पैगंबरांवर व्यंगचित्र बनवणाऱ्याचा अपघात झालाय की घातपात झालाय ?

स्वीडनचा एक कलाकार..त्याचं नाव लार्स विल्क्स.  ज्याने २००७ मध्ये एक व्यंगचित्र काढलं आणि जगभरात वाद निर्माण केला होता. पण याच वादग्रस्त व्यंगचित्रकाराचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. अशीही चर्चा चालूये कि हा मृत्यू नसून ठरवून केलेला घातपात आहे. विशेष म्हणजे लार्सला याच व्यंगचित्रामुळे आयुष्याच्या शेवटपर्यंत पोलीस प्रोटेक्शन दिलं जात होतं.

लार्स यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त व्यंगचित्रे काढलं होतं. आणि हेच व्यंगचित्राने जगभरात वाद पेटवला होता. या व्यंगचित्रात मोहम्मद पैगंबर यांचा चेहरा कुत्र्याच्या चेहऱ्यावर लावला आहे. 

वृत्तांनुसार लार्स विल्क्स पोलिसांच्या गाडीत होता. तो प्रवासात असतांना दक्षिण स्वीडनमध्ये त्याची कार  एका ट्रकशी धडकली. विल्क्ससोबतच दोन पोलिसांनाही अपघातात आपले प्राण गमवावे लागले. तर  ट्रकचा चालक जखमी झाला आहे.

या अपघातावरून पोलिसांनी आपल्या बाजूने साक्ष जारी केली आहे.

या संशयास्पद अपघाताबाबत पोलिसांकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला हे अद्याप तरी कळू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासाच्या आधारावर, पोलिसांनी अपघातामागे काही षडयंत्र असल्याच्या संशयाला तसेच तर्क-वितर्काला नाकारले आहे.

पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलतांना सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष पोलिस पथकाकडे सोपवण्यात आला आहे. ते म्हणाले की या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या षडयंत्राची शंकाच उपस्थित होत नाही.

लार्स विल्क्सला पोलीस प्रोटेक्शन कायमच असायचे. कारण त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या यायच्या. 

जसे हे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित झाले तसे लार्स विल्क्स या कलाकाराला जीवे मारण्याच्या असलेल्या धमक्या येत होत्या.

याची त्याला कल्पना होती कि, आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ७५ वर्षाच्या लार्स विल्क्सला कायमच पोलीस संरक्षणाखाली राहायला लागत असे. आताही लार्स पोलीस संरक्षणाखाली प्रवास करत होते.

मुस्लिम समाजातील लोकांना याबद्दल खूप राग होता, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं स्पष्ट च होतं. त्यांचं म्हणणे होते कि,  इस्लामच्या मते, पैगंबरांचे चित्र काढणे म्हणजे निंदा आहे. विल्क्सने त्यावर आपले व्यंगचित्र बनवले म्हणजे तो एक महागुन्हा ठरतो.

त्याच्या या व्यंगचित्रामुळे संपूर्ण देश अडचणीत आला होता, पंतप्रधानांना यात दखल घ्यावी लागली होती.

या व्यंगचित्रामुळे इस्लामिक देश स्वीडनच्या विरोधात होते, साहजिकच यामुळे स्वीडनच्या बाबतीत नकारात्मक वातावरण होते. हि परिस्थिती निवळण्यासाठी आणि वातावरण शांत करण्यासाठी स्वीडनच्या तत्कालीन पंतप्रधानांनी २२ इस्लामिक देशांच्या राजदूतांची भेट घेतली होती.  या बैठकीनंतर काही दिवसांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेने विल्क्सवर एक लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवले.

२०१५ मध्ये एका कॅफेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या होता त्याचे मुख्य टार्गेट लार्स विल्क्स हे होते. 

लार्स विल्क्स हे कोपेनहेगन मधल्या एका कॅफेमध्ये सुरु असलेल्या  मुक्त-भाषण कार्यक्रमात स्टारस्पीकर होते. जिथे एका इस्लामवादी बंदुकधारी दहशतवाद्याने बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात एका चित्रपट दिग्दर्शकाची हत्या झाली तर तीन पोलिस अधिकारी जखमी झाले होते आणि त्या कॅफेच्या गार्डची हत्या झाली होती.

त्याच्या एका व्यंगचित्रामुळे संपूर्ण देश अडचणीत आला होता. पण शेवटी त्याचे मरण अपघाती झाले कि घातपातामुळे हा प्रश्न कायम राहणार आहे. पण जर पोलीस प्रशासनाने हे गंभीररित्या घेतलं तर कदाचित तपासात काही वेगळं सत्य समोर येऊ शकते.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.