तीन वर्षात तीन निवडणूका, एकाही निवडणूकीत भाजपला संस्कृती आठवली नाही

सध्या राज्यात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला राजकीय विषय म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमार्फत ऋतुजा लटके ३ नोव्हेंबरला ही निवडणूक पार पडणार होती.मात्र त्यात ऐन टायमाला एक ट्विस्ट आला आहे.

भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली आहे.

“ उमेदवारी अर्ज भरावाच लागत असतो जवळपास २० हजार लोक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होते. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या नेतृत्वात ५१ टक्के मतं मिळवण्याची तयारी आम्ही केली होती. मात्र दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी निवडणुकीस उभा आहेत. अशावेळी सर्वांनी मोठं मन केलं पाहिजे आणि आपली आतापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.” असं मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेन्याची घोषणा करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलं.

त्याचवेळी

”अंधेरी पोटनिवडणुकीबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ”

आहे असंही बावनकुळे म्हणाले. मात्र भाजपचं संस्कृतीचं हे कारण मर पटलेलं दिसत नाही कारण राज्यात मागच्या तीन पोटनिवडणुकात भाजपने आपलॆ उमेदवार दिले होते. त्यामुळे भाजपाला आता यामध्ये दुटप्पीपणा असल्याची टीका होत आहे.

यामध्ये पहिली निवडणूक होती पंढरपूरची.

२०२० मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भरत भेलके यांच्या निधनानंतर इथली जागा रिक्त झाली. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावरची ही पहिलीच पोटनिवडणूक. राष्ट्रवादीनं इथं भरत भेलके यांचे पुत्र भगीरथ भेलके यांना उमेदवारी दिली. आमदाराच्या निधनानंतर सहसा पोटनिवडणूक बिनविरोध होते, मात्र इथं असं झालं नाही. भाजपनं आपला उमेदवार उतरवत हा विषय प्रतिष्ठेचा केला. त्यांनी समाधान आवताडे यांच्या रूपात स्थानिक उमेदवार दिला.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे प्रचार केला आणि समाधान आवताडे यांनी ४ हजारांच्या फरकानं निसटता का होईना पण विजय मिळवला.

दुसरी पोटनिवडणूक झाली, देगलूर मतदारसंघात

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. काँग्रेसनं या निवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. मात्र विषय असा होता की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. याच सुभाष साबणेंनी पोटनिवडणुकीवेळी बंडखोरी केली आणि भाजपकडून उमेदवारी दाखल केली. त्यामुळं पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना रंगला.

मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची केली. त्यांनी संपूर्ण ताकद लावली आणि जितेश अंतापूरकर जवळपास ४२ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले.

तिसरी पोटनिवडणूक झाली, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यामुळं या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. महाविकास आघाडीनं पुन्हा एकदा ज्या पक्षाचा आमदार आहे, त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. इथं गोम अशी होती की, याच मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर दोन टर्म आमदार राहिलेले. त्यांनी ही जागा काँग्रेसला सोडण्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करुन दाखवली. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती.

यामध्ये भाजपने जोरदार ताकद लावूनही जयश्री जाधव यांना ९६ हजार ४९२ मतं मिळाली, तर सत्यजित कदम यांना ७७ हजार ६४५ मतांवर समाधान मानावं लागलं.

त्यामुळे या तीनही निवडणुकीत सीटिंग आमदाराच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार देण्याचा सुसंस्कृतपणा दाखवला नव्हता. त्यामुळं अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना ऐन टायमाला माघारी घेयला सांगून दाखवलेल्या सुसंस्कृतिकपनाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.