सख्खे भाऊ पक्के वैरी असलेल्या कोरियाच्या फाळणीचा हा किस्सा….

नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया हे दोन देश सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत. क्षेपणास्त्र डागणे असो किंवा हसण्यावर निर्बंध लावणे असो असे अनेक प्रकार कोरियाच्या बाबतीत दिसून येतात. एकेकाळी हे दोन्ही देश एकाच आईचे मुलं होते पण आपापसातील वाद आणि हेवेदावे नडले आणि कोरियाची फाळणी झाली. या फाळणीविषयी आपण जाणून घेऊया आणि सोबतच कोरियाचा पुर्वतीहासही बघूया.

ख्रिस्तपूर्व 2333 मध्ये डँगन वँगन या देवदूताने गोजोसिएन साम्राज्याची कोरियात स्थापना केली, असे ‘कोरियन पुराणा’त म्हटले आहे. कोरियाची कहाणी सिला घराण्याच्या काळापासून सुरू झाली. सुमारे ९०० वर्षांच्या सिला राजवटीच्या कालावधीत कोरियन द्वीपकल्पात चीन आणि जपानपासून जगाच्या नकाशावर वेगळी मजबूत ओळख होती. पण विसाव्या शतकात सिला राजघराण्याची पकड कोरियावर बरीच कमजोर होऊ लागली.

कोरिया द्वीपकल्पात सुमारे दीड दशके वर्चस्व गाजवल्यानंतर १९१० मध्ये जपानने सिला राजघराण्यावर कब्जा केला. पण जपानच्या ताब्यामुळे या देशात विद्रोह सुरू झाला. कोरियाईंनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी अनेक विद्रोही संघटना स्थापन केल्या होत्या, त्यात काही चिनी समर्थक आणि सोव्हिएत कम्युनिस्ट होते. आणि काही संस्थांना अमेरिकेचा पाठिंबा होता. चिनी कम्युनिस्टसह एकत्र येऊन विद्रोही किम संग इल यांनी “गोरिल्ला फौज” तयार केली, जी जपानशी स्पर्धा करत होती.

१९३९ ते १९४५ पर्यंत चाललेल्या दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेशी शत्रुत्व जपानला महागात पडले. आणि या युद्धामध्ये जपानला वाईट पराभवाने आपले हत्यार ठेवावे लागले. यासह ३६ वर्षांच्या गुलामगिरीनंतर कोरिया जपानच्या तावडीतून मुक्त झाला. पण तोपर्यंत दुसर्‍रे महायुद्ध संपले नव्हते. तेव्हा संपूर्ण जग दोन गटात विभागलेले दिसत होते. एक अमेरिकन गट आणि दुसरा सोव्हिएत गट. कोरियन बंडखोरसुद्धा यापासून दूर राहिले नव्हते.

कोरियाला जपानपासून स्वातंत्र्य मिळाले, पण जपानने कोरिया सोडल्यावर कोरियामध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती बनली होती.स्वातंत्र्यासाठी तयार झालेले गट आता दोन स्वतंत्र सत्ता केंद्रात विभागले गेले होते. कोरियाच्या उत्तर भागावर कब्जा करणार्‍या किम इल संगच्या कम्युनिस्ट गटाला सोव्हिएत युनियनचा पाठिंबा होता. तर कोरियाच्या दक्षिण भागात वर्चस्व गाजवणारे कम्युनिस्ट विरोधी नेते सेगमन री यांच्या गटाला अमेरिकेचा पाठिंबा मिळाला होता.

आता अशी परिस्थिती झाली होती कि दोन्ही कब्जा केलेल्या भागांना लक्षात घेऊन कोरियाचे दोन तुकडे केले गेले. फाळणीनंतर एक उत्तर आणि दुसरा दक्षिण कोरिया बनला.

फाळणीचा हा वाद नुकताच सुरू झाला होता. जपानपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ मध्ये अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून कोरियाला पुन्हा एक राष्ट्र बनवण्यास पुढाकार घेतला.

यासह अमेरिकेच्या पाठिंब्याने सेगमन री यांनी संपूर्ण कोरियावर अधिकार गाजवत सियोलमध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया स्थापण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अवघ्या २५ दिवसांनंतर किम इल संग यांनी प्यांगयांग येथे ‘डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ची घोषणा करत संपूर्ण कोरियावर आपला अधिकार जाहीर केला. फाळणी झाल्यानंतरही दोन्ही देशांमधील सैन्य आणि राजकीय लढाई सुरूच होती.

कोरियावर अधिकराबाबत अजूनही वाद सुरू होता की, तेव्हा २५ जून १९५० रोजी उत्तर कोरियाचे माजी शासक किम इल संग यांनी चीन आणि सोव्हिएत युनियनच्या मदतीने दक्षिण कोरियावर हल्ला केला आणि तिथूनच कोरियन युद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये सोव्हिएत युनियन उत्तर कोरियाकडे तर अमेरिका दक्षिण कोरियाकडे होती. तीन वर्षे चाललेल्या या युद्धात लाखो लोक मारले गेले होते. तीन वर्षांच्या लढाईनंतर अखेर अनेक देशांच्या मध्यस्थीनंतर २७ जुलै १९५३ रोजी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली. पण त्यानंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे, जो आजही तसाच आहे.

कोरिया दोन भागात विभागला गेला. एक उत्तर कोरिया आणि दुसरा दक्षिण कोरिया असे विभाजन झाले. पण विभाजनानंतर दक्षिण कोरिया शांत राहिला आणि लवकरच त्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. तर उत्तर कोरिया बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांसाठी प्रसिद्ध झाला. उत्तर कोरिया जगातील सर्वात राखीव देश म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे कारण इतर देशांशी फारच मर्यादित संबंध होते. हा देश अणुचाचण्यांबाबतही चर्चेत राहिला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.