आधी महिन्याला ९ हजार रुपये बील भरायचे; आज सरकारला लाईट विकतेत…

महाराष्ट्रात सध्या जास्तीचं आलेलं वीज बिल आणि ते न भरल्यामुळे महावितरण सुरु केलेली वीज तोडणी मोहिम यावरुन मोठा वाद सुरु आहे. अजूनही महावितरणाकडं तब्बल ७१ हजार ५०६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, व्यावसायिक, कृषी, औद्योगिक अशा सगळ्या प्रकारांचा समावेश आहे.

मध्यंतरीच्या काळात ही वीज बिल माफ करावी म्हणून मागणीनं चांगला जोर धरला होता, विरोधी पक्षांकडून पण यात आंदोलनं झाली, पण सरकारकडून या मागणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस बिल भरणं हा एकमेव पर्याय पाठीमागं राहीला.

एकूणच काय वाढीव आलेली लाईट बील हे आख्या महाराष्ट्राचं टेन्शन बनलं आहे.

पण याचं टेन्शनवर बंगळुरूच्या एका संगीत निर्मात्यानं उपाय केलायं. तो म्हणजे सौर ऊर्जेचा. आता तुम्ही म्हणालं हा तर उपाय तसा जुनाच आहे, बरोबर आहे. पण याच प्रयोगातून त्यांच्या घरात सध्या उलटी गंगा वाहायला लागली आहे. 

बंगळुरूमध्ये राहणाऱ्या पृथ्वी मंगीरी असं या संगीत निर्मात्यांचा नाव. त्या जोडीला ते ड्रम वादक देखील आहेत.

त्याच झालेलं असं की, ते घरात रोज ड्रम वाजवायचे, त्याचा अभ्यास करायचे. पण याच ड्रममुळे शेजाऱ्यांना त्रास होऊ लागला. शेजारी अगदी रोज सकाळी उठून भांडायला मंगीरींच्या घरी. पण आपला हट्ट सोडतील ते कलाकार कसले. शेवटी शेजाऱ्यांनी वैतागून पोलिस कंपलेंट केली.

मंगीरी सांगतात, मला समजायचं हे थांबवायला पाहिजे, पण मी माझा अभ्यास तर बंद करू शकत नव्हतो. अखेरीस यावर उपाय म्हणून मी माझी खोली साउंडप्रूफ बनवून घेतली.

पण त्यातनं दुसराच घोळ समोर आला. एसी आणि इतर उपकरणांमुळे लाईटचं बिल वाढून यायला सुरुवात झाली. आधी दीड हजार रुपयाच्या आसपास येणार बिल आता ९ हजार रुपये यायला लागलं. त्यामुळे यावर उपाय शोधण गरजेचं होतं. 

हाच उपाय शोधताना त्यांना सोलर पॅनलच्या बाबतीत समजलं, पण त्यासोबतच त्यातून त्यांना लाईट विकत घेण्याची स्कीम पण समजली.

मग काय दीड वर्षांपूर्वी त्यांनी घराच्या छतावर ५ किलोवॅटचं सोलर पॅनल बसवून घेतलं, त्यात एकूण १५ पॅनल टाकली. यात त्यांना जवळपास ५ लाख रुपयांचा खर्च आला. पण त्याचं म्हणणं आहे की यातून दीड वर्षात आमचं जवळपास १ लाख रुपये बिल वाचलं आहे. 

सोबतच पृथ्वी यांच्या घरात जेव्हा त्यांच्या गरजेपेक्षा अधिक लाईट तयार होती तेव्हा ती लाइट बंगळुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी अर्थात BESCOM कडून एका वेगळ्या मीटरच्या माध्यमातून जवळच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आणली जाते. BESCOM जेवढं युनिट लाईट विकते तेवढे पैसे ते मंगीरींना देतात.

यातून पण आम्हाला आज पर्यंत ४० हजार पेक्षा जास्त रुपये मिळाले असल्याचं ते सांगतात.  

महाराष्ट्रात देखील काही आपार्टमेंटच्या छतांवर हा प्रयोग केल्याचं दिसून येतं, पण अजून सर्व सामान्य घरांमध्ये याचं जन जागृतीकरण करणं होणं गरजेचं आहे, याचसाठी हा लेख. एकदा खर्च होतो पण शास्त्रज्ञ सांगतात त्यानुसार सोलर एनर्जी पुढचे २५ वर्षापर्यंत वीज तयार करते.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Digambar Bohare says

    Mujhe 2fan 6 10wattke led bulf 210lit. Ki freeze 1tv our din me ek bar .5hpm ki moter 10 minutes keval pani bharne ke liye electric ke liye solar panel lagana hai to kitna kharch aayega

Leave A Reply

Your email address will not be published.