रशिया युक्रेन सारखंच या पाच ठिकाणचे वाद तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी पेटवू शकतात

१९१४चं वर्ल्ड वॉर वन आणि १९३४चं दुसरं वर्ल्ड वॉर मानवी इतिहासातील दोन सर्वात मोठी युद्धे.लाखो लोकांच्या कत्तली झाल्या.अगणित संपत्तीची हानी झाली. युद्धात नावाला एक साईड हारली आणि दुसरी साईड जिंकली असं जरी आपल्याला सांगितलं गेलं असलं तरी दोन्ही बाजूंचं तितकंच नुकसान झालं होतं.

तरीही युद्धाच्या राखेतून पुन्हा उभारी घेत अनेक देश पुन्हा उभा राहिले. विश्वयुद्धातील एवढी जीवितहानी पाहिल्यानंतर आत्ता तरी देश सुधारतील अशी अपेक्षा होती मात्र लवकरच जग पुन्हा युद्धाच्या कचाट्यात ढकलले गेले.

अण्वस्त्रांची साठा करण्यात लागलेली स्पर्धा आणि सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यात चाललेल्या शीतयुध्दामुळं कोणत्याही क्षणाला युद्धाचा भडका उडेल अशी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सोव्हिएत युनिअचं विघटन झालं आणि धोका टळला. अमेरिकेनं त्यांनंतरच्या काळात इराक, अफगाणिस्तान सारखी अनेक युद्ध लादली असली तरी अमेरिकेच्या बेबंदशाहीला  आव्हान देणारी ताकद त्यावेळी नव्हती.

आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. चीन आणि रशिया अमेरिकेला आव्हान देण्यासाठी संधीची वाटच बघत आहेत. त्यामुळं कधी नव्हे ते तिसऱ्या महायुद्धाच्या चर्चा चालू झाल्यात. रशिया युक्रेनबरोबरचं जगात आज पाच असे संघर्ष चालू आहेत ज्यामुळं कधीही युद्धाचा भडका उठण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात.

रशिया-युक्रेन: पूर्व युरोपातील या शेजारील राष्ट्रांमधील संघर्ष तसा जुना आहे. मात्र २०१४मध्ये रशियाने युक्रेनचा क्रिमिया हा प्रांत ताब्यात गेल्यानंतर हा संघर्ष टोकाला पोहचला. बलाढ्य रशियापुढे आपला निभाव लागणार नाही हे ओळखून मग युक्रेननं आर्मीची क्षमता वाढवणे, नवीन हत्यारांची खरेदी करणे  अशी पाऊले उचलायला सुरवात केली.

त्यात २०२० मध्ये युक्रेनमध्ये नव्याने आलेल्या सरकारने उघडपणे रशियाविरोध प्रकट करत रशियाविरोधात अमेरिकेची आणि इतर युरोपियन राष्ट्रांची मदत घेण्यासाठी  नाटो जॉईन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आणि प्रकरण अजूनच चिघळलं.

रशियानं आज घडीला जवळपास १ लाख सैन्य युक्रेनच्या सिमेवर आणून ठेवला आहे आणि रशिया कधीही युक्रेनचा घास गिळेल अशी स्फोटक परिस्तिथि आहे.

जर रशियन लष्करी कारवाई केली तर अमेरिकेवर युक्रेनला प्रत्युत्तर देण्यासाठी मदत करण्याचा प्रचंड दबाव येईल. आणि तशी परिस्थिती आली तर तिसरं महायुद्ध लांब नसणार आहे अशी शक्यता जाणकार व्यक्त करतायेत.

चीन-तैवान – अजून एक फ्लॅश पॉईंट ज्यामध्ये अमेरिका आणि चीन या दोन महासत्ता कोणत्याही क्षणी एकमेकांच्या विरोधात उभं टाकू शकतायेत. बलाढ्य चीन समोर तैवान फक्त अमेरिकेच्या पाठिंब्यावर तग धरून आहे.गेल्या दशकात चिनी लष्करी क्षमता झपाट्याने वाढली आहे आणि आता चीन अमेरिकेच्या हस्तक्षेपासमोरील एक मोठा अडथळा आहे.

तैवानची सामुद्रधुनी ओलांडून जर चीननं केलं तर हे आक्रमण  इतिहासातील सर्वात अत्याधुनिक लष्करी ऑपरेशन्सपैकी एक असेल असं सांगण्यात येतंय. 

आणि चीननं जर तैवानवर आक्रमण केलं तर कोणत्याही परिस्तिथितीत अमेरिका उतरणार आणि तिसऱ्या महायुद्धाचं रणकंदन माजणार असं स्पष्ट गणित असेल असं जाणकार सांगतायत.

इराण

इराणच्या अण्वस्त्रांचा मुद्दा तर जागतिक राजकरणात कळीचा मुद्दा असतोय. इराणशी अण्वस्त्रे बंदीबाबतचा इराणशी केलेला करार डोनाल्ड ट्रम्प यांनी तोडल्यानंतर परिस्तिथी अजूनच चिघळत चालली आहे.
इराणविरुद्ध लष्करी आणि आर्थिक बळजबरी वाढवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

इराणने आपल्या क्षेपणास्त्र शक्तींच्या अत्याधुनिकतेत सुधारणा केली आहे आणि आण्विक प्रयत्नांना गती दिली आहे. यामुळं बिडेन प्रशासन जरी युद्धाबद्दल उत्साहित दिसत नसले तरी, सौदी अरेबिया आणि पॅलेस्टाईन हे यूएसचे सहयोगी संघर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करू शकतात.इराणकडे सध्यातरी कोणत्याही महासत्तेची सॉलिड बॅकिंग नसली तरी मध्य पूर्वेतील संघर्ष रशिया आणि चीनसाठी संधी उघडू शकते असे जाणकार सांगतायत.

नॉर्थ कोरिया:

किम जोन उन बद्दल अनेक अतरंगी बातम्या बाहेर पडत असल्यानं या सत्ताधीशाला हलक्यात घेण्याची चूक परवडणारी नाहीये.

जसं या अतरंगी बातम्या किती खऱ्या आहेत याची नक्की माहिती मिळत नाही तशीच हा सत्ताधीश नक्की किती अस्त्रांच्या ढिगाऱ्यावर बसून आहे याचीही कल्पना कोणाला नाहीये. 

मात्र जेव्हा जेव्हा हा नॉर्थ कोरिया मिसाइलची चाचणी करतं तेव्हा बाजूच्या साऊथ कोरिया आणि जपान यांचे धाबे दणाणल्या शिवाय राहत नाहीत. त्यात उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्या वादात अमेरिका आणि चीन हे दोन्ही कसे ओढले जाऊ शकतात हे वेगळे सांगायची गरज नाहीये.

हिमालय:

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाच्या घटनात झालेली वाढ आपण बघतंच आहोत. जगातल्या दोन मोठ्या आर्मी असलेल्या या देशांतील सीमावाद कोणत्याही क्षणी युद्धात भडकू शकतोय हे गालवान व्हॅलीसारख्या घटनांमधून याआधीच दिसून आलं आहे.

तसेच भारतानं क्वाडच्या माध्यमातून केलेल्या मोर्चे बांधणीमुळे चीनच्या गोटात अजूनच असुरक्षितता निर्माण झाली आहे.

त्यात चीन आणि पाकिस्तान यांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संबंध भारताच्या दृष्टीने धोक्यची घटना असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळं या तीन अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष या देशांबरोबरच जगालाही परवडणारा नसणार आहे.

तिसरा महायुद्ध झालं तर ते मानवजातीच्या इतिहासातील शेवटचे युद्ध असेल असं सांगण्यात येतं त्यामुळं यातून तरी बोध  घेऊन हे देश सुधारतील का हे येणाऱ्या दिवसात पाहण्याजोगं असणार आहे.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.