पावसाचा धोका वाढलाय जाणून घ्या रेड, ग्रीन, यलो अलर्टचा अर्थ काय असतो?

तुम्ही बातम्या ऐकताना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देत अलर्ट जारी केला आहे असं ऐकलं असेल. पाऊस, अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीनुसार रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? त्याची सुरवात भारतात कधी पासुन झाली. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

सुरवातीला पाहूया हि अलर्ट सिस्टिम कशी सुरु झाली याबद्दल. तर हे  आहेत चार वेगवेगळे अलर्टस, पण हे अलर्टस भारतात कधी पासुन सुरू झाले आणि याच रंगांची निवड का केली गेली. 

ही माहीती जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या टीमने हवामान तज्ञ कृष्णानंद  होसाळीकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले 

“ की याची सुरवात हवामान विभागाने २०१६-२०१७ या वर्षात केली आहे. आणि या रंगाची कोडींग यासाठी केली गेलेली आहे, या आगोदरही हे रंग काही ठीकाणी सुचना देण्यासाठी दिले गेलेले आहेत. या आगोदर या रंगाचा वापर सिंगन्ल वर देखील केला गेलेला आहे. आणि जनसामन्यात हे रंग प्रचलित आहेत. लोकांना रेंड रंग म्हणलं की धोका समोर दिसतो. आणि इतर रंगा पेक्षा हे रंग डार्क आणि दिसायला स्पष्ट असतात म्हणून या रंगाची निवड केली गेलेली आहे”

थोडक्यात रोडवरीळ सिग्नलला जे लॉजिक आहे थोडंफार तसंच लॉजिक इथेदेखील आहे. 

पहिल्यांदा पाहू रेड अलर्ट म्हणजे काय, आणि तो कधी दिला जातो..

१ तासात ३० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आणि पुढील २ तासात पाऊस जर सुरू रहाणार असेल तर हा रेड अलर्ट दिला जातो. ज्या वेळी जीवन आणि मालमत्तेची हानी होणार असेल तेंव्हा हा अलर्ट दिला जातो. रेड अलर्ट म्हणजे एक प्रकारे धोक्याचे चिन्हचं असतं. एखाद्या भागात अतिमुसळधार पावसाचा किंवा अतिवृष्टीचा इशारा दिला जातो, तेव्हा तिथे रेड अलर्ट जारी केला जातो.

आणि त्या परिस्थितीत नागरिकांना शक्यतो घरीच राहण्याच्या सूचना दिल्या जातात. तीव्र लाटांची शक्यता असल्यावरही हा अलर्ट जारी केला जातो. हा इशारा पावसाळ्यातचं न देता नैसर्गिक अपत्ती कोणतीही असो हा इशारा देण्यात येतो. एका वाक्यात सांगायचं झालं तर लोकांनां सतर्क राहण्यासाठी हा इशारा दिला जातो. धोका आधिक आसल्याने ह्या अलर्टच्या माध्यमातून महत्वाची सुचना दिले जाते.

यांनंतर पाहूयात ऑरेंज अलर्ट म्हणजे काय आणि तो कधी दिला जातो.

१ तासात १५-३० मिमी पाऊस पडला आणि पुढील काही तासात अजुनही एवढा पाऊस पडणार असेल तर हा अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्टला पुर्व कल्पना देणार अलर्ट म्हण्टलं जात. कोणत्याही परीस्थितीत नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगणारं हे अलर्ट असतं. या अलर्ट मध्ये विज पुरवठा खंडीत होणं, वाहतूक ठप्प होणं यासारखे प्रकार घडू शकतात, जेणे करून तुमच्या दरोरोजच्या रूटीनला यामुळे अडथळा निर्माण होऊन, गैरसोईला तुम्हाला सामोरं जावं लागु शकतं. या अलर्टमध्ये महत्वाच्या कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका असं देखील सांगितलं जातं.

आता येऊयात यलो अलर्टकडे..यलो अलर्ट काय असतो त्याचं काम काय आहे

७.५-१५ मिमी पाऊस सुरू असेल आणि पुढील २ तास सुरू राहणार असेल तर हा अलर्ट दीला जातो. यलो अलर्टचा मुख्य हेतू असतो तो सावध करण्याचा. मुसळधार पावसासाठी किंवा काहीवेळा विजांच्या कडकडाटासह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्यास तर यलो अलर्ट जारी केला जातो. नागरिकांनी जिथे असाल तिथे सावध राहावं असं सांगितलं जात, आणि त्यांची दैनंदिन कामे रखडू शकतात आणि ते रखडू नये यासाठी असा संदेश देणारा हा अलर्ट असतो.

आता पाहूयात शेवटचा अलर्ट तो म्हणजे ग्रीन अलर्ट

हा अलर्ट म्हणजे कमी धोका असतो. सामान्य परीस्थीत दर्शवण्यासाठी हा अलर्ट काम करतो. ज्या भागात कसल्याही प्रकारचा धोका नाही. आणि जरी असेल तर लवकर तो धोका कमी होईल आणि या परीस्थीत कुठलेही निर्बंध नाहीत असा इशारा दर्शवणारा हा ग्रीन अलर्ट आसतो.

हे होते आपत्तीच्यावेळी दिले जाणारे सर्व अलर्टस, या अलर्टसमुळे पूर्व सुचना मिळत आसल्या कारणाने अनेकांनां सोयीचं झालं आहे. अनेक संकटांतून वाचवण्याचं काम या अलर्टसच्या माध्यामातून झालं आहे. अनेक प्रकारच्या अपत्तीमध्ये बचाव करणं यामुळे सोप्पा झालेलं आहे. आणि यामुळे प्रशासन देखील सतर्क होतं आणि नागरीकांना पर्यटन कींवा काही महत्वाच्या स्थाळावर जाण्यासाठी बंदी घातली जाते. या अपत्ती परीस्थीत दिल्या जाणाऱ्या अलर्टस बद्दलची माहीती तुम्हाला कशी वाटली यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.