कॉंग्रेसचा आऊटसोर्सिंग पॅटर्न ! कन्हैया, जिग्नेशच्या रुपात पक्षाला तरुण नेतृत्व मिळणार ?

राजकीय वातावरण कधी काय घडेल आणि कधी काय बातमी येईल सांगता येत नाही. तसच काहीसं घडलं आहे आपल्या देशाच्या राजकारणात… कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी असे तरुण नेते कॉंग्रेसमध्ये जाण्याची चर्चा चालू आहे. सीपीआयचे नेते कन्हैया कुमार यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दोन वेळा भेट घेतल्याच्या वृत्तामुळे या चर्चांना वेग आला आहे.

राहुल गांधी आणि कन्हैया कुमार यांची निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीत दोन वेळा भेट झाल्याचेही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसला तरुण नेतृत्व मिळण्याची  शक्यता असल्याचं असल्याचं बोललं जात आहे.

आगामी काळात येणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाच्या ठरणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केलीये. आणि याच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहार काँग्रेसमध्ये कन्हैया कुमार यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तिथे राजकीय संधी म्हणून बिहार काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष त्यांना दिलं जाऊ शकतं.

कन्हैया कुमार लवकरच काँग्रेससोबत आपली राजकीय एंट्री करण्याची शक्यता आहे.

कन्हैया कधी आणि कोणत्या पदासोबत पक्षात सामील होईल याच्याशी निगडीत अनेक तर्क वितर्क लावले आहेत. पण त्यांची आणि राहुल गांधींच्या भेटीच्या बातमीमुळे हि चर्चा अंतिम टप्प्यात आहे असं म्हणायला हरकत नाही.

कारण काही मिडिया रिपोर्टनुसार प्रशांत किशोर याचं कॉंग्रेसच्या रणनीतीबाबत असं म्हणन आहे कि, कॉंग्रेसमध्ये आता जुन्या नेत्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता तरुणांना राजकीय संधी दिल्या गेल्या पाहिजेत असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिल्याचे सांगितले गेले आहे. त्यात कन्हैया कुमार हे जरी काही काळापासून राजकारणात फारसे सक्रीय नाहीत पण त्यांच्या भाषण देण्याच्या शैलीचा कॉंग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो. कन्हैया नेहेमीच त्याच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत असतो, मुद्देसूद आणि हुशारीने आपले म्हणणे मांडतो. त्यामुळे त्याच्या भाषणाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

आणखी एक म्हणजे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे देखील अलीकडच्या काळात काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

आमदार जिग्नेश मेवानी यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा देखील याच अनुषंगाने आहे. गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत जिग्नेश यांच्यासारख्या तरुण नेत्यांना निवडणूक प्रचाराची कमान दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. 

या याधी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मेवानीला तिकीट दिले नव्हते. म्हणून मेवानी अपक्ष उमेदवार म्हणून उत्तर गुजरात च्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून उभे राहिले होते. पण या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसने  त्यांना मदत केली होती. 

आउटसोर्सिंगची ही प्रक्रिया काँग्रेसमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्या कॉंग्रेस प्रवेशापासून सुरू झाली होती.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले आणि आल्याबरोबर मोठी जबाबदारी म्हणून  पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारलं गेलं.

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तांनुसार, कन्हैया कुमारच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, कन्हैयाने मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये कन्हैयाच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची  समजते.

कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशाचा एकच अर्थ सद्या काढला जातोय कि, बिहारमध्ये कॉंग्रेसला आपले वजन निर्माण करायचे असेल तर त्यांना कन्हैयाच्या रुपात एक नेतृत्व मिळेल. असंतीन ही गेल्या दशकांपासून कॉंग्रेसने बिहारमध्ये काही खास जादू दाखवू श्ली नाही. जर कन्हैया कॉंग्रेसमध्ये आला तर बिहार कॉंग्रेसचे दिवस बदलू शकतात असा दावा काही कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. 

अलीकडेच कॉंग्रेसचे तरुण चेहरे असणारे ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडला. त्यामुळे हि पोकळी भरून काढायची असेल तर जिग्नेश मेवानी आणि कन्हैया कुमार चा कॉंग्रेस प्रवेश पक्षाला जीवदान देणारं ठरू शकते.

आणि असंही नाहीये कि याचा फायदा फक्त कॉंग्रेसलाच होईल. कन्हैयाने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला तर त्याचे राजकीय वजन तर वाढणारच शिवाय कॉंग्रेस सारखे व्यासपीठ मिळेल, कॉंग्रेस ला या कठीण काळात वर आणण्याची भूमिका त्याने निभावली तर पुढे जाऊन पक्षात त्याला मोठं स्थान देखील मिळू शकतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.