पेप्सी कोलाला भारतात एन्ट्री साठी जनता सरकारने एक अट घातली होती

१९७५ मध्ये इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली आणि आणीबाणी हटल्यानंतर जनता सरकार सत्तेत आले आणि त्यांनी भारतात ठाण मांडून बसलेल्या विदेशी कंपन्यांना आपले बस्तान हालवायला सांगितले.

भारताने कोका-कोलाला बाहेरचा दरवाजा दाखविल्याच्या १२ वर्षानंतर कंपनी भारतात पुन्हा प्रवेश करत होती, तेही सरकारच्या म्हणण्यानुसार. राजीव गांधी सरकारने कंपनीला भारतात पुन्हा संसार थाटण्याची परवानगी दिली आणि पेप्सीकोला सगळं जग जिंकल्याचं सुख मिळालं.

परंतु ८० च्या दशकात एका विचित्र नियमांमुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी केवळ हायब्रिड ब्रँड नावे वापरण्याची परवानगी मिळाली होती. १९८९ पर्यंत कंपनीने भारतात यशाचा इतिहास रचला. त्यानंतर राजीव गांधी सरकार सत्तेतून गेले आणि व्ही.पी सिंग सरकार आले त्यांनी कॉंग्रेस सरकारने दिलेल्या पेप्सी-कोला कंपनीवर कठोर कारवाया सुरु केल्या. शेवटी कंपनीने उत्पादन थांबवले.

त्यानंतर पुन्हा १९९० च्या काळात या कंपन्यांना भारतात पुन्हा यायचे होते. तसा प्रस्ताव ही त्यांनी भारताला पाठवला होता. परंतु भारतात तरी तो प्रस्ताव धूळखातच पडला होता. त्याचदरम्यान अमेरिकेत इंडो युएस बिझनेस कौन्सिल च्या एका बैठकीमध्ये अमेरिकेने भारताला आठवण करून दिली कि, भारताने तो प्रस्ताव मंजूर केला तर ती अमेरिकेसाठी भारताने दिलेली एक मोठी सदिच्छा भेट ठरेल.

परंतु अमेरिका आणि भारतात सत्त्तेत आलेल्या व्ही.पी सिंग सरकारमध्ये बरीच तू-तू  मै-मै होत होती.

काही आठवड्यांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारमधील अन्न प्रक्रिया मंत्री शरद यादव यांनी परंतु पेप्सीको इंडियाचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश वंगल यांना आपल्या कार्यालयात बोलवून सांगितले की कोलाला “देसी” चव असायला हवे आणि तसेच कोलाला पेप्सी लेहर हे देशी नाव देण्याची अट त्यांनी घातली. हा कंपनीसाठी मोठा धक्का होता.

या अटी मान्य केल्या तरच भारतात उत्पादन करण्याची परवानगी देण्यात येईल असं शरद यादव यांनी स्पष्ट केलं.

यामुळे कंपनी आणि वांगल चांगलेच अडचणीत आले होते. शरद यादव यांच्या हट्टापायी त्यांना बाटल्यांवर पुन्हा नव्याने ब्रँडचे नाव बदलून ‘लेहर पेप्सी’ इतकंच छापण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च येणार होता.

वांगल यांनी आपल्या कंपनीची ड्रिंक्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळवण्यासाठी सलग तीन वर्षे लढा दिला होता. शेवटी नवीन नावासकट उत्पादन सुरु झाले.

पेप्सीको आणि त्याच्या बाटल्यांनी कित्येक ठिकाणी तसेच बर्फाळ प्रदेशात देखील , देशभरात सुमारे दोन लाख दुकानांत बाटली विक्री करण्यासाठी १२,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती. भारतीय लोकांनी आत्तापर्यंत कोका कोलाच्या २२ प्रकारच्या बाटल्यांमध्ये हे ड्रिंक चा आनंद घेतलाय.

अशाप्रकारे कोका कोला कामाप्नी ज्या यशाच्या शिखरावर आहे, तिला इथपर्यंत येण्यासाठी प्रत्येक पावलावर लढा द्यावा लागला आहे. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात असे वातावरण असून देखील कंपनीने दरवर्षी सुमारे १४० कोटी रुपये गुंतवण्याची हिंमत ठेवली होती.

पेन्सीकोने आर पी गोयंका यांच्याबरोबर करार करूनदेखील भारतात प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न फेल गेला होता. गोयंका आणि गांधी कुटुंबाचे चांगले जवळचे सबंध असूनदेखील त्याचा काही एक फायदा कंपनीला झाला नव्हता.

हे हि वाच भिडू:

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.