदारी होती ती नितीन देसाई यांच्यावर. ज्यावेळी त्यांच्यावर कामाची जिम्मेदारी देण्यात आली त्यावेळी त्यांनी आयोजक असलेले विनोद तावडे यांनां मोदीच्या इन्ट्रीची संकल्पना दिली. त्यांनी ऑफ्रो एशियन गेम्सच्या ओपनिंगसाठी वापरण्यात आलेल्या कमळाच्या फुलातून मोदींची इन्ट्री करूया अशी संकल्पना मांडली. आणि सगळ्यांनां त्यांनी मांडलेली संकल्पना आवडली आणि त्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि या सगळ्या इन्ट्रीची मोदींनांही उत्सुकता लागली होती.

सभेत नरेंद्र मोदींची रॉयल इन्ट्री झाली आणि मोदी भारावुन गेले.

८० फुट कमळाच्या फुलातून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी स्टेजवर आले. समोर आडीच लाख लोकं सभेसाठी आले होते. नरेंद्र मोदी यांना दिलेल्या रॉयल इन्ट्रीमुळे मोदी भारावुन गेले होते. त्या सभेत नरेंद्र मोदी यांनी स्टेजवरून माझे मित्र म्हणून नितीन देसाई यांचं नाव घेत त्यांच्या कामाची पावती त्यांनी भर स्टेज वरून दिली. पण, त्यावेळी नितीन देसाई हे नरेंद्र मोदी यांनां भेटू शकले नाहीत. त्यानंतर बरोबर दोन दिवसांनी नितीन देसाईनां नरेंद्र मोदी यांनी फोन केला. आणि त्यांनां भेटायला बोलावलं. भेटायला गेल्या नंतर नरेंद्र मोदी आणि नितीन देसाई यांच्यात ४५  मिनीट चर्चा झाली. त्या चर्चेच्या शेवटी नरेंद्र मोदींनीं त्यांनां भविष्यात काय करायचं असं विचारल्यावर त्यांनी उत्तर देताना एक प्रेझेंटेशन दिलं त्यावर नरेंद्र मोदी भारावुन गेले.

आणि नरेंद्र मोदींनी कौतूक करत नितीन देसाईनां एक मोठी ऑफर दिली.

ज्यात महाराष्ट्र आणि राजस्थानला लागून गुजरातची जेवढी बॉर्डर आहे. ती तुमची असं ते नितीन देसाईनां म्हणाले. आणि या प्रोजेक्ट साठी त्यांनी ५०० एकर जमीन हे स्टुडिओ उभारणी साठी देण्याचं ठरवलं. पण एवढी मोठी दिलेली ऑफर ही देसाईनीं नाकारली कारण त्यांच म्हणण होतं की गुजरातमधील खराब हवामान आणि त्या ठिकाणी आसलेली सपाट जागा ही स्टूडिओ उभारण्यासाठी चांगली नाही. आणि महाराष्ट्रा सारखं त्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण आणि विविधता नाही. त्याचबोराबर संपुर्ण फिल्म  इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे. असं असताना गुजरातमध्ये फिल्म सेट मी उभारू शकत नाही म्हणून त्यांनी थेट नकार दिला होता.

नरेंद्र मोदी यांनां फिल्म स्टूडिओसाठी नकार जरी दिला असला तरीही नितीन देसाई यांचं काम नरेंद्र मोदींनां चांगलचं माहित होतं.

त्यांनी जगातील सर्वात उंचं आसलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लोकार्पण कार्यक्रमाची जिम्मेदारी नितीन देसाई यांच्यावर दिली. जगातील सर्वात उंचं अशा स्टॅच्यु ऑफ युनिटीचं लोकार्पण होत असताना. कार्यक्रमाचं नियोजनही तेवढ मोठं करण्याची तयारी होती. ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ ही संकल्पना घेऊन नितीन देसाई यांनी या स्टेजची उभारणी केली. 

या कार्यक्रमासाठी नितीन देसाई यांनी जगातील सर्वात मोठी एलईडी स्क्रीन उभारत सर्वांची मन त्यांनी जिंकली.

 भव्य मंडप, भारदस्त स्टेज उभारत त्यांच्या संकल्पनेने या कार्यक्रमाला चारचांद लागले. या कार्यक्रमाचे चोख नियोजन केले म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भर स्टेजवरून कौतुक केलं. आणि त्यांनी पुन्हा एकदा मोदींचं मन जिकलं. वाराणसी प्रोजेक्टच्या कामातही त्यांनी यशस्वी भुमिका बजावली होती. 

नरेंद्र मोदी यांच्या ५० पेक्षा आधिक कार्यक्रमाचं त्यांनी स्टेज बनवलेलं होतं.

२००३ ची मोदींची कमळाच्या फुलातुन केली गेलेली इन्ट्री, स्टॅच्यु ऑफ युनिटी लोकार्पण सोहळा किंवा इतर कार्यक्रम असे महत्वपुर्ण कामं त्यांनी यशस्वी करून दाखवले होते. त्यामुळे त्यांच्या संकल्पना आणि त्यांच्या कामाचे नरेंद्र मोदी हे फॅन झाले होते. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चित्रपट, राजकीय, आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनां मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.