जैन साधूंची हत्या करून तुकडे बोअरवेलमध्ये टाकले. नेमकं प्रकरण काय आहे?

१६ एप्रिल २०२० या दिवशी एक बातमी आली आणि त्या बातमीने संपुर्ण देश हादरून गेला. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मुलं पळवण्याच्या संशयावरून दोन सांधूंची ठेचून हत्या करण्यात आली. मग तपास सुरू झाले त्यावरून राजकारणं पेटलं, चौकशा सुरू झाल्या. हे होतं तीन वर्षापुर्वींचं जुन प्रकरण. पण अशीच एक खळबळ माजवणारी घटना समोर आली ती कर्नाटक मधल्या बेळगावच्या चिक्कोडी तालुक्यातून, दिगंबरा जैन साधू कामकुमार नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली अशी बातमी समोर आली. आणि मग काय एकच गोंधळ उडाला. 

जैन धर्मातील लोकांनी संताप व्यक्त करत मोर्चे काढले आणि आंदोलनं करायला सुरवात केली. पुन्हा एकदा जैन मुनीच्या हत्ये वरून राजकारण पेटायलाही सुरवात झाली. पण हे काम कुमार नंदी महाराज आहेत कोन? त्यांची हत्या कशी झाली? तपास कुठपर्यंत आलाय आणि त्यावरून राजकारण कसं पेटलं या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत.

सुरवातीला आपण पाहू कामकुमार नंदी महाराज कोन होते. आणि त्यांचा इतिहास काय आहे.

कामकुमार नंदीजी महाराज यांचां जन्म ६ जुन १९६७ रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खबतकोन गावात झाला. दिक्षाघेण्याच्या पुर्वी त्यांचं नाव होतं भरमप्पाजी. भरमप्पाजी यांनी ब्रम्हचर्य व्रत करण्याचं ठरवलं आणि ते पोहचले महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आसलेल्या अकलूज येथे. त्यांनी आचार्य १०८ कुंथू सागरजी महाराज यांच्याकडून तेथे ब्रम्हचर्य व्रत केलं आणि त्यानंतर त्यांनी मुनीची दिक्षा घेण्याचं ठरवलं. 

त्यानंतर आपल्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी झारखंडमधील सम्मेद शिखरजी येथे २२ फेब्रुवारी १९८९ ला मुनी दीक्षा घेण्यास सुरवात केली. 

आणि २००९ मध्ये त्यांनां आचार्य ही पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी बेळगाव नजीक आसलेल्या चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमात त्यांनी राहायला सुरवात केली आणि तिथूनच त्यांनी जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला सुरवात केली. पण, ९ जुलै २०२३ ला बातमी आली की कामकुमार नंदीजी महाराज यांची हत्या करण्यात आली आणि या बातमीनं एकच खळबळ उडाली. पण अनेकाना एक प्रश्न पडलाय की.. 

 कामकुमार नंदीजी महाराज यांची त्यांची हत्या कशी झाली आणि हत्येच कारण काय आहे.

६ जुलै रोजी ते आपल्या नंदी पर्वत आश्रमातील खोलीत दिसले नाही. महाराज आपल्या आश्रमात न दिसल्याने त्यांच्या शिष्यांची चिंता वाढली. बराच शोध घेऊनही ते सापडले नाही तेव्हा आचार्य कामकुमार नंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमाप्पा उगरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस तपासात मुनीला त्या वेळात भेटण्यासाठी कोन आले होते याचा तपास केला गेला आणि नारायण माळी व हसन ढालायत या दोन संशियतांनां ताब्यात घेतलं. आणि चौकशी केल्याअंती त्यांनी आपणचं मुनीची हत्या केली असं स्पष्ट केलं. त्यानंतर तपास सुरू झाला. 

कामकुमार नंदी महाराजांची यांची आश्रमातच हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचा तपास पोलिसांनी सुरू केल्या नंतर. 

त्या दोघांनी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करूण रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे शेतातील बोअर मध्ये टाकले होते. पण जैन मुनीची एवढी निर्घृणपणे हत्या करण्याचं कारण तरी  काय? पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तपासात समजलं की आचार्य कामकुमार महाराज हे उसने पैसे देत होते. 

नारायण नावाच्या व्यक्तीने जैन मुनीकडून लाखो रुपये उसने घेतले होते, पण ते परत केले नाहीत. 

नारायण हा आश्रमाजवळ शेतीचे काम करायचा. पोलिसांनी सांगितले की, जैन मुनींनी पैसे परत करण्याचा आग्रह धरला तेव्हा नारायणने त्याचा ड्रायव्हर मित्र हसनच्या मदतीने त्यांची हत्या केली. परंतू या हत्येचे पडसाद संपुर्ण भारतात पसरलेली पहायला मिळाले. जैन समाजाच्या वतीने मोर्चे आंदोलनं करण्यात आली गेली. आणि आरोपींनां फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

हत्येवरून कर्नाटकासहीत देशातील काही भागात राजकारणं पेटलं आहे. 

पोलिस तपासात पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचं समोर जरी आलं असलं तरी देखील कर्नाटक मधील भाजप आक्रमक झाली आहे. या हत्येच्या मागे अजुन कोणी आहे का? याचा तपास करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. पण, काँग्रेस पाहिजे तेवढा तपास करत नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेचा तपास  सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली आहे. 

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या  नेतृत्वात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता.

 मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी सीबीआयकडे हे प्रकरण सोपवावं अशी मागणी केली होती. तसेच सभागृहात आवाजजही उठवला होता. यावर उत्तर देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी  कामकुमारनंदी महाराज यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीला हस्तांतर करत असल्याची घोषणा केली आहे. आणि या प्रकरणाची सखोल चौकशीही केली जाईल असं ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तपास तर सीआयडीला दिला आहे पण,

कामकुमारनंदी महाराज यांच्या हत्येचा तपास आलाय कुठपर्यंत हे पाहू..

मठात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून बोअरमध्ये टाकलेले मृतदेहाचे तुकडे काढण्यासाठी परिसरात यंत्रासह अनेक मोठ्या यंत्रांचा वापर केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. ७०० फूट बोअर असल्याने भोवती खोदकाम सुरू केलं गेलं . त्यानंतर ३० फुटांवर हे मृतदेहाचे तुकडे सापडले. पोलिसांनी ते तपासणीसाठी तसेच फॉरेन्सिक तपासासाठी बेळगावला पाठवले. बोअरमधील तुकडे काढण्यासाठी बेळगावसह, कारवार, हुबळी, धारवाड येथील ५०० कर्मचारी तपासात सहभागी होते. एसडीआरएफ, एफएसएल, आरोग्य पथक, पोलिस खाते यासह विविध खात्यांची यासाठी मदत सुरू आहे. 

पोलिस जैन मुनी वापर आसलेल्या सर्व वस्तुंची तपासणी करत आहेत. 

पोलिस तपासात समोर आलं आहे की जैन मुनी हे डायरी वापरायचे. आणि ती डायरी त्या आरोपींनी आगोदरच जाळुन टाकली आसल्याची माहीती मिळाली होती. आणि त्या डायरीची राख  तपासासाठी बंगरूळ येथे पाठवण्यात आली होती. पण तपासात ती राख डायरीची नसल्याचं समोर आलं होतं. त्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी करत ती डायरी ताब्यात घेतली आहे. त्या डायरीत आर्थिक गोष्टी लिहून ठेवल्याची शक्यता आसल्याचं पोलिसांचं म्हणंन आहे. आणि या डायरीतुन अजुनही काही आरोपींची नाव समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांचा तपास हा अजुनही सुरू आहे. 

पण, आता हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तपासातून आणखी काही गोष्टी समोर येतील आणि त्यातून आणखी कोन आरोपी आहेत आणि ही हत्या पैशाच्या प्रकरणातून झाली आहे. की आणखी काही हे स्पष्ट होईल.

पण या सगळ्यात कर्नाटकात पेटलेलं राजकारण आणि जैन समाजाचे निघणारे मोर्चे आणि होणारे आंदोलन या हत्येला जातीय वळण लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या बद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा.

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.