अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला शीख पोलिसाचे नाव, ट्रम्प देखील त्यांच्या भाषणात उल्लेख करायचे.

अमेरिकेत टेक्सास  या राज्यात एक ह्यूस्टन नावाचं शहर आहे. याच शहरातील एका मोठ्या पोस्ट ऑफिसला आपल्या भारतातील एक व्यक्तीचं नाव देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला आहे. हे वाचून अभिमानास्पद वाटलं असेल ना? असे अनेक व्यक्ती घडून गेले जे मुळात भारतीय आहेत आणि बाहेरील देशात जाऊन आपले आणि आपल्या देशाचे नाव मोठं करतात.

त्यातील च एक म्हणजे अधिकारी संदीप सिंग धालीवाल !

संदीप सिंग धालीवाल हे मुळचे भारतीय वंशाचे असून ते अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ह्यूस्टन शहरात पोलीस अधिकारी होते. पण दुर्दैव असं कि, २०१९ मध्ये कर्तव्य बजावत असताना ते गोळीबारात ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अमेरिका प्रशासनाने पश्चिम ह्यूस्टनमधील एका मोठ्या टपाल कार्यालयास भारतीय अमेरिकी शीख अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांचे नाव दिले आहे.

संदीप सिंग धालीवाल हे टेक्सासचे पहिले शीख पोलीस अधिकारी बनले होते.

तेथील प्रशासनाने त्यांना तुर्बान परिधान करण्यास आणि दाढी सुद्धा ठेवण्यास परवानगी दिली होती.

२७ सप्टेंबर २०१९ मध्ये रोजी वाहतूक नियंत्रण करीत असताना त्यांना गुन्हेगारांकडून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. 

मंगळवारी एक समर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्यात अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात नाव बदलण्याचा कायदा आणणाऱ्या काँग्रेसच्या महिला लिझी फ्लेचर म्हणाल्या की, ज्याने समाजाची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचे आम्ही ऋणी असून त्यांचा सन्मान म्हणून आम्ही हे नाव पोस्ट ऑफिसला देत आहोत.

धालीवाल यांच्या मृत्यू नंतर फ्लेचर यांनी त्यांची राज्याला ओळख करून देण्यासाठी संपूर्ण ह्यूस्टन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर २०२० मध्ये कॉंग्रेसवाल्यांचे बिल संदीप सिंग धालीवाल पोस्ट ऑफिस कायदा, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूर केला आणि कायद्यावर स्वाक्षरी केली होती.

हॅरिस परगण्याच्या नगरपाल कार्यालयाने म्हटले आहे, की आमच्या विभागातील अधिकारी संदीप सिंग धालीवाल यांना आम्ही श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव हॅरिस परगण्यातील टपाल कार्यालयाला देत आहोत. जेणेकरून त्या निमित्ताने त्यांच्या आठवणी जागृत राहतील.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील संदीप सिंग धालीवाल यांच्या योगदानाबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केला होता.

संदीप सिंग यांचे निकटवर्तीय  टेक्सासमधील कमिशनर कोर्ट, टपाल कार्यालयाचे आम्ही ऋणी असल्याची भावना व्यक्त करत आहेत. डेप्युटी धालीवाल यांच्या निस्वार्थ सेवेच्या जीवनाची आठवण तेथील सर्व लोकं काढत शासनाचे आभार मानले आहेत.

संदीप सिंग यांचे वडील प्यारा सिंह धालीवाल यांनी ह्यूस्टनच्या लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

“आम्हाला ह्यूस्टन समुदायाकडून पाठिंबा आणि प्रेम मिळाले आहे. आम्ही खूप आभारी आहोत आणि ज्याप्रकारे संदीपचे अशाप्रकारे स्मारक करूनआम्हाला सन्मानित केल्याबद्दल आम्ही आणि संदीप  कायमचा शहराचा एक भाग बनला आहे”.

खरंच हे आपल्या साठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कि, एका भारतीयाने बाहेरील देशात देखील तितक्याच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडले आहे. आणि त्यांच्या योगदानाची दखल देखील तेथील प्रशासनाने घेतली हे देखील तितकीच समाधानाची गोष्ट आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.