गांधीजींनी आपला ऑटोग्राफ ५ रुपयांना विकला होता पण कारण जनतेच्या भल्याच होतं

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी अनेक ठिकाणाहून आंदोलनं सुरु केली होती. या आंदोलनांमध्ये महात्मा गांधीजींची महत्वाची भूमिका होती. या आंदोलन काळात अणे महत्वाच्या घटना घडल्या त्यापैकीच एक घटना. दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून महात्मा गांधी परत आले तेव्हा ब्रिटिशांच्या तावडीतून भारताला सोडवण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न सुरु केले.

याची सुरवात झाली ती चंपारण्य पासून. महात्मा गांधींची ‘ महात्मा ‘ बनण्याची सुरवात हि चंपारण्य मधून झाली. बिहारच्या भागलपूरमध्ये एक विदारक घटना घडली. बिहारमध्ये १९३४ साली भूकंप आला होता. भागलपूरच्या लोकांनी यात हिरीरीने सहभाग घेतला आणि झपाटून मदत कार्य सुरु झालं. भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते धडपड करत होते. 

याच काळात महात्मा गांधी हे सहरसा वरून  बिहपूरच्या मार्गे भागलपूरला येऊन थडकले. गांधींनी लाजपत पार्कमध्ये एक सभा आयोजित केली आणि मदत कार्यात सगळ्यांनी सहभाग घ्या आणि भूकंपग्रस्तांना मदतीचा हात द्या म्हणून आवाहन केलं. या सभेत महात्मा गांधीजींचे अनेक चाहते आलेले होते. उपस्थित सभेत बऱ्याच लोकांना गांधीजींचा ऑटोग्राफ हवा होता.

या सभेतले स्वयंसेवक लोकांकडून वर्गणी गोळा करत होते जेणेकरून भूकंपग्रस्तांना त्याची मदत होईल. गांधीजींच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नाही. भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी आपण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे म्हणून गांधीजींनी एक आयडिया केली. गांधीजींनी चक्क आपला ऑटोग्राफ विक्रीला काढला.

सही घ्यायला आलेल्या लोकांना त्यांनी सांगितलं कि माझ्या माझ्या प्रत्येक स्वाक्षरीसाठी ५ रुपये लागतील आणि ते बंधनकारक आहेत, ज्यांना ऑटोग्राफ हवा असेल त्यांनी पाच रुपये जमा करावे आणि सही घेऊन जावी. या स्वाक्षरीच्या प्रकरणातून जितकी रक्कम गोळा होईल ती सगळी रक्कम भूकंपग्रस्तांना दान करण्यात येणार आहे.

भागलपूरच्या लोकांना या मदतीचा आणि गांधीजींच्या या आयडियाचं मोठं कौतुक वाटलं. गांधीजींच्या या धोरणामुळे भूकंपग्रस्त लोकांना मोठी मदत झाली. भागलपूरमध्ये गांधीजी दीप नारायण सिंह यांच्या निवासस्थानी राहत होते. पुढे हे निवासस्थान जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या निवास्थानात रूपांतरित करण्यात आलं. भागलपूरमध्ये गांधीजींची हि काही पहिलीच यात्रा नव्हती तर याआधी १९१७ साली ते बिहारच्या स्टुडन्ट असोसिएशन ऑफ बिहारच्या काथलबाडी भागात झालेल्या परिषदेच्या अध्यक्षतेसाठी आले होते.

ऑटोग्राफच्या माध्यमातून गांधीजींनी मिळालेली सगळी रक्कम भूकंपग्रस्तांना देऊ केली. या घटनेमुळे लोकांमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल आदर वाढला. बिहारवर भूकंपाची आपत्ती मोठी नुकसानकारक होती, त्याकाळात लोकांनी भरपूर सहकार्य केलं, शासनाने मदतकार्य उभारलं होतं. भारताच्या आजवरच्या नैसर्गिक आपत्तींपैकी हि आपत्ती मोठी मानली गेली होती. पण लोकांच्या सहकार्याने आणि गांधीजींच्या धोरणाने बिहारच्या लोकांनी यावर मात केली होती. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.