केंद्रात कोणत्या मंत्र्यांना कोणतं पद मिळणार हे देखील नीरा मॅडम फोनवर ठरवायच्या.

नीरा राडिया…नाव तर ऐकलंच असेल…वादग्रस्त नावांच्या यादीत हे नाव कायमच चर्चेत असते. आता देखील एका मुद्द्यात त्यांचं नाव आलं आणि पुन्हा एकदा या नीरा राडिया मॅडम चर्चेत आल्यात.

आत्ताचं निमित्त म्हणजे, पेंडोरा पेपर्स प्रकरण. ज्यात सचिन तेंडूलकर, विनोद अदानी, अनिल अंबानी सारखे बडी लोकं अडकलीत. आता त्या खालोखाल नीरा राडिया याचं देखील नाव या प्रकरणात गोवलं गेलं आहे.  पॅराडाईज पेपर्स लीकमध्ये तसेचपनामा पेपर्स मध्ये देखील त्यांचं नाव आले होते. जवळपास एक डझन ऑफशोर कंपन्यांशी त्याचे व्यवहार आहेत, असा दावा करण्यात आलाय.

म्हणायला गेलं तर तसं चर्चेत आलेले याच्याबाबतची सर्वच प्रकरणं मोठी आणि गंभीर होती. 

त्यातील एक मोठं प्रकरण म्हणजे, फोन टॅप प्रकरण.

हे प्रकरण चर्चेत आलंय ते २०१० मध्ये.  तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि अनेक बड्या पत्रकारांशी फोनवर त्यांनी केलेली संभाषणे लीक झाली होती.  यूपीए २ मध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी नेत्यांना मिळवण्यासाठी नीरा राडिया या काही पत्रकारंची मदत घेत असायच्या. तसेच यासाठी त्या बड्या राजकारण्यांशी असलेले दुवे वापरत असायच्या.

तेंव्हाच्या तपासात सरकारने असे म्हटले होतं की,  निरा राडिया आणि विविध लोकांशी केलेल्या संभाषणाच्या १४० वेगवेगळे टेप रेकॉर्ड हाती आल्याचं सांगितलं गेलं. तर दुसरीकडे, संभाषणाचा तपशील प्रकाशित करणाऱ्या ‘आउटलुक’ मासिकाने म्हटले होतं की, नीरा राडिया यांच्या संभाषणाच्या ८०० नवीन टेप मिळाल्यात. तत्कालीन सरकारने नीरा राडियाच्या संभाषणाच्या सर्व टेप सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या होत्या.

नीरा राडिया देशातील दोन बड्या उद्योगपती रतन टाटा आणि मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांसाठी जनसंपर्क काम करत आहेत, परंतु टेपनंतर असे म्हटले जात आहे की तिने प्रत्यक्षात या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट ब्रोकर म्हणून काम केले.

आतापर्यंत सार्वजनिक झालेल्या १४० टेप मधून हे निष्पन्न झालं होतं कि, ते त्यांच्या क्लायंट कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी पत्रकारांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांच्या ओळखीचा फायदा घेत होत्या.

त्यांच्या फोन टेप मधून अनेक लोकांची संभाषणं बाहेर आली होती.

१. वीर संघवी आणि नीरा राडिया यांच्यातील संभाषणाचे टेप… या टेपमध्ये वीर संघवी नीरा राडिया यांना म्हणतात कि, सोनिया गांधींची चावी माझ्याकडे आहे असा दावा करतात… देशाच्या मोठ्या प्रश्नांवर ते बोलतात जसे ते त्यांच्या सांगण्यावरून घडत गेल्या होत्या. वीर संघवी हे मुंबईच्या एका मोठ्या कुटुंबाचे सुपुत्र आहेत. ते  वयाच्या २२ व्या वर्षी पत्रकारितेत संपादक झालेत.

२-  एम. के वेणू. नीरा राडिया यांच्याशी त्यांचे संभाषण रेकॉर्ड झाले तेव्हा ते इकॉनॉमिक टाइम्सचे वरिष्ठ संपादक होते. त्यानंतर ते इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या फायनान्शियल टाइम्सचे व्यवस्थापकीय संपादक होते. वेणू साहेब अनेक मुद्द्यांवर राडियाशी बोलत असल्याचा त्यात उल्लेख आहे.

३. आयएएस अधिकारी सुनील अरोरा.  राजस्थान केडरचे आयएएस सुनील अरोरा, जे माजी मुख्यमंत्र्यांचे पीएस देखील राहिले आहेत, नीरा राडियासाठी बरेच काही करत असत. सुनील अरोरा नीरा राडियासाठी राजस्थानमधील अनेक जमीन प्रकरण हाताळले आहेत.

४.  इंडिया टुडेचे व्यवस्थापकीय संपादक शंकर अय्यर नीर.  निरा राडिया मुंबई आणि दिल्लीच्या अनेक मोठ्या संपादकांच्या संपर्कात असायच्या त्यात शंकर अय्यर आहेत. नीरा राडिया यांच्या प्रभु चावला, बरखा दत्त आणि वीर संघवी यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या टेप देखील इंटरनेट वर मिळून जातील.

असो अनेक टेप रेकॉर्ड आहेत…पण आत्ता आणखी एकदा नीरा चर्चेत आल्यात ते कारण म्हणजे पेंडोरा पेपर्स. आत्ताही त्यांचे पेंडोरा पेपर्स लीकमध्ये जी माहिती आहे त्यात देखील अस सांगितलं कि, अनेक कंपन्यांच्या नीरा या “मास्टर क्लायंट” म्हणून ओळखल्या जातात.  द इंडियन एक्सप्रेसमध्ये छापण्यात आलेल्या अहवालानुसार, या पेंडोरा पेपर्स मध्ये दिल्लीतील छतरपूर फार्ममधील नीरा राडिया यांच्या  पत्त्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे आणखी काय पुरावा सांगणे आता गरजेचं आहे.

 आत्ताच नाही तर २०१० पासूनच नीरा राडिया तपास यंत्रणांच्या हिटलिस्टवर आहे.

२०१० मध्ये जेंव्हा हे ऑडिओ टेप लीक  प्रकरण बाहेर आले होते, तेंव्हापासूनच नीरा राडिया तपास यंत्रणांच्या रडार वर आल्या होत्या.  त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी त्यांची जनसंपर्क फर्म वैष्णवी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स बंद केली होती. पण पेंडोरा पेपर्समध्ये त्यांनी त्यांच्या अनेक कंपन्या बंद करण्याचा उल्लेख आहे.

शेवटी नीरा राडिया कोण आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. 

नीरा राडिया एक प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉबीस्ट आहेत. ज्या अवघ्या १५ वर्षात अब्जाधीश बनल्यात. २G  घोटाळ्यासह अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या घोटाळ्यांमध्ये त्यांचे नाव आले होते.

निरा राडिया यांचा जन्म केनियामध्ये झाला. ती आधी नीरा शर्मा म्हणून ओळखली जात असे. आणि लंडनमध्ये तिच्या आई -वडिलांसोबत राहत होती. त्यांचे वडील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात नोकरीस होते. नीताने गुजराती वंशाच्या ब्रिटिश व्यावसायिका जनक राडियाशी लग्न केले आणि ती नीरा शर्मापासून नीरा राडिया झाली. परंतु त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही, जरी त्यांना तीन मुले होती पण तरीही नीराने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर ती भारतात आली.

आणि तेंव्हापासून ती भारताची राजधानी दिल्ली, छतरपूर येथे एका आलिशान फार्म हाऊसमध्ये राहत आहेत.

हिंदी वृत्तपत्रानुसार, नीरा राडिया १९९५ मध्ये भारतात आल्यात. आणि त्या वेळी त्या सहारा समूहासाठी  काम करायच्या. ही त्यांची भारतातील पहिली नोकरी होती. यानंतर, त्या यशाच्या पायऱ्या चढतच गेल्या. आणि हळूहळू ती भारतातील यूके एअर, केएलएम आणि सिंगापूर एअरलाइन्सची प्रतिनिधी बनली.

पण ते म्हणतात ना माणूस जितकं मिळतं त्यापेक्षा जास्त लोभी बनत जाते. तसंच राडियाच्या बाबतीत झालं. 

म्हणून राडिया इथेच थांबल्या नाहीत आणि क्राउन एक्सप्रेसच्या नावाने स्वतःची विमानसेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. ही गोष्ट १९९७  सालची आहे. तुम्ही कल्पना करू शकता की, राडियाने दोन वर्षात भारतात आपले वर्चस्व कसे प्रस्थापित केले. तोपर्यंत, राडिया केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अनंत कुमार यांच्या जवळच्या मैत्रिण बनल्या होत्या, ज्यामुळे राडिया यांना विमान खरेदी करण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची इच्छा होती.

पण झालं असं कि, अनंत कुमार यांच्याकडून नागरी उड्डाण मंत्रालय काढून त्यांना पर्यटन मंत्रालय देण्यात आले. आणि नीरा राडियाची विमान खरेदीची इच्छा अपूर्णच राहिली.

या काळात त्यांची भेट रतन टाटा यांच्याशी झाली आणि नंतरची स्टोरी सर्वांना माहितीच आहे. 

आता पेंडोरा पेपर्समध्ये त्यांचं नाव आल्यामुळे आता तरी त्यांच्यावर कारवाई होणार का कि त्यातूनही त्या सहीसलामत सुटतील हे पाहणे आता महत्वाचे आहे.

 हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.