नवाज शरीफ म्हणतात कि, कारगिल युद्ध म्हणजे मुशर्रफने माझ्यावर केलेला गेम होता

२६ जुलै.  आजचा दिवस भारतीय क्वचितच विसरू शकतील. आजच्याच दिवशी २२ वर्षांपूर्वी  कारगिल युद्धात  भारतानं ऑपरेशन विजय अंतर्गत पाकिस्तानचा पराभव केला होता. या घटनेवर अनेक पुस्तक लिहिली गेली,  अनेक चित्रपट, माहितीपट बनवले गेले. पण या घटनेच्या आधीची गोष्ट, या घटनेचे मूळ फार थोड्या लोकांना माहिती असेल.

१७ मे १९९९चा तो दिवस. पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये असणाऱ्या जीएचक्यू म्हणजेच जनरल हेड क्वार्टरमध्ये एक मिटिंग सुरु होती. पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही  मिटिंग सुरु होती. मिटिंगमध्ये जनरल परवेज मुशर्रफ, अझीझ खानसुद्धा होते. सहाजिकच मीटिंगमध्ये चर्चा सुरु होती ती संरक्षणाबाबत. 

मिटींगच्या मध्येच  परवेज मुशर्रफ  एक नकाशा उघडून टेबलावर उघडून ठेवतात. सगळ्यांच लक्ष त्या नकाशावर जात. हा नकाशा सामान्य नकाशा पेक्षा काहीसा वेगळा होता. नकाशावर भारत- पाकिस्तान बॉर्डर आणि एलओसीच्या रेषा तर होत्या, पण जागेची नावं नव्हती. या नकाशावर छडी फिरवत मुशर्रफ  एलओसीची त्यावेळची परिस्थती सांगत होते. त्याचवेळी त्यांची छडी एका जागेवर जाऊन पोहोचली.

त्यावेळी पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, जनरल इथं असं काय आहे कि तुम्ही थांबलात. यावर मुशर्रफने उत्तर देताना म्हंटल.

“जनाब आपण या चौक्यांवर कब्जा केलाय. इथून श्रीनगर-लेह हायवे फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे. या सगळ्या रस्त्यावर आपल्या बंदुका निशाणा साधून आहेत. तुमच्या इच्छेनुसार काश्मीरच्या आझादीचा प्लॅन पुढे सरकलाय. ऑपरेशन ५ फेजमध्ये होईल. ज्यातला पहिला फेज तर पूर्ण झालाय. आणि आपण यशाच्या खूप  जवळ आहोत. 

आता काश्मीरचं नाव घेतलंय म्हंटल्यावर पंतप्रधान नवाज शरीफ यांचे डोळे चमकले. आणि मुशर्रफ यांना हा ट्रिगर पॉईंट चांगलाच माहित होता.  या मिटिंग दरम्यान मुशर्रफ अझीझ खानकडे एक नजर टाकतात आणि हाच इशारा समजून अझीझ आणखी एक पासा फेकतात.  ते पंतप्रधान नवाज शरीफला उद्देशून म्हणतात, 

जनाब, खुदाने आपल्याला एक संधी दिलीये, काश्मीरला आझाद करण्याची. या तारखेला आपलं नाव सुवर्ण अक्षरांत कोरलं जाईल. तुम्ही फतेह-ए- काश्मीरच्या नावाने ओळखले जाल. सगळ्या पाकिस्तानात कायदा-ए आझमच्या नंतर आपलंच पारडं भारी असेल.

यानंतर जनरल मुशर्रफ म्हणतात, जनाब आपण अश्या ठिकाणी पोहोचलोय, जिथून वापसी शक्य नाही. माझा सगळं अनुभव सांगतोय कि, या मिशनमध्ये जिंकण्याची पूर्ण गॅरंटी आहे.

मुशर्रफची हि वाक्य कानावर पडताच हुरळून गेलेल्या नवाज शरीफनं विचारलं कि, तुम्ही काश्मीरवर पाकिस्तानचा झेंडा कधीपर्यंत फडकवताय?

आता हा प्रश्न खरं तर पाकिस्तानच्या सैनिकांना विचारला गेला होता, मात्र त्याच उत्तर दिल भारतीय सैनिकांनी. आता ते माहित करून घेण्यासाठी आपल्याला जरा मागं जावं लागेल.

या दरम्यान, या घटनेबाबत आणखी एक गोष्ट कानावर पडते कि, जेव्हा नवाज शरीफ तो नकाशा पाहत होते, तेव्हा त्या नकाशावर एलओसी मार्क केली होती कि नाही? ते पाकिस्तानची ठिकाणं तर पाहू शकत होते, पण हे निश्चित करू शकत नव्हते कि, ही ठिकाणं एलओसीच्या भागातली आहे कि भारताच्या. आणि यामुळे ते बुचकळ्यात पडले आणि त्यांना कळालं नाही कि, त्यांच्यावर गेम झालीये. 

असो, तर १९९८ चं ते साल. भारताचा शेजारी चीन आधीच आण्विक शक्तीनं लेस होता. आणि पाकिस्तान सुद्धा याच प्रयत्नात होता. आता शेजारी हा वाढता धोका पाहता भारतानं ११ आणि १३ मेला आण्विक चाचणी केली. आता या चाचणीनंतर पाकिस्तानची रिअक्शन काय असणार हे काय नव्यानं सांगायला नको.

त्याच्या बरोबर १५ दिवसांनी पाकनं अणुचाचणी केली. आता दोन्ही देशांच्या या अणुचाचणीनं नात्यात नवीन अँगल तयार झाला. अश्या परिस्थिती युद्धाने एक खतरनाक वळणं घेतलं असत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात बॅक डोअर डिप्लोमसीच्या मदतीनं पाकिस्तानशी चर्चा करण्यात आली.

याचाच परिणाम म्ह्णून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी १९९९ च्या फेब्रुवारी महिन्यात स्वतः पाकिस्तानला गेले आणि तेही बसने. ज्यानंतर २० फेब्रुवारीला लाहोर डिक्लेरेशन साइन झालं. ज्याअंतर्गत हे निश्चित झालं कि, दोन्ही देश संबंधित निमय पाळतील आणि एकमेकांच्या आंतरिक प्रश्नात डोकं घालणार नाही.  

एकीकडं पाकचे पंतप्रधान हा शांती करार साइन करत होते, तर दुसरीकडे जनरल मुशर्रफ आणि बाकी लोक ऑपरेशन कोह-ए-पैमाच्या अंतिम टप्प्यात होते. मुशर्रफने सीमा- करार मोडीत काढायचं ठरवलं आणि श्रीनगर- लेहच्या हायवेला निशाण्यावर घेईल. यात प्लॅन होता कि, हा वाद जितका ताणता येईल तितका ताणला जावा.  जेणेकरून एलओसीची जमीन आणखी मजबून होईल, सोबतच सियाचीन सुद्धा पाकच्या ताब्यात जाईल.

१९९९ चा फेब्रुवारीत पाकने हा प्लॅन प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली. आणि कारगिल बटालियनच्या २०० किलोमीटरच्या परिसरात आपली फौज तैनात केली. आता पाकला गोड गैरसमज होता कि , भारताला कळणार नाही.

पण  भारताला पाकच्या या प्लॅनची चाहूल लागली एप्रिलच्या पाहिल्या आठवड्यात. जेव्हा काही गुरं चरणारे आपल्या जनावारांच्या शोधात डोंगरावर गेलं होती. तेव्हा त्यांना काही लोक खोदकाम करताना दिसली ज्यांच्याकडं बंदुका होत्या. हि माहिती त्यांनी लगेच भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचवली. 

सुरुवातील भारतीय सैन्याला वाटलं कि हे काम मुजाहिद्दीनचं असेल. पण जेव्हा ते प्रत्यक्षात तिथं गेले त्यांना मोठ्या गोळीबाराचा सामना करावा लागला. ज्यामुळे सैन्याला समजलं कि दुसरं -तिसरं कोणी नाही तर पाकचं सैन्य आहे.  हे लक्षात घेता भारतानं सुद्धा ऑपरेशन आखलं आणि नाव दिल ऑपरेशन विजय.

याअंतर्गत जम्मू- काश्मीरचा नाही तर देशातच्या बऱ्याच भागातून सैन्य मागवलं गेलं. मोठ्या प्रमाणात गोळीबार असूनही भारतानं श्रीनगर- लेह हायवे आपल्या ताब्यातून जाऊ दिला नाही. भारतानं पाकच्या सैन्यावर निशाणा साधला. भारतीय सैनिकांनी एक- एक करत डोंगरावर चढाई करायला सुरुवात केली. त्यात भारताची वायुसेना सुद्धा सहभागी झाली.  भारताच्या या खेळीमुळं पाकचं सैन्य चांगलंच गोत्यात सापडलं होत. 

त्यात शांती कराराचा भंग केल्यामूळ भारत पाकवर दुसरीकडूनही दबाव टाकत होतं. पण पाकिस्तान हे मानायलाच तयार नव्हतं कि ते सैनिक आपले आहेत. पण युद्धविरामच्या अपीलमुळे पाक सतत एक्सपोज होत होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चांगलीच छाप उमटत होती.

दरम्यान, या प्रकरणाने जास्तचं पेट घेतलाय  हे पाहता पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भाषण करत म्हंटल कि, ते कारगिलची जागा रिकामी करायला तयार आहे. पण त्यांनी हे मान्य केलं नाही कि, सैनिक त्यांचेच आहेत. 

तिकडे पाकिस्तान आपल्या सैनिकांपर्यंत बचाव पथक पोहोचवू शकत नव्हतं, ना वायुसेनेला तिथं पाठवू शकत होता. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे मशर्रफ़ने या प्लॅनची माहिती पाकच्या एअर चीफ आणि नेव्ही चीफला दिलेली नव्हती. शेवटी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीनीं पाकला जाऊ देण्याचं सांगितलं आणि ऑपरेशन विजय यशस्वी झालं. त्यानंतर अखेर २६ जुलैला कारगिल युद्ध संपलं, आजचा दिवस कारगिल युद्धात शहिद झालेल्यांना आदरांजली म्ह्णून वाहिला जातो.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.