हजारो वर्षांपूर्वीचा महाराष्ट्राचा सम्राट ज्याचं कौतुक चीनमध्ये देखील करण्यात आलं होतं

उत्तर भारतात कनोज इथं साम्राट हर्ष राज्य करीत होता. त्याच काळात दक्षिण भारतात पुलकेशी हा प्रसिद्ध सम्राट होऊन गेला. जो चालुक्य घराण्याशी संबंधित होता. इ. स. ५५० च्या सुमारास पुलकेशी पहिला याने चालुक्य घराण्याची स्थापना केली. त्याची राजधानी विजापूर जिल्ह्यातील वातापी म्हणजेच बदामी हे शहर होते. तिथेच त्याने एक किल्ला बांधला.

आपल्या पराक्रमाची खूण म्हणून अश्वमेध यज्ञ केला

पहिला पुलकेशी राजाला कीर्ती वर्मा आणि मंगलीश अशी दोन मुलं होती. पहिल्या पुलकेशी नंतर किर्तीवर्मा बदामीचा राजा झाला.  त्याने आपले राज्य कोकण कारवार या भागात वाढवले. त्यानंतर  इसवी सन ५९१ मध्ये कितीवर्मा देखील मरण पावला. त्यावेळी त्याची तिन्ही मुलं लहान असल्याने  किर्तीवर्माचा धाकटा भाऊ मंगलिश हा राजा बनला. त्याने पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंतच्या प्रदेशात आपली राजसत्ता आणि आपल्या चालुक्य  घराण्याची कीर्ती वाढवली.

 मंगलिशाने राज्य वाढवले,  कीर्ती मिळवली, पण चालुक्याच्या गादीचा खरा वारस म्हणजे कितीवर्माचा  पुत्र अर्थात दुसरा पुलकेशी. पण त्याला काहीच किंमत दिली नाही. त्याने राजलोभानं ती गादी बळकावली होती.

दुसरा पुलकेशी शूर आणि समर्थ राजपुत्र होता.  त्याने आपला चुलता मंगलिश याच्याशी लढून आपल्या गादीचा वारसा परत मिळवला. सत्याश्रय पुलकेशी ही थोर मानाची पदवी धारण करुन दुसरा पुलकेशी इसवी सन ६११ मध्ये सिंहासनावर बसला.

आजचा महाराष्ट्र कर्नाटक आहे या भागात त्याच राज्य होतं. महाराष्ट्र हा पहिला उल्लेख देखील त्याच्याच शिलालेखात आढळतो.

दरम्यान, चालुक्य घराण्यावर अनेकांचा डोळा होता.  पुलकेशीचे राज्य नष्ट व्हावे यासाठी अनेकांनी घाट  घातला.  पण त्या सर्वांचा बिमोड करून दुसऱ्या पुलकेशीने आपले राज्य कायम राखले. तो पराक्रमाचा प्रतीसूर्यचं होता.

पुलकेशीने नंतर गुजरात, माळवा सारख्या भागांवर स्वाऱ्या केल्या आणि  कृष्णा- गोदावरी नद्यांच्या मधल्या सगळ्या प्रदेशावर आपलं अधिराज्य वाढवलं.  त्यानं कलिंग प्रदेश जिंकला आणि आपल्या सैन्याच्या सामर्थ्याचा प्रताप सिद्ध केला.

त्याच काळात उत्तर भारतात सम्राट हर्ष हा अत्यंत पराक्रमी राजा होता.  त्याने सगळा उत्तर भारत जिंकून आपल्या साम्राज्यात जोडला होता. त्याच्या या साम्राज्यावर नजर पडली ती दुसऱ्या पुलकेशीची. त्यानं हर्षाच्या आक्रमक सैन्याला नर्मदा नदीवरच थोपवून धरलं. त्यावेळी झालेल्या मोठया लढाईत पुलकेशीनं हर्षाचा पराभव केला. 

हा विजय म्हणजे चालुक्यांचा घराण्याचा कीर्तीचा कळसचं होता.  या पराक्रमानंतर त्याने स्वतःला ‘परमेश्वर’ अशी पदवी घेतली. परमेश्वर पुलकेशीने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी सर्व सीमांवर अत्यंत बलाढ्य शत्रू सैनिक तयार ठेवले होते.  त्यामुळे हर्ष सारख्या पराक्रमी सम्राटाचीही पुलकेशीच्या राज्यावर पुन्हा हल्ला करण्याची हिंमत झाली नाही.

आपल्या सुसंघटित आणि बलवान सैन्यामुळेचं तो सुमारे एक लक्ष गावे असलेला महाराष्ट्र प्रदेशाचा महान सम्राट झाला. त्याचं नाव ऐकताच कोशल, कलिंग सारख्या प्रदेशांमधले राजे देखील भीतीने थरथर कापायचे. त्याच्या भीतीने दक्षिण भारतातील अनेक राज्यांनी पूर्ण शरणागती पत्करली आणि दक्षिण भारत पुलकेशी साम्राज्यात सामावला गेला. गादीवर आल्यापासून फक्त पंचवीस वर्षात त्यानं हा पराक्रम करून नावलौकिक मिळवलं

आपल्या या विस्तारलेल्या साम्राज्यासाठी त्याने आपला धाकटा भाऊ विष्णुवर्धन याला भीमा कृष्णा व गोदावरी या प्रदेशाचा सुभेदार नेमले. दुसरा भाऊ जयसिंग त्यालाही सह्याद्रीच्या प्रदेशाचा गोपराष्ट्राचा मुख्य अधिकार दिला.  आपला थोरला मुलगा चंद्रादित्य  त्याला कोकणचा सर्वाधिकारी केले आणि अशा प्रकारे संबंध राज्याची घडी नीट बसवली

या सम्राटाने शिल्पकलेला ही फारच उत्तेजन दिले. बौद्ध भिक्षुंसाठी त्याने अनेक विहार दिले. डोंगर पर्वतात अनेक लेणी खोदल्या. या लेण्यांपैकी मुंबईतली घारापुरी इथली लेणी अजूनही आहे. असे म्हंटले जाते कि, अजिंठ्याच्या लेणीचं रंगकाम यानेच केल्याचे म्हंटल जाते.

राज्यव्यवस्था, धर्मव्यवस्था आणि कला कौशल्याचा कार्याबरोबरच त्याने आपल्या राज्यातील व्यापाराची वाढ केली.  त्याच्या काळात पश्चिम किनाऱ्यावरील भडोच, सुरत, सोपारा वगैरे बंदरातून परदेशाशी मोठा व्यापार चालायचा.  त्याची आरमारी जहाजाची बंदरात रंगाचं रांग लागायची.

पुलकेशीची कीर्ती भरताबाहेरच्या देशांमधूनही पसरली होती.  त्याने आपल्या वकीलाला इराणचा राजा  खुश्रू याच्याकडे पाठविले. जिथून त्या इराणच्या राजानं पुलकेशीच्या दरबारात देणग्या आणि नजराणे पाठवले. त्या प्रसंगाची आठवण अजिंठ्यातल्या क्रमांक १ च्या लेणीत खोदून ठेवलीये. 

प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएनत्संग हा त्या पुलकेशीच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात आला होता. तो पुलकेशीच्या दरबारात काही दिवस राहिला, त्याने पुलकेशीचे, त्याच्या दरबाराचे आणि महाराष्ट्रीय लोकांचे मोठ्या बहारीचे वर्णन लिहून ठेवलं. त्यातलं काही भाग असा –

“पुलिकेशी राजा उदारमतवादी असून दूरदर्शी आहे.  त्याची प्रजा राजनिष्ठ आहे. या राजाची अभिरुची आणि रसिकता खऱ्या योद्धयाला शोभेल अशीच आहे. तो युद्धात विजयाला सर्वाधिक महत्त्व देतो.  याच कारणासाठी त्याची पायदळ आणि घोडदळ अतिशय दक्ष सुसज्जित असते. 

लष्करी शिस्तीची अगदी कडक अंमलबजावणी केली जाते.  लढाईच्या वेळी हे सैनिक उन्मत्त होईपर्यंत मद्य प्राशन करतात आणि मग त्यांच्यापैकी हातात भाला घेतलेल्या एक- एक शिपाई  शत्रूच्या 10000 सैन्याला भारी असतो.  सैन्याच्या अशा स्थितीत असताना त्याच्या मार्गात येणाऱ्या माणसाची त्याने कत्तल केली तर कायदा त्याला शासन करत नाही.

महाराष्ट्राचा हा सम्राट आपल्या सैनिकांप्रमाणं  आपल्या हत्तीखाना हजारो हत्ती युद्धासाठी तयारी ठेवतो.  लढाईचा वेळ जवळ आला कि,  या हत्तीला दारू पाजली जाते, मग पिऊन पिसलेले हे हत्ती  शत्रु सैन्यावर प्रतापाप्रमाण सोडलं जातात. या स्थितीत जे जे त्यांच्या पुढे येईल त्याचा ते चक्काचूर करून टाकतात.

सध्या सम्राट हर्ष पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत विजयी आहे, त्यांनी दूरदूरच्या सर्व लोकांना वश केले आहे. शेजारच्या प्रदेशाचे राजे त्याच्या भयाने कापतात. पण महाराष्ट्राचे लोक त्याला शरण गेले नाहीत.  पुलकेशीचा राज्यविस्तार बाराशे चौरस मैलांचा असून त्याच्या राजधानीचे क्षेत्रफळ ८ चौरस मैल होते.  महाराष्ट्रातील लोक  आपल्या उपकारकर्त्याशी कृतज्ञतेने वागतात. पण शत्रूचा नायनाट केल्याखेरीज कधीही राहणार नाही.  त्यांचा कोणी अपमान केल्यास ते प्राणाचीही पर्वा न करता सूड घेतील.परंतु त्याच बरोबर दुःखितांना मदत करताना त्यांना आपल्या श्रमाचे भान राहायचे नाही. “

पुलकेशीच्या पराक्रमी गुणांमुळे आणि त्याच्या इच्छाशक्तीमुळं 99000 खेडी असलेल्या त्यानं आपले अधिपत्य गाजवले. तिन्ही समुद्रापर्यंत म्हणजेच पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेस बंगालचा उपसागर पर्यंत पुलकेशीचे राज्य पसरले आहे.

पुलकेशी हा  पराक्रमी, वैभवशाली राजा होता खरा, पण त्याचा शेवट मात्र संकटात झाला. कांजीवरमचा पल्लव राजा महेंद्रवर्मा याचा पुलकेशीने पराभव केलेला होता. त्याच गोष्टीचा सूड  महेंद्रवर्माचा मुलगा नृसिंहवर्मनने घेतला. पुलकेशीच्या राजधानीवर तो चालून आला.  यावेळी झालेल्या भयंकर नुकसानीत आपल्या जवळच्या लोकांना वाचवता-वाचवता पुलकेशी मारला गेला. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.