यू ट्यूबच्या निर्माणामध्ये एका बांग्लादेशी भिडूचा देखील हात आहे..

मागच्या वर्षी जेव्हा टिकटॉक सुरू होतं तेव्हा टिकटॉकर्स विरुद्ध यू ट्युबर्स यांच्यात तुफ्फान भांडणं रंगली होती. टिकटॉकचा कन्टेन्ट भारी की यू ट्यूबचा कन्टेन्ट भारी पण कुणी कितीही वाद घातले तरी यू ट्यूब निश्चितपणे टॉपला आहे. कुठलाही व्हिडिओ पाहायचा असेल तर सगळेजण यू ट्यूबकडे धाव घेतात. जुन्यातला जुना आणि लेटेस्ट मधला लेटेस्ट व्हिडिओ फक्त आणि फक्त यू ट्यूबला घावतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की यू ट्यूब कोणी बनवलं आणि त्याला गुगलने कधी विकत घेतलं ? तेही सोडा पहिला you tube व्हिडिओ कोणी पोस्ट केला होता त्याबद्दलचा आजचा किस्सा.

खरंतर you tube ला बनवलं होतं बांगलादेशी वंशाच्या जावेद करीम या तरुणाने तेही आपल्या मित्रांची मदत घेऊन. 2006 साली you tube ची वाढती लोकप्रियता बघून गुगलने त्याला विकत घेतलं. जावेद करीम 1979 साली जर्मनीत जन्मला त्याची आई जर्मन तर वडील बांग्लादेशचे होते. शिक्षण घेऊन कॉम्प्युटर सायन्स त्याने निवडलं. कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केल्यावर मित्रांची त्याला चांगली संगत लाभली आणि मोठा इतिहास घडला.

आता जावेद करीमच्या डोक्यात यू ट्यूब बनवण्याची आयडिया कशी आली ?

तर you tube बनण्याची सुरवात झाली 2004 सालापासून. 2004 साली हिंदी महासागरात एक भयंकर त्सुनामी आली. यात प्रचंड नुकसान झालं होतं. त्सुनामी बद्दल जावेद करीमला माहिती करून घ्यायचं होतं म्हणून तो सोशल मीडियावर तो व्हिडिओ शोधू लागला, अनेक वेबसाईटवर त्याने चेक केलं पण त्सुनामीचा व्हिडिओ त्याला काय सापडला नाही. मग यावर उपाय म्हणून जावेदने विचार केला की आपण असं काहीतरी बनवू जेणेकरून लोकं त्यांना हवा तो व्हिडिओ हव्या त्या वेळी पाहू शकतील.

You tube बनवायचं फॅड जावेद करीमच्या डोक्यात शिरलं होतं. आपले दोन मित्र चाड हर्ले आणि स्टीव्ह चॅन यांच्या मदतीने त्याने एक नवीन साईट बनवली. त्या साईटवरून व्हिडिओ शेअर करता येऊ शकेल अशी सोय करण्यात आलेली होती. 14 फेब्रुवारी 2005 रोजी you tube डॉट कॉम नावाने जावेद करीमने डोमेन नेम रजिस्टर केलं.

23 एप्रिल 2005 रोजी मोठा इतिहास घडला. जावेद करीमने you tube वर पहिला व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओचं नाव होतं मी ऍट द झु. 18 सेकंदाचा हा व्हिडीओ you tube जगतातला पहिला व्हिडिओ ठरला. मे 2005 मध्ये वेबसाइटचं बीटा व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आणि डिसेंबर 2005 साली you tube पब्लिक करण्यात आलं. 9 ऑक्टोबर 2006 साली घोषणा करण्यात आली की गुगल 1.56 बिलियन डॉलरला स्टॉकमध्ये you tube ला विकत घेत आहे. ही त्यावेळची सगळ्यात मोठी डिल मानली गेली.

आजही you tube मार्केटमध्ये गुगल नंतर प्रसिद्धीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.