जिनाने दिलेली पाकिस्तानी ऑफर धुडकावून लावली आणि भारताला काश्मीर जिंकून दिला….

हि गोष्ट तेव्हाची जेव्हा भारताला स्वतंत्र होऊन फक्त ३ महिनेसुद्धा झाले नसतील. पाकिस्तानने काश्मीरच्या कबाली लोकांना भडकावून भारताच्या काही भागांमध्ये युद्ध लावून दिलं. १९४७ च्या या युद्धामध्ये भारत जिंकला ते एका शूरवीरामुळे ज्याला नौशेराचा शेर म्हणून ओळखलं जातं. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान या शूरवीराला पाकिस्तानच्या विभाजनानंतर पाकिस्तान सेनेच्या प्रमुखपदाची ऑफर मोहम्मद अली जिना यांनी दिली होती.

पण ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांनी पाकिस्तानची ऑफर धुडकावून लावली आणि युद्धामध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. जाणून घेऊया या शूरवीराची जीवनगाथा. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान युपीच्या मऊ जिल्ह्यातील बीबीपुर गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते त्यामुळे साहजिकच त्यांची इच्छा होती कि मुलाने पोलीस ऑफिसर व्हावं पण पुढे मोहम्मद उस्मान यांनी आर्मी जॉईन केली. 

मोहम्मद उस्मान यांनी रॉयल मिलिट्री अकेडमी सैंडहर्स्टला सिलेक्ट झाले होते. १९३४ साली ते सँडहर्स्टला पस होऊन आले तेव्हा सॅम माणेकशॉ हे त्यांचे बॅचमेट होते. आर्मीमध्ये आल्यानंतर त्यांनी इंग्रजांसाठी बर्मामध्ये युद्ध लढलं. युद्धानंतर जेव्हा फाळणी झाली तेव्हा मोहम्मद उस्मान यांनी भारताची निवड केली.

भारतीय सेनेत मोहम्मद उस्मान यांना डोग्रा सेनेचं नेतृत्व देण्यात आलं. १९४७ मध्ये जेव्हा पाकिस्तानने काश्मीर वर कबजा करण्यासाठी युद्ध केलं तेव्हा नौशेरामध्ये लढाई लढणारे मोहम्मद उस्मान होते. भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी मोहम्मद उस्मान यांना ऑर्डर दिली कि काश्मीरमधील कबाली जमातीला हाकलवून लावा तेव्हा मोहमद उस्मान यांनी चोखपणे हे काम केलं होतं. 

कबालीनी आसपासच्या जागेवर कब्जा केला पण त्यांना नौशेरावर त्यांना कबजा मिळवता आला नाही कारण ५० सैनिकांना घेऊन मोहमद उस्मान लढत होते. ज्या ज्या वेळी आक्रमण झालं तेव्हा मोहम्मद उस्मान यांनी पाकचा डाव हाणून पाडला होता, तेव्हा या प्रकाराला वैतागून पाकिस्तानने मोहम्मद उस्मान यांना मारणाऱ्याला ५० हजार रुपये बक्षीस देण्याचं आश्वासन ठेवलं होतं. फेब्रुवारी १९४८ मध्ये लेफ़्टिनेंट जनरल करियप्पायांनी कोट वर कब्जा करण्याचा आदेश दिला तेव्हा त्यानिओ यशस्वीपणे हि मोहीम राबवली.

ज्यावेळी ब्रिगेडियर उस्मान यांना  मेजर जनरल कलवंत सिह यांनी झंगड़ प्रांतावर कब्जा करायला सांगितला तेव्हा उस्मान यांनी आपल्या सैनिकांशी चर्चा केली आणि सांगितलं कि जर आपण या मिशनमध्ये अपयशी झालो तर मी मरेपर्यंत पलंगावर झोपणार नाही. १४ मार्च १९४८ रोजी हे युद्ध सुरु झालं आणि अवघ्या ४ दिवसात उस्मान यांनी विजय मिळवला. यानंतर जवळच्या गावातून पलंगाची व्यवस्था करण्यात आली तेव्हा उस्मान हे पलंगावर झोपले. 

झंगड प्रांतावर पुन्हा कब्जा करण्यासाठी कबाली जमातीने पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला, मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ब्रिगेडच्या मुख्यालयावर बॉम्ब फेकण्यात आले. यामध्ये ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान गंभीररीत्या जखमी झाले. काही काळानंतर ते यातून सावरू शकले नाही आणि त्यांना वीरमरण आलं. ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या निधनाने पंतप्रधान नेहरू सुद्धा हळहळले होते.

ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या अंत्ययात्रेत नेहरूसुद्धा सामील होते. भारत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या ब्रिगेडियर मोहमद उस्मान यांना मरणोत्तर भारतीय सेनेचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान महावीर चक्र देऊ करण्यात आलं.

भारताच्या या शूरवीराने मोहमद जीनांची ऑफर धुडकावून आपली देशभक्ती दाखवून दिली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.