४ वर्षांत १०० कोटी कमावणारा भारतातला सर्वात वेगवान ब्रॅण्ड ठरलाय…

४ वर्षात १०० कोटी रुपये कमवणारी सर्वात वेगवान कंपनी ठरली ती  म्हणजे ममाअर्थ !

हो तोच सेफ केअर ब्रॅण्ड जो प्रत्येक जणांची पसंद ठरतेय. त्यातल्या त्यात मॉर्डन आईंची पसंद आणि विश्वास म्हणजे ममाअर्थ कंपनी.

गुरुग्रामच्या वरुण आणि गजल अलघ हे  जोडपे आपल्या बाळासाठी सेफ बेबी केअर ब्रॅण्डच्या शोधात होते. पण त्यांना कोणत्याच प्रोडक्ट वर विश्वास बसेना. सुरक्षा मानकांशी जुळणारे कोणतेही उत्पादन बाजारात त्यांना मिळालेच नाही. त्यांनी पाहिलेल्या प्रत्येक उत्पादनामध्ये त्यांच्या नवजात मुलासाठी हानिकारक रसायने होती. दोघांनी पालक बनल्यानंतर, बाळासाठी उत्पादनांच्या उच्च प्रतीच्या मानदंडांसाठी अमेरिकेतून प्रोडक्ट मागवायला सुरवात केली, परंतु त्यांना ते खूप महाग पडायचं आणि गैरसोयीचं देखील ठरायचं..

आपल्या मुलांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रोडक्टची कमी वरुण आणि गजल यांना भासली आणि शेवटी त्यांनीच एक कंपनी सुरु केली. ममाअर्थ !

आजकालच्या बेबी प्रॉडक्ट्समध्ये हानिकारक इंग्रेडिएंट्स वापरले जातात,

त्यामुळे बाळाच्या नाजूक स्कीन साठी वापरावं काय असा प्रश्न पडलेला असतो तेंव्हा ममाअर्थ कंपनीच्या प्रोडक्टवर ग्राहकांचा विश्वास बसू लागतोय. आणि ह्याच विश्वासामुळे हि कंपनी आजची सर्वात वेगवान नफा मिळवणारी कंपनी ठरतेय. साहजिक आहे कि, प्रत्येक आईची इच्छा असते की तिला तिच्या बाळाची बिनशर्त प्रेम आणि काळजी घ्यायची असते.

बाळाचे पालक शेवटी एक यशस्वी उद्योजक बनले.

सुरुवातीला लहान बाळांचेच प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीने आज प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी एकूण ६० प्रोडक्टस बनवले आहेत, तसच कंपनीसोबत आज देशभरातल्या १५० शहरांमधून 3 लाख ग्राहक जोडले गेले आहेत.

यासाठी त्यांची मेहनत देखील तितकीच आहे. ते दोघेही सांगतात आम्ही कित्येक रात्र झोपलो नव्हतो. कंपनी सुरु करण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडली आणि बाळाची देखील. कंपनीसाठी आवश्यक संशोधन करणे, टीम तयार करणे आणि प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यापासून सगळी प्रक्रिया व्हायला बराच काळ गेला.

२०१६ मध्ये, या जोडप्याने गुरुग्राममध्ये ‘होनासा कंझ्युमर प्रायव्हेट लिमिटेड’ या मूळ कंपनीच्या अंतर्गत, नैसर्गिक असलेले ज्यात वनस्पती-आधारित किंवा मानवनिर्मित सर्वोत्तम घटकांचा वापर करून हा ब्रँड बाजारात आणला जो प्रमाणित आणि सुरक्षित तर होताच अगदीच कमी काळात प्रभावी ठरला.

अवघ्या चार वर्षात, ममाअर्थ कंपनी केमिकल फ्री उत्पादनांसाठी मॅडसेफ प्रमाणपत्र मिळविणारी  आशियाची पहिली कंपनी ठरली.

कंपनी पालकांचे ताण कमी करण्याचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवत आहे. बाळाला आणि त्याच्या पालकांना  सुरक्षित बनवण्यासाठी सतत सुधारणा करत आहे.

बेबी केअरच्या सहा उत्पादनांपासून सुरू केलेली कंपनी आता पुरुष आणि स्त्रियांसाठी त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठीचे तसेच गर्भवती महिलांसाठी खास उत्पादने आणत आहे. त्या प्रोडक्ट मध्ये  विविधता आणली आहे. कंपनीने भारतभरातील 500 हून अधिक शहरांमधील 1.5 दशलक्षाहून अधिक ग्राहकांना एकत्र केले आहे.

ममाअर्थ हा भारताच्या सर्वात वेगवान वाढणार्‍या ब्रँडपैकी एक आहे, ज्याने अवघ्या चार वर्षात 100 कोटी रुपयांची उलाढाल केली.

भविष्यातील पिढ्यांसाठी तसच पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी देखील कंपनी प्रयत्नशील असते. ‘लेट्स रीसायकल’ नावाच्या प्रोजेक्ट खाली कंपनी प्लास्टिकचा पुनर्वापर करते आणि ग्राहकांना या कार्यक्रमाचा भाग बनवून जनजागृती देखील करते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.