भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीची प्रेरणा सावरकरांना इटलीमधून मिळाली होती.
देशप्रेमाच्या भावनेने झपाटलेले लोकचं क्रांती घडवतात, देशाला एका वेगळ्या आणि योग्य दिशेला नेण्याचा प्रयत्न करतात. जगात अशा प्रकारचे अनेक लोक होऊन गेले ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं पण आपलं कार्य पूर्ण करूनच ते थांबले. अशाच एका राष्ट्रभक्ताचा आजचा किस्सा.
जोसेफ मॅझिनी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जोसेफ मॅझिनीला आदर्श मानले होते. मॅझिनीचा मोठा प्रभाव सावरकरांवर होता.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर्श असलेला जोसेफ मॅझिनी नक्की कोण होता ? जोसेफ मॅझिनीला इटलीचं धडधडतं हृदय मानलं जातं. इटली देशाचं एकीकरण करण्यात जोसेफ मॅझिनीचा सिंहाचा वाटा होता. हे सगळं त्याने कसं मिळवलं आणि इटलीचं नवनिर्माण कसं केलं याविषयी आपण जाऊन घेऊया.
२२ जून १८०५ मध्ये जोसेम मॅझिनीचा जन्म इटलीतल्या जिनोव्हा शहरात झाला. बालपणापासून त्याला वाचायचा जबर छंद होता. विद्यार्थी दशेत असताना त्याने निबंध आणि पुस्तक परीक्षणे लिहिणं सुरु केलं. तब्येत साथ देत नसताही त्याने वकिली पूर्ण केली. ऑस्ट्रियन साम्राज्यशाहीतून इटलीची मुक्तता करण्यासाठी त्याने १८३० मध्ये कार्बोनारी या गुप्त संघटनेत तो सामील झाला. त्यामुळे त्याला जेलात डांबण्यात आलं. पण पुराव्याअभावी तो सुटला.
तुरुंगात असतानाच त्याने ठरवलं होतं कि फ्रान्सला राहून पुढच्या योजना आखायच्या. फ्रांस देशाच्या मार्सेमध्ये तो राहू लागला. पण त्याच्यातला देशभक्त काय गप्प बसत नव्हता. त्याने थेट पिडमॉण्टच्या गादीवर नव्यानेच आलेल्या चार्ल्स अल्बर्ट राजाला पत्र लिहिलं कि पिडमॉण्टला संवैधानिक शासन द्यावं आणि इटलीवर स्वातंत्र्यलढ्यात पुढाकार घेऊन राज्य करणाऱ्या ऑस्ट्रियन लोकांना हाकलून लावावं.
यावर राजा अल्बर्टने मॅझिनीला अटक करण्याचे आदेश दिले. पण जोसेफ मॅझिनीने आक्रमक धोरण स्वीकारलं आणि त्याने मार्सेच्या दोन वर्षांच्या वास्तव्यात परकीय सत्तेपासून तसेच अंतर्गत जुलूमांपासून स्वतंत्र व लोकशाही राष्ट्र म्हणून संयुक्त इटलीच्या स्थापनेसाठी इटालियन नागारिकांना संघटित करून ‘ यंग इटली ‘ ही कार्बोनारीपेक्षा जहाल क्रांतिकारक संघटना स्थापन केली.
तरुण लोकांमध्ये या संघटनेची जबरदस्त क्रेझ होती. या संघटनेत सुरवातीला तब्बल ६० हजार लोकं सामील झाली होती. १८३४ मध्ये जर्मन, पोलंड, आणि इटलीतील हद्दपार झालेल्या लोकांना सोबत घेऊन त्याने लढाऊ पथक तयार केले आणि इटलीवर राज्य करणाऱ्या लोकांवर हल्ला चढवला पण अंतर्गत वादामुळे तो अयशस्वी झाला. त्याला तिथल्या सरकारने फाशीची शिक्षा सुनावली. पण तो काय हाती लागला नाही.
प्रत्येकी देशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगण्याचा हक्क आहे असा जोसेफ मॅझिनीचा बाणा होता.
त्याने अनेक गुप्त संघटना तयार केल्या होत्या. पुढे तो लंडनमध्ये राहू लागला. तिथे इंग्रजी भाषा शिकून त्याने तिथल्या साहित्याचा अभ्यास केला. लंडनमधील इटलीच्या मुलांसाठी त्याने शाळा सुरु केल्या. अनेक देशांशी संबंध त्याचा येत गेला. सतत प्रवास आणि एका देशात न राहणे यामुळे अनेक लोकांशी त्याची ओळख वाढली. इतकीतल्या नागरिकांना त्याने एकत्र केलं आणि बंड केलं.
पुढे नागरिकांच्या एकत्रीकरणामुळे इटली स्वतंत्र झाली आणि मॅझिनीच्या प्रयत्नाने व्हेनिस आणि रोम हि शहरे इटलीत समाविष्ट झाली. पुढे त्याने त्याचं उर्वरित आयुष्य मानवतावादाचा प्रसार करण्यात घालवलं. इटलीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. अनेक लेख आणि नियतकालिकांमध्ये विपूल लेखन करूंन त्याने जनमाणसांमध्ये क्रांतीची ठिणगी पेटवली.
ऐन तारुण्यात त्याला लोकप्रियता लाभली खरी पण एकेकाळचे त्याचे सहकारी त्याच्या अशा बंडांमुळे त्याला इटलीचा शत्रू मानू लागले. अराजकतावादाची संकल्पना मॅझिनीला मान्य नव्हती. पुढे १० मार्च १८७२ मध्ये तो प्ल्युरसीच्या रोगाने मरण पावला.
विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी जोसेफ मॅझिनी हा प्रेरणास्थान होता. इतकेच नाही तर लाला लजपतराय यांचीसुद्धा ते आदर्श होते. द ड्युटी ऑफ मॅन या इंग्रजी पुस्तकाचा लाला लजपतराय यांनी उर्दूमध्ये अनुवाद केला. सावरकरानी त्यांचं जोसेफ मॅझिनी नावाने चरित्र लिहिलं.
इटालियन राज्यक्रांतीत जोसेफ मॅझिनीचं योगदान अतुलनीय आहे आणि इतरांना प्रेरणादायी असंच होतं.
हे हि वाच भिडू :
- या घटनेपासून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली.
- लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता .
- इंदिरा गांधीनी सावरकरांच्या स्मारकाला वैयक्तिक खर्चातून ११ हजार रुपयांची देणगी दिली होती.
- बाबाराव सावरकरांनी मोहम्मद अली जिनाची ५० हजाराची सुपारी दिली होती?