इंडियन आर्मीच्या ऐतिहासिक बॅण्डने अमेरिका ते रशिया सगळं काही जिंकून दाखवलय

भारताची आर्मी जेवढी बेस्ट आणि ग्रेटय तेवढंच आर्मीचं बॅण्डसुद्धा टवकाय हे सव्वीस जानेवारीला नॅशनल डीडीवर बिटिंग रिट्रीट बघणाऱ्याला ठाऊक असल.

ह्या बँडच्या मागे तितकाच मोठा इतिहास दडलेला आहे.

अमेरिकन काळ्या लोकांची दर्दी गीतं ते पार गोविंदाच्या पिचरमधील गाणी, राष्ट्रगीत ते देवाच्या गाण्यांपासून तर इंग्रजी आर्मीने वापरलेल्या गाण्यांपर्यंत सगळं काही हा बॅण्ड वाजवू शकतोय.

१९८६ च्या जुलैमध्ये असंच भारताच्या नेव्हीमधील आयएनएस गोदावरी नौका अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळ २०० व्या  स्वातंत्र्य दिनानिमित्त आपलं सगळ्यात अमोघ शस्त्र घेऊन उतरली होती. काही वर्षांपूर्वीच अमेरिकेने आपली सैनिकी ताकद भारताविरुद्ध १९७१ च्या युद्धात वापरण्याची भाषा केली होती.

त्यामुळं ह्या नौकेवर भारतातील लोकांची बाजू मांडतानाच अमेरिकन नौदलाशी संबंध सुधारायची आणि पुन्हा सोयरीक जमवायची जबाबदारी होती ती ह्या अमोघ शस्त्राने नीट पेलली आणि अमेरीकन लोकांची माने जिंकली,

ते होते भारतीय नौदलाचे तेव्हा जगप्रसिद्ध झालेले बॅण्ड!

भारतातील सैन्याच्या ह्या बॅण्डला इंग्रज आले तेव्हापासूनची परंपरा आहे. मोझार्ट नावाच्या तिकडल्या शास्त्रीय माणसाची गुंगी आणणारी गाणी, पॉप संगीतातील मायकल जॅक्सनची गाणी, हिंदी पिच्चरची गाणी आणि शास्त्रीय संगीताचीही धून वाजवायचं कसब ह्या बॅण्डजवळ आहे. जॅक स्पॅरोच्या पायरेट्स ऑफ कॅरेबियनची ट्यून वाजवताना त्यांना ऐकणं म्हणजे मोठा अविस्मरणीय अनुभव आहे.

एरव्ही जी माणसं मोठमोठाले कॉन्सर्ट घेऊन रॉकस्टार झाली असती ती माणसं ह्या बॅण्डमध्ये राहून देशासाठी अन सैन्यासाठी जीव ओतून काम करतात.

जगातल्या जवळपास सगळ्या मोठ्या देशांमध्ये ह्या बॅण्डने गाणी विविध देशांच्या प्रमुखांकडून, अध्यक्ष-पंतप्रधानांकडून शाबासकी मिळवली आहे.

आजच्या घडीला भारताच्या सशस्त्र सेनेत जवळपास ५० मिलिटरी ब्रास बॅण्ड आणि ४०० तुकड्या फक्त पाईप आणि ड्रम कॉर्प्स (पिपाण्या, आपलं बॅगपाईपर आणि ढोल-ताशा सोबत वाजिवणारे) आहेत.

तिन्ही सेनादलांचें आपापले बॅण्ड सोडले तरीपण एक ट्राय-सर्व्हिस बॅण्ड म्हणून तिघांचा एकत्र बॅण्ड सुद्धा अस्तित्वात आहे. ह्यांनी जगभरात होणारे कित्येक म्युजिक फेस्टिवल गाजवले असून कितीक स्पर्धांमध्ये भारताची मान उंचावली आहे.

पुतिनमामांच्या रशियातील घरी क्रेमलिनबाहेर लाल चौकात दरसाली स्पॅस्काया टॉवर म्युजिक फेस्टिव्हलचे आयोजन करंण्यात येतं. ह्यात गेल्या साली मैदान गाजवताना आपल्या आर्मीच्या ७ अधिकारी आणि ५५ कलाकारांनी सादर केलेली गाणी सगळ्यात जास्त गाजली होती.

कलेला उचलून धरणारी रशियन माणसं दरवर्षी ह्या बॅण्डची आतुरतेनं वाट बघत असतात.

हा दबदबा असाच निर्माण झालेला नाही, तर त्याच्यामध्ये कितीतरी कष्ट घेऊन आर्मीने वर्षानुवर्षे मोठी गुंतवणूक केली आहे.

आर्मी एज्युकेशन कॉर्प्स ही संस्था भारतात सैनिकांना मिलिटरी म्युजी विंग मार्फत प्रशिक्षण देते. शिवाय मिलिटरी म्युजिक ट्रेनिंग सेंटर आणि इंडियन नेव्ही स्कुल ऑफ म्युजिक ह्याही संस्थांनी असे मोठे संगीतकार निर्माण केले आहेत.  ह्याशिवाय आर्मीच्या इंजिनियरिंग कॉलेजमधूनही अनेक सैनिकांना संगीताचं प्रशिक्षण दिलं जातं.

गिरीश कुमार उन्नीकृष्णन हे तिन्ही दलाच्या बॅन्डचे एकेकाळचे प्रमुख राहिले आहेत. रशियात त्यांनी सादर केलेल्या आविष्काराची अजून आठवण काढतात लोकं. हॅराल्ड जोसेफ तसेच वॉरंट ऑफिसर सुरेश कुमार, कॅप्टन नागरा अशा अनेक लोकांनी ह्या बॅण्ड मध्ये काम करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

“सारे जहाँ से अच्छा, जय भारती जय भारती, देश पुकारे जब सबको, वंदे मातरम, ध्वज के रक्षक” ही गाणी नंतर लोकांमध्येही फेमस झाली पण ह्याचं मूळ म्युजिक कम्पोजिशन करण्याचं काम सेनेच्या लोकांनीच केलं होतं.

काश्मिरात तर विविध ठिकाणांच्या नावावरून अनेकविध गाणी सैन्याने बनवली आहेत. मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या बॅण्डची गाणी तर अगदी आवर्जून ऐकायसारखी असतात.

जास्त कशाला, नमुना म्हणून हे गाणं एकदा वाजवून बघा. आर्मीमधलं सगळ्यात वर्ल्डफेमस म्हणजे गांधीजींचं फेव्हरेट सॉन्ग “अबाईड विथ मी” संध्याकाळी झेंडा उतरवताना हे गाणं हमखास वाजवलं जातं..

गांधीजींचं सर्वात आवडतं गाणं. त्यांच्याकडं कायम ह्या गाण्याची कॅसेट असायची असं त्यांच्यासोबत राहणारी लोकं सांगत. 

बिटिंग रिट्रीटला जेव्हा आर्मीवाला स्ट्रिंग्स आणि chord वल्हवत गात असतो “abide with me”  मंद काळीज कापत जाणाऱ्या सुरांत वाजत असतं राजपथावर. ऐकताना माणसाचं मन खुश होतं,

Abide with me; fast falls the eventide;
The darkness deepens; Lord with me abide.
When other helpers fail and comforts flee,
Help of the helpless, O abide with me.

भरभर सरणाऱ्या ह्या संध्याकाळी, जेव्हा अंधार अजून गहिरा होत जाईल, माझ्यासोबत राहाजेव्हा बाकी सगळे मदतीचे हात अपयशी ठरतील आणि सौख्य दूर जाईल करुणाकरा, असहाय्यांच्या तारणहारा – तू माझ्यासोबत राहा…….

थोडक्यात काय तर शस्त्र सोडून देखील जग जिंकता येत हे आपल्या आर्मीच्या बॅण्डने सहप्रमाण सिद्ध करुन दाखवलय.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.