युपी निवडणूकीच्या तोंडावर बसपा आणि काँग्रेसमुळे अखिलेश यादव अस्वस्थ का आहेत?

उत्तर प्रदेशच्या राजकारणात सद्या चलबिचल चालू आहे. अलीकडेच समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, बसपा-काँग्रेसने आधी स्पष्ट केले पाहिजे की त्यांची लढाई भाजपशी आहे की सपाशी…बरं त्यांचं हे वक्तव्य देखील अशा वेळेस ले आहे कि, जेव्हा बसपाच्या प्रमुख मायावती आणि काँग्रेस नेत्यांना त्यांच्या पक्षाला गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केले जात आहे.

युपी च्या राजकीय वर्तुळात सद्या अशी चर्चा चालूये कि, बसपा आणि काँग्रेसच्या सक्रियतेमुळे अखिलेश यादव आता अस्वस्थ झाले आहेत.

त्याचं झालं असं कि, बसपाने एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी अलीकडेच असं स्पष्ट केलेय कि,  युपीमध्ये भाजप विरोधी पक्ष आमच्यासोबत युती करू शकतात, आमचे मार्ग युतीसाठी कधीही खुले आहेत असे त्यांनी उघड संकेत दिले आहेत.

प्रियांका गांधी यांच्या या युतीच्या ऑफर मुळे आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे अस्वस्थ झाले आहेत. 

त्यांनी यावर वक्तव्य केलेय कि, बसपा प्रमुख मायावती आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एकदा ठरवून घ्यावं कि,  त्यांना २०२२ ची निवडणूक भाजपाच्या विरोधात लढायची आहे का कि, समाजवादी पक्षाच्या विरोधात ?

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांचा पराभव करण्यासाठी सपापासून बसपा आणि काँग्रेस रणांगणात उतरले आहे.

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप, आणि भाजपनंतर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष हा युपी मधील सर्वात मोठा विरोधी पक्ष मानला जातो आणि बसपा दोन नंबरवर येते. यानंतर पाचव्या स्थानावर असलेल्या काँग्रेसची स्थिती इतकी खराब आहे की, लोकसभेच्या रायबरेलीतून सोनिया गांधींची जागा धरून विधानसभेत इतर फक्त ७ आमदार आहेत.

तरीदेखील मायावती आणि अखिलेश यादव सारख्या जनसमुदायाचा आधार असलेल्या नेत्यांपेक्षा  प्रियंका गांधींच्या राजकारणाचा योगी आदित्यनाथांवर मात्र जास्त परिणाम होतोय. आणि कदाचित याचमुळे मायावती आणि अखीलेश या दोन्ही राजकीय विरोधकांमध्ये याची चढा-ओढ चालूये कि युपी मध्ये प्रियांका गांधी नेमका कुणाचा हात धरून २०२२ ची निवडणूक लढवणार आहेत.

मायावती सपा सरकारच्या कार्यकाळावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काँग्रेस पक्ष आझम खान यांच्या निमित्ताने सपाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. या गोंधळामुळे अखीलेश सद्या चांगलेच चिडले आणि त्यांनी उघड उघड एकदा कॉंग्रेस कुणासोबत युती करणार हे स्पष्ट करावे असं वक्तव्य केलं आहे.

अशाच मध्ये युपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनीही सपावर निशाणा साधत म्हटले होते की,

“यादव यांच्या वक्तव्यात निराशा दिसून येते कारण लोकांनीच त्यांना नाकारले आहे”. यूपी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष शाहनवाज आलम यांनी आझम खान यांना सोबत घेऊन अखिलेश यादव यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे, त्यामुळे आता सपाकडून मुस्लिम मते गमावण्याचा धोका देखील वाढत आहे.

अशा परिस्थितीत बसपा आणि काँग्रेसने सपाच्या राजकीय वाटचालीत मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत.

काँग्रेस नेते शाहनवाज आलम म्हणतात की, यूपीमध्ये काँग्रेसची लढाई सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षाच्या निष्क्रियतेबद्दल देखील आहे. अखिलेश यादव ना आझम खान सारख्या मोठ्या नेत्यांसोबत लढाई लढू शकले आहेत ना योगी सरकारच्या विरोधात. अखिलेश यादव यांची ढिसाळ वृत्ती पाहून कॉंग्रेसने राज्यातील विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये पक्षाला विरोधी पक्षाबरोबरच सत्ताधारी पक्षाशी दुहेरी लढाई लढायची आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या या हालचालींमुळे आता अखिलेश यादव याचं अस्वस्थ होणं साहजिकच आहे,

कारण ते आता समजून गेले आहेत कि, त्यांची राजकीय वजन काहीसं कमी झालं आहे कारण  लोकांचा प्रियंका गांधींवर विश्वास वाढलेला आहे हे एकंदरीत युपीच्या वातावरणावरून दिसत आहे. 

यूपीमधल्या अशा सगळ्या गोंधळात देखील सपा, बसपा आणि काँग्रेस एकत्र येऊन भाजपच्या विरोधात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडणूक लढवणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरले आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.