खोटी बातमी लावली म्हणून एकदा मनमोहनसिंगांनी NDTV ची शाळा घेतली होती.

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आज ८९ वर्षांचे झाले. डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ च्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व केले. १९९१ मध्ये भारताची अर्थव्यवस्था कायमची बदलली जेंव्हा मनमोहन सिंग यांनी अनेक आर्थिक सुधारणा आणल्या.

खंबीरपणे देश आणि देशाची अर्थव्यवस्था सांभाळणारे डॉ. सिंग जसे दिसतात तसेच स्वभावाने देखील आहेत.  मात्र विषय जेंव्हा तत्वांचा आणि योग्य-अयोग्यतेचा येतो तेंव्हा ते तितकेच कडक शिस्तीचे आहेत. त्यांचा हा कडकपणा एका किस्स्यातून दिसून येतो, जेंव्हा ते पंतप्रधान म्हणून कार्यरत होते.

हा २००५ वर्षातील प्रसंग आहे. 

खाते बदलाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. अधून मधून आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कामकाज कसं चालू आहे याविषयी डॉ. मनमोहन सिंग माहिती मागून घेत असायचे. त्यांची ही पद्धत अनौपचारिक मूल्यांकनाची होती. थोडक्यात शाळेतल्या प्रगतिपुस्तकासारखी.

पण हि गोष्ट माध्यमांना समजली, त्यांनी याची बातमी केली ती देखील एक वेगळ्याच स्वरुपात.

दरम्यान युपीए सरकारचा पहिला वर्धापन दिन जवळ आलेला असताअसतांनाच पंतप्रधान आपल्या मंत्र्यांच्या कामकाजाचा परीक्षण करणार आहेत असे वृत्त प्रक्षेपित होऊ लागली.

याच संदर्भात एनडीटीव्हीने तत्कालीन यूपीए मंत्र्यांच्या कामगिरीच्या अहवालावर एक कार्यक्रम प्रसारित केला होता, ज्यात केवळ सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचाच नव्हे तर सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डचीही रूपरेषा दाखवली गेली होती.

आणि याचवेळी म्हणजेच ९ मे च्या दिवशी पंतप्रधान मॉस्कोच्या दौऱ्यावर होते, ते दौऱ्यावर असताना एनडीटीव्ही या वाहिनीवरून असं वृत्त प्रक्षेपित करण्यात आलं की परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांना त्यांच्या प्रगती पुस्तकात पंतप्रधानांनी फारच कमी गुण दिलेले असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नटवर सिंह अत्यंत दुःखी झाल्याने प्रकृती अस्वस्थाचे कारण सांगून एक दिवसाच्या रजेवर गेले.

आणि हि बातमी पंतप्रधान यांच्या कानावर गेली, जेंव्हा ते मॉस्कोमध्ये ते थांबलेल्या हॉटेलमध्ये एका  महत्त्वाच्या विषयावर काम करत होते.

एनडीटीव्हीने नक्की काय बातमी दिली आहे याची संपूर्ण माहिती संजय बारू यांना त्यांनी काढायला सांगितली. 

ती सगळी माहिती काढून संजय बारू यांनी पंतप्रधानांना सुपूर्द केली. ती माहिती वाचून मनमोहन सिंग संतापले आणि म्हणाले कि, प्रणयला सांगा कि, अशा खोट्या बातम्या करण्यापासून थांबवा. त्यांना एनडीटीव्हीने चालवलेली हि बातमी खटकली होती. याचा खुलासा संजय बारू यांच्या ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकात केला आहे.

त्यानंतर संजय बारू यांनी एनडीटीव्ही चे प्रमुख प्रणव रॉय यांना फोन लावला आणि त्यांच्याशी बोलायला सुरवात केली.  इतक्यात पंतप्रधानांनी संजय बारू यांचा मोबाईल फोन मागितला आणि ते स्वतः प्रणव रॉय यांच्याशी बोलायला लागले.

एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांचा समाचार घ्यावा तसा पंतप्रधानांनी रॉय यांचा समाचार घेतला.

डॉ. सिंग  म्हणाले,  “हे बरोबर नाही तुम्ही या अशा बातम्या देता कामा नये”.

डॉक्टर मनमोहन सिंग आणि प्रणव रॉय यांचे संबंध पंतप्रधान आणि ज्येष्ठ माध्यम संपादक असे नव्हते. तर एक वरिष्ठ आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा एक तरूण कनिष्ठ अधिकारी असे होते.  त्यांची आधीच ओळख होती, कारण प्रणय रॉय यांनी अर्थमंत्रालयात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हाताखाली आर्थिक सल्लागार म्हणून काम केलं होतं.

पंतप्रधान आणि प्रणय रॉय यांच्यात बोलणं झाल्यानंतर, रॉय यांनी पुन्हा संजय बारू यांना फोन लावला आणि विचारलं कि, तुम्ही अजून पंतप्रधान यांच्या सोबतच आहात कि एकटे आहात?

तेवढ्यात संजय बारू खोलीबाहेर जाऊन म्हणाले की मी एकटाच आहे बोला. तेव्हा प्रणय रॉय यांनी फोनवर म्हणाले, “अरे बापरे शाळेतून बाहेर पडल्यानंतर कधीही इतकी बोलणी खाल्ली नव्हती. ती काही पंतप्रधान असल्यासारखं बोलत नव्हते तर शाळेचे मुख्याध्यापक असल्यासारखं बोलत होते”.

या घडलेल्या प्रसंगानंतर मनमोहन सिंग यांनी नटवर यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

“मला परत आल्यावर तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे”, असे नेटवर यांना ते म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग हे या बातमीनंतर इतके का चिडले होते आणि ते नटवर सिंह यांच्याशी इतके मृदू का वागले हे नंतर उमगलं.  २००५ सालच्या मे महिन्यात अमेरिकेबरोबर ते फार मोठा सहकार्याचा पाऊल उचलणार होते. त्यावेळी नटवर सिंह यांच्या पाठिंब्याची त्यांना गरज होती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना दुखावला त्यांना परवडण्यासारखं नव्हतं.

संदर्भ- accidental prime minister संजय बारू

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.