पत्रकार ते राजकारणी आपचे गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी कोण आहेत ?

गुजरात मध्ये गेली २७ वर्ष भाजपची एकहाती सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड असणाऱ्या गुजराच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. गुजरात विधानसभेच्या मागच्या सगळ्या निवडणुकीत भाजप काँग्रेस असाच सामना राहिला आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच गुजरात मध्ये भाजपाला काँग्रेस ऐवजी आप पक्ष ठक्कर देईल असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर गुजारत मध्ये आप मुख्यमंत्री म्हणून कोणाचा चेहरा देईल याची चर्चा रंगली होती. यात गोपाळ इटालीय यांचे नाव आघाडीवर होते. गेल्या महिन्यात अरविंद केजरीवाल हे गुजरातच्या दौऱ्यावर असतांना इटालीय यांच्या घरी जाऊन जेवले होते. त्यामुळे आपकडून इटालीया यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी देण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

मात्र शुक्रवारी आपने गुजरातचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून इसुदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे.    

कोण आहेत इसुदान गढवी. पत्रकार असणाऱ्या गढवी यांचा राजकीय प्रवास कसा होता ते पाहुयात 

इसुदान गढवी हे गुजरात मधील पिपलीय येथिल असून १० जानेवारी १९८२ झाला. पिपलीय हे गाव रौराष्ट्र मधील राजकोट जिल्ह्यात येत. त्यांनी गुजरात विद्यापीठातून मास मीडिया आणि पत्रकारितेत पदवी मिळविली. सुरुवातीला ते दूरदर्शनमध्ये होते. योजना का कार्यक्रमाचे नियोजन करत. त्यानंतर गढवी यांनी स्थानिक न्यूज चॅनल मधून पत्रकारितेला सुरुवात केली.

गुजारत मधील सगळ्यात कमी वयाचे संपादक म्हणून सुद्धा गढवी यांना ओळखलं जातं. इसुदान गढवी V TV मध्ये संपादक होते. महामंथन या कार्यक्रमामुळे गढवी यांना गुजरात मध्ये चांगलेच ओळखले जाऊ लागले. 

इसुदान गढवी यांनी राजकीय कार्यकिर्द सुरु करून फक्त दिड वर्ष झाले आहे.

 त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत १४ जून २०२१ रोजी आम आदमी पक्षात प्रवेश केला.  त्यानंतर लगेच आपचे राष्ट्रीय सह-सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. गुजरातमधील ‘आप’चे तळागाळातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

 गुजरात निवडणुकीपूर्वी गढवी हे आप मध्ये प्रवेश करणार असा कयास २०२० मध्येच मांडण्यात आला होता. कारण त्यांची केजरीवाल यांच्याशी जवळीक वाढत चालली होती. तसेच केजरीवाल यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी गढवी एक आहेत. पत्रकार असल्याने त्यांना राज्याची बरीच माहिती आहे. त्यामुळे उमेदवारांचे तिकिट वाटप, रणनीती ठरविण्यात गढवी हे महत्वाची भूमिका बजावत आहेत.

गढवी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, त्यांनी आप पक्षात प्रवेश केल्यानंतर गुजारत मध्ये ५ लाख लोकांनी आप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांची सभा जिथे असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे गढवी यांनी सांगितले.

गुजरात मधील ग्रामीण भागात गढवी हे खूप लोकप्रिय असल्याचे सांगितलं जातं.

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि गुजरातचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमधील १६ लाख ४८ हजार ५०० लोकांनी आपले मत दिले आहे. गुजरातमधील १६ लाखांहून अधिक लोकांच्या मताच्या आधारे त्यांनी निर्णय घेतला आहे. येथील जनतेने इशुदान गढवी यांची निवड केली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेच असतील.

 गुजरात बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले. ‘आप’ हे नवे इंजिन, नवी आशा असल्याचे म्हटले आहे. 

 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.