मुंबईत वसलेलं ‘मढ आयलंड’ या कारणामुळे प्रसिद्ध आहे…

मुंबई आणि या शहराविषयी, मुंबई बाहेरच्यांना वाटणारी उत्सुकता ही काही ठराविक कारणांभोवती फिरते. म्हणजे मुंबईचं स्पिरीट, इथली माणसं, इथली गर्दी वैगरे तर झालंच पण इथे असणाऱ्या एकसोएक भन्नाट जागांविषयी सुद्धा लोकांच्यात उत्सुकता असते,

यापैकीच एक जागा म्हणजे मढ आयलंड. मुंबईतली मढ आयलंड ही एक अशी जागा आहे, ज्या जागेविषयी लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं.

आता आपल्याला साधारण एवढं माहित असतं की इथे मोठ्या लोकांची घरं आहेत, बरेच मोठे बंगले आहेत, आणि या एरियाच्या आजू बाजूला खूप समुद्रकिनारे सुद्धा आहेत. पण हा एरिया कायम एक सेंसेशन राहण्याची आणखीही काही कारणं आहेत ती कोणती आहेत ते पाहूया.   

मढ आयलंडच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेला मालाडची खाडी आहे. मढ आयलंड जवळ, अक्सा, मार्वे हे फेमस, तर इतर अनेक माहीत नसलेले समुद्रकिनारे सुद्धा आहेत, मढ चर्च आहे, किल्लेश्वर महादेव मंदिर आहे, मढ किल्ला आहे, एरंगळ नावाचं एक छोटसं गांव आहे, आणि इथं मोठ्या प्रमाणावर चालणारं मच्छी मार्केट सुद्धा आहे.  

थोडक्यात म्हणजे मुंबईचा हा परिसर छोट्या छोट्या मासेमारी करणाऱ्या गावांनी, मोठ्या मोठ्या बंगल्यानी, छुप्या समुद्र किनाऱ्यानी आणि ऐतिहासिक किल्ला, चर्च, आणि मंदिरांनी भरलेला आहे.

 

cq5dam.web .756.756

इकडले बंगले आणि समुद्र किनारे लोकांना विशेष भुरळ घालतात. इथे अक्सा आणि मार्वे नावाचे दोन मोठे समुद्रकिनारे आहेत. शिवाय लोकांना फार माहीत नसलेले असे दाना पानी, एरंगळ, मढ म्हणजेच सिल्वर हे सुद्धा बीचेस आहेत.

फार लोकांना माहीत नसल्यामुळे या समुद्र किनाऱ्यांना सीक्रेट बीचेस असंही म्हणतात. या सीक्रेट बीचेसवर तुम्ही गेलात की तो अख्खा बीच तुमच्याच मालकीचा असल्याचा तुम्हाला फील येतो. 

मढ आयलंडवर पूर्वीपासून, कोळी, रोमन कॅथलिक आणि इतर महाराष्ट्रियन लोकांचं वास्तव्य आहे. इथला मुख्य व्यवसाय मासेमारी आहे, त्यामुळे तुम्हाला या परिसरात उत्तम मासे मिळतात. 

मढ आयलंड हा एरिया सगळ्यात जास्त फेमस आहे तो इथे चालणाऱ्या डिस्को, क्लबिंग आणि पार्टीजसाठी. मढ हा एरिया मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरापासून फार लांब नाहीये तरीही तुम्हाला तिथे शांत, निवांत लाइफ जगता येतं आणि त्यामुळेच लोकांसाठी आणि खास करून मुंबईकरांसाठी मढ हा ऑप्शन, कायमच एक उत्तम गेटवे राहिलाय.

शिवाय इथे काय नाहीये? समुद्र आहे, निसर्ग आहे, फिरायला मंदिरं आणि चर्चेस आहेत, आणि मुख्य म्हणजे इथे, द रिट्रीट आणि द रिसॉर्ट नावाची दोन मोठी फाइवस्टार हॉटेल्स आहेत.

शिवाय ही फाइव स्टार हॉटेल्स वगळता अनेक छोटी छोटी हॉटेल्स सुद्धा मढच्या आजू बाजूच्या एरियात आहेत जिथे तुमचा २ दिवसाचा, राहण्याचा आणि खाण्या पिण्याच्या, खर्च ५ ते १ ०.००० रुपयात निघतो.

या जागेविषयीचं अजून एक महत्वाचं अॅट्रॅक्शन म्हणजे इथे असणारे अनेक फिल्म स्टुडिओज. फिर हेरा फेरी, बाझिगर, शूटआउट अॅट वडाला, मर्द, खलनायक अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचं शूटिंग मढ मध्येच झालंय. शिवाय, क्राइम पेट्रोल दस्तक आणि सीआयडी यासारख्या पॉप्युलर सिरिजचं शूटिंगही या एरियात करण्यात आलंय.

मुंबईला लागून असल्यामुळे इथे शूटिंगचं प्लॅनिंग आखणं सोयीचं पडतं, सिनेमटोग्राफीच्या दृष्टीने उत्तम लोकेशन्स इथे मिळतात आणि महत्वाचं म्हणजे इथे मिळणारी मोठी स्पेस यामुळे इथे शूटिंग करण्याला इंडस्ट्रीमधल्या लोकांचा जास्त प्रेफरन्स असतो.  

आता जाणून घेऊया मढच्या किल्ल्याविषयी. मढच्याच किल्ल्याला वेसावे किंवा वेसाव्याचा किल्ला असंही म्हणतात. मुंबईत जे काही ऐतिहसिक किल्ले आहेत त्यात जरा सुस्थितीत असणारा हा किल्ला आहे.

मढचा किल्ला, भारतावर जेव्हा पोर्तुगीजांचं राज्य होतं त्या काळात पोर्तुगीजांनी बांधला आणि १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी वसईच्या मोहिमेत जेंव्हा पोर्तुगिजांना उत्तर कोकणातून हाकलून लावलं तेव्हा हा किल्ला जिंकून घेतला होता. 

madh fort mumbai 1200x675 1

आता हा किल्ला नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आलाय आणि कोणालाही किल्ल्यावर जाण्यासाठी इंडियन एयर फोर्सची पर्मिशन घ्यावी लागते.

मढ जवळच असलेलं एरंगळ गांव आणि एरंगळचा समुद्रकिनारा सुद्धा आवर्जून पाहण्यासारखा आहे. आणि याच किनाऱ्याजवळ एक ५०० वर्ष जूनं संत बोनावेंचर चर्च सुद्धा पाहण्यासारखं आहे. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं जायचं कसं, तर मढ हा परिसर मुंबईतल्या वेस्टर्न सबर्बमध्ये असलेल्या मालाडजवळ येतो. मालाडहून तुम्ही बस किंवा रिक्शाने मढला जाऊ शकता. मढला जाण्यासाठी तुम्हाला वर्सोव्याहून फेरी सर्व्हिस सुद्धा अवघ्या ५ रुपयात उपलब्ध आहे.

तर ही होती मुंबईतल्या फेमस मढ आयलंड विषयीची थोडक्यात माहिती. तिथे कधी गेलात तर सांगितलेल्या सगळ्या जगांना भेट दिल्याशिवाय परत येऊ नका. 

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.