भारताला शेवटचं हॉकी गोल्ड मेडल मिळवून दिलं आणि तिथून सुरु झालेला दुष्काळ ४१ वर्ष टिकला

भारतीय संघानं टॉकीयो ऑलम्पिक स्पर्धेत इतिहास रचत ब्रॉन्झ मेडल आपल्या नावे केलंय. जर्मनीला ५-४ ने हरवून संघानं जवळपास ४१ वर्षांनी हॉकीत अनोखा रेकॉर्ड केलाय. भारतीय हॉकी संघानं आतापर्यंत एकून ८ गोल्ड मेडल, १ सिल्वर आणि ३ ब्रॉन्झ मेडल  मिळवून दिलंय.

ती स्पर्धेची पहिली काही वर्ष भारतासाठी अविस्मरणीय होती. असं म्हंटल जायचं कि, ‘जसं क्रिकेटमध्ये ऑस्ट्रलिया तसं हॉकीत इंडिया’.

याआधी १९८० च्या मॉस्को ऑलम्पिक स्पर्धेत भारतानं शेवटचं गोल्ड मेडल जिंकलं होत. मात्र त्यांनतर कधीही भारत सेमीफायनलपर्यंत पोहोचून बाद होत होता.  तो भारताचा राष्ट्रीय खेळ असला, तरी संघाला गेले ४१ वर्षात म्हणावी तशी  कामगिरी करता आली नव्हती. या १९८० च्या ऑलम्पिक स्पर्धेत भारतानं केलेल्या कामगिरीचं जगभरात कौतुक केलं गेलं. भारतानं स्पेनचा ४-१ ने पराभव करून गोल्ड मेडल जिंकलं होत.

दरम्यान, भारताच्या या विजयाचं श्रेय सुरिंदर सिंग सोधी यांना दिलं जात, ज्यांनी १९८० च्या मॉस्को  ऑलम्पिक स्पर्धेत पुरुष विभागात १५ गोल करून भारताला तब्बल १६ वर्षांनी गोल्ड मेडल मिळवून दिल होत.  सुरिंदर सिंग सोधी यांनी उद्धम सिंग यांचा १५ गोलचा रेकॉर्ड मोडला होता.

स्पेनविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये  सुरिंदरसिंग सोधीने भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली होती. त्याने सेकंड हाफमध्येच तीन गोल मारले करून आघाडी मिळवली. यांनतर सुरिंदर सिंग सोधीने आणखी २ गोल केले. परंतु स्पेनने २ गोल करत आश्चर्यकारक बाउन्स बॅक केला होता.

स्पेननं भारताला चांगलंच अडवून धरलं होत आणि फक्त ६ मिनिटे शिल्लक असताना मोहम्मद शाहिदने गोल केला.  मात्र, पुन्हा फक्त ४ मिनिटे शिल्लक असताना स्पेनचा कॅप्टन जुआन आमतने पुन्हा एकदा गोल केला. पण शेवटच्या मिनिटात वातावरण बदललं आणि अखेर भारतानं ४-३ ने विजय मिळवला. आणि १६ वर्षानंतर गोल्ड मेडल भारताच्या खात्यात जमा केलं.

 याआधीच्या खेळातही  सुरिंदरसिंग सोधीने टांझानियाविरुद्ध ५ तर क्युबाविरुद्ध ४ गोल केले होते. त्यांनी १९७५ मध्ये पहिल्यांदाच युरोपियन दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व  केले होते. जेव्हा भारत जर्मनी, स्पेन आणि फ्रान्सबरोबर खेळला होता. या दौऱ्यावर ते सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 

यांनतर त्यांनी १९७५ मध्ये न्यूझीलंड दौरा आणि पाकिस्तानच्या लाहोर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही भाग घेतला होता. त्यानंतरच्या काही वर्षांत ते १९७८ आशियाई गेम (रौप्य), १९८० ऑलिम्पिक गेम आणि नेदरलँडच्या आमसेरडॅम येथे १९८२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी गेम्ससह बहुतेक आंतरराष्ट्रीय दौरे केले. यावेळी ते संघाचे कॅप्टन होते आणि ही त्यांची शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

आपल्या एका मुलाखतीत सोधी सांगतात कि, हॉकीचा जादूगर मेजर ध्यानसिग स्वतः सोधी यांनाच हॉकीचा जादूगर म्हणायचा.

सुरिंदरसिंग सोधी यांना आपल्या खेळातील कामगिरीमुळे अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. १९७८ मध्ये महाराजा रणजीत सिंग पुरस्कार (राज्य पुरस्कार) आणि १९९७  मध्ये भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार देण्यात आला, जो भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे.

सोधी यांच्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पोलीस अधिकारी राहिले आहेत.  त्यांना १९९३ मध्ये कॅथेन पोलीस सेवा पदक तर १९९४ मध्ये उत्कृष्ट सेवांसाठी पोलीस पदक देण्यात आलंय.

दरम्यान, सध्या या हॉकीपटूनं राजकारणात प्रवेश केलाय. काही महिन्यांपूर्वीच सुरिंदर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.