बॅंकेत जावून मोदींचे १५ लाख मागितले, देत नाहीत म्हणल्यावर बॅंकेला आग लावायला चालला..
अलाहाबाद बॅंकेची जरवल शहरात शाखा आहे. रोजच्या प्रमाणे कालच्या शुक्रवारी हि बॅंक सुरू झाली. वॉचमन पेन खिश्याला लावून येणा जाणाऱ्यांना पेन नाही म्हणून सांगू लागला. मॅंनेजर आपल्या केबिनमध्ये घुसून एसी लावून शांत पहूडले. कर्मचाऱ्यांनी एका बाजूला कॅण्डी क्रश आणि एका बाजूला बॅकेच पोर्टल चालू केलं. अधून मधून लाईट जात येत होती आणि बॅंक सुरू झालेला फिल सर्वांना आला.
याच वातावरणात जरवल नगरच्या शाखेत पस्तीस वर्षांचा एक मध्यमवर्गीय ग्रहस्थ आला. त्याचं नाव मौजीलाल. आज आपल्या नावाला जागायचं हे त्यानं आपल्या मनातल्या मनात ठरवलं असावं. तो बॅंकेत आला ते थेट पाच लिटर पेट्रोलचा कॅन घेवून. पाच लिटर पेट्रोल त्याला परवडलं हे विशेष.
मौजीलाल थेट बॅंक मॅनेंजरच्या केबिनमध्ये घुसला. त्यांच्या समोर उभा राहत मोदींनी सांगितलेले पंधरा लाख लवकरात लवकर खात्यावर टाकण्याची धमकी दिली. कुठले पंधरा लाख अस बॅंक मॅनेजर म्हणताच, त्यांन हातातला कॅन जमीनीवर टाकला.
मी बॅंक पेटवणार आहे. माझं कुटूंब उपाशी मरण्याच्या अवस्थेत आहे. मोदींनी सांगितलं होत प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख देणार आहेत. बॅकेनं माझ्या खात्यावर अजूनही पंधरा लाख पाठवले नाहीत म्हणून मी बॅंक पेटवणार आहे. तुम्ही सगळे माझ्यासारखेच आहात त्यामुळं तुम्ही बॅंकेतून बाहेर जा. अस सांगत त्यानं बॅंकेत पेट्रोल टाकण्यास सुरवात केली. बॅंकेत पेट्रोल टाकताच लोक पळून गेले. वॉचमन त्यांच्या अगोदर गेला असावा. तात्काळ पोलिस आले आणि मौजीलाल यास ताब्यात घेतलं.
अधिक माहिती सांगताना बॅंकेचे प्रभारी निरिक्षण मधुपनाथ मिश्र म्हणाले की, आम्ही बॅकेतलं पेट्रोल साफ केलं आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीची चौकशी केली आहे. त्याच्या कुटूंबाने सदरची व्यक्तीचे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडल्याचे सांगितलं आहे.