चॅटरूममध्ये एक मॅटर झाला आणि अचानक कंगनाताई स्वतःला हॉट संघी म्हणवून घेऊ लागल्या..

सध्या मार्केटमध्ये हॉट संघी हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. बघेल तिथे ट्विटरवरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हॉट संघी, संघीमॅन, संघी वूमन असले टॅग टाकून फोटो शेअर करत आहेत. ट्विटरवर भक्त आणि लिब्रलस यांचा या हॅशटॅगवरून भांडणं होतं आहे.

याची सुरवात होते क्लब हाऊस चॅट या अॅपमधून.   

‘क्लब हाऊस चॅट’ हे एक ऑडियो बेस्ड सोशल मीडिया अॅप आहे , जे सध्या जोरदार  ट्रेंड होतंय. त्यामागचं कारण म्हणजे ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिप्स. ज्यात  संघाशी जोडलेल्या लोकांबद्दल वादग्रस्त गोष्टी बोलल्या गेल्यात. शेवटी  यानंतर सोशल मीडियावरचं वातावरण तर तापणारचं  ना भिडू.  आणि हि काय पहिली वेळ नाही. गेल्यावर्षीच लॉंच झालेल्या या अॅपमुळे दुसऱ्यांदा अश्या प्रकारची घटना घडलीये.

ऐन मतदानाच्या टायमालाच राजकीय गोंधळ उडाला होता

दोन महिन्यापूर्वीच पश्चिम बंगाल निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानादिवशी  या क्लब हाऊस चॅटवरची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर पंतप्रधान मोदी  यांच्या लोकप्रियतेबद्दल आणि ममता बॅनर्जी यांच्या अँटी इनकंबेंसीच्या भीतीबद्दल  बोलत होते. या व्हायरल क्लिप नंतर राजकीय खळबळ उडाली होती.

ज्यानंतर  प्रशांत किशोर यांनी म्हंटल होत कि,

“मला आनंद आहे कि, भाजप आपल्या नेत्यांपेक्षा माझ्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत. हा  तर फक्त एक हिस्सा आहे, भाजपनं हिम्मत दाखवून आपल्या आयटी सेलला  क्लब हाऊस चॅटची पूर्ण क्लिप रिलीज करायला सांगितली पाहिजे. फक्त थोडा भाग रिलीज करून हवेत नाही जायला पाहजे.’

आता आणखी एक व्हायरल क्लिप

यानंतर १० जून २०२१ ला परत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये. ज्यामुळे संघाच्या भावना दुखावल्यात. या व्हायरल  ऑडिओ क्लिपमध्ये संघाच्या पुरुष आणि महिलांबाबत घाणेरड्या  शब्दांचा वापर  केलाय.

हि चॅट सुरु झाली ‘डू वी ओन्ली डेट हॉट पीपल’?’ या पॉईंटवर.  यात एक मुलगी विचारते , ” नीरज तू फक्त  हॉट लोकांनाच डेट करतो का? ज्याच्या उत्तरात नीरज कदमबूर सांगतो, ‘नाही, मी सगळ्या प्रकारच्या लोकांना डेट करतो, पण डेटिंग अॅपवर मी हॉट संघी टाईपवर जास्त जोर देतो.’

नीरजच्या या बोलण्यावर चॅटरूमवर एकच हशा पिकतो, ज्यात काही मुलींचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर एक मुलगी म्हणते, ‘संघी हॉट नसतात.’ यावर उत्तर देत नीरज म्हणतो, ‘ अरे यार,पण ते दिसतात हॉट ..’

नीरज आणि मंडळी चॅट करत राहिली आणि त्यांचा हा ऑडीओ व्हायरल झाला.

पण  व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर लोक भडकले. संघाच्या लोकांच्या भावना दुखावल्या. सगळ्यात आधी त्या नीरज आणि कंपनीला तुफान शिवीगाळ झाली. ट्विटरवरचे पीपल स तत याच्या विरुद्ध बोलताना दिसू लागले.  मात्र इथे थांबला नाही तर आम्ही पण हॉट आहे हे सांगायची चढाओढ सुरु झाली. भावना दुखावलेले लोक ट्विटरवर संघी मॅन आणि संघी वूमन असे हॅशटॅग वापरून आपले फोटो शेअर करतायेत. त्यामुळे हे दोन हॅशटॅग भारतात मोठ्या प्रमाणात ट्रेंड होतायेत.

यात अभिनेत्री कंगना रानौतने सुद्धा उडी घेतलीये.आता बिचार्या ताईंना ट्विटरने बॅन केलंय, त्यामुळे इन्स्टा स्टोरीचा आधार घेत तिने  हॅशटॅग हॉट संघी लिहीत आपला बोल्ड फोटो पोस्ट केलाय. यासोबतच तिने लिहिलंय,

‘लिब्ररल सांगतात कि, संघी वूमन हॉट नसतात.

Me: Hold My Beer

kangana bikini

या सगळ्या प्रकरणात कुशा कपिला नावाची एक युट्युबर देखील सापडली. क्लब हाऊसच्या चॅट रूममध्ये हि चर्चा सुरु होती तेव्हा ती देखील त्या ग्रुपमध्ये हजर होती. स्वतःला फेमिनिस्ट म्हणवून घेणारी कुशा असली अश्लील चर्चा सुरु असताना शांत कशी बसली हा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला. यावर कुशा कपिलाने ट्विटरवरून उत्तर दिलं की,

ज्या नीरजमुळे हि चर्चा सुरु झाली तो गे आहे. तो वेगळ्या पोलिटिकल आयडॉलॉजीच्या गे लोकांच्या हॉट दिसण्याबद्दल बोलतोय, महिलांबद्दल नाही.

एकूणच हे हॉट संघी प्रकरण राजकारणापासून ते स्त्रीवाद, समलैंगिकवाद इथं पर्यंत पोहचलं.

या वादाची सुरवात झाली ते क्लबहाऊस नेमकं काय आहे? 

हे एक ऑडियो बेस्ड अॅप आहे. जे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात लॉंच केले होते. या अॅपमध्ये अनेक प्रकारची चॅटरूम असतात, जिथे वेगवगेळ्या विषयांवर चर्चा केली जाते. यात लोक आपल्या आवडीनुसार कोणत्याही क्लबच्या चर्चेत भाग घेऊ शकतात. पण कोणत्याही चॅटसाठी बनलेल्या क्लबमध्ये आपण स्वताहून भाग नाही घेऊ शकत, त्या क्लबचा मॉडरेटरच आपल्याला त्यात जॉईन होण्यासाठी इनवाइट  करतो. 

दरम्यान या अॅपला कमी वेळातच खूप जास्त प्रसिद्धी मिळालीये. देशात लॉन्चिंगच्या पाच दिवसांच्या आतच ते एक लाखाहून अधिक लोकांनी डाउनलोड केलय. तर जगभरात याचे कोट्यवधी वापरकर्ते आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.