आर्यन खानला नेणाऱ्या एनसीबी टीममध्ये भाजप कार्यकर्ता कसा घुसला ? राष्ट्रवादीचा आरोप

सद्या एकच प्रकरण सगळीकडे चर्चेत आहे. ते म्हणजे मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकत आर्यन खान ला अटक केले गेले. बरं या विषय सुरु होऊन काही दिवस झाले. आता यात आणखी एक ट्वीस्ट आलाय तो म्हणजे नवाब मलिक यांनी केलेलं वक्तव्य.

शनिवारच्या रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली. यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आणि आर्यन खानसह १६ जणांना अटक केली आहे.

आता या प्रकरणात राष्ट्रवादीने डोकं घातलं आहे. आजच राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलं नाही तर आणखी एक खळबळजनक दावा असा केला गेला आहे कि, या प्रकरणाच्या कारवाईत आणखी एक व्यक्ती आहे तो म्हणजे म्हणजे मनीष भानुशाली. ज्याचं भाजप कनेक्शन असल्याचं सांगितलं गेलं.

कोण आहे मनिष भानुशाली जो राष्ट्रवादीच्या टार्गेटवर आहे? फडणवीसांसोबत फोटो, गंभीर आरोप कोणते?

आणि मग त्यांनी मनीष भानुशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांसोबतचे फोटो माध्यमांना दाखवले.

Manish Bhanushali Bjp (@manishbjp) | Twitter

आर्यन खान सोबत जो सेल्फी व्हायरल झाला होता तो एनसीबीचा अधिकारी नव्हताच.

३ ऑक्टोबर रोजी या प्रकरणात जी कारवाई झाली त्यात सहभागी असलेले दोन व्यक्ती एनसीबीचे नव्हतेच असा दावा नवाब मलिक यांनी केलाय. त्यातली एक व्यक्ती म्हणजे के.पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती म्हणजे मनीष भानुशाली हा होय.

मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवाल करीत एनसीबीच याबद्दल उत्तर देऊ शकते असंही ते म्हणाले. याबाबत शोध लावला असत त्याची सोशल मिडियावर ची जी माहिती आहे. त्याचं प्रोफाईल जे आहे त्यावर भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. आणि त्याचे भाजपचे मोठे मोठे नेत्यांसोबत फोटो देखील आहेत. त्यात नरेंद्र मोदी, अमित यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो आहे..

bhanushali 4.jpeg?w=800&dpr=1

मग यात महत्वाचा आणि संशयास्पद प्रश्न समोर येतोय कि, एनसीबीचा आणि मनीष भानुशालीचा काय  संबंध आहे? 

  आणखी एक म्हणजे या मनीष भानुशाली याचं गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय? 

नवाब मलिक यांनी अनेक घटनाक्रम सांगितला, २१ तारखेला मनीष भानुशाली हा दिल्लीमध्ये जाही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर २२ तारखेला गांधी नगरमध्ये. त्याच्या नंतर २८ रोजी गांधी नगरच्या मंत्रालयात त्याच्या बैठकी सुरू होत्या. पण मधल्या काळात म्हणजेच २१-२२ तारखेला गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३ हजार कोटी ड्रग्जचे कंसाईन पकडले गेले जे कि, अफगाणिस्तानहून आले होते.

मग याच घटनेच्या दरम्यान मनीष भानुशाली दिल्लीमध्ये कोण- कोणाला भेटत होता, गुजरातमधील कोणत्या मंत्र्यांसोबत त्याच्या बैठका चालू होत्या. सलग २८ तारखेपर्यंत गुजरातच्या मंत्रालयमध्ये भानुशाली काय करत होता. बर त्यानंतर तो २८ तारखेला पुन्हा मुंबईत परतला. आणि १ तारखेला गुजरातच्या मंत्रालयात जाऊन त्याने राणा नावाच्या मंत्र्यासोबत बैठक केली. त्यानंतर ३ तारखेला हि धाड पडली.

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एनसीबी देणार का ?

नवाब मलिक यांनी भानुशाली ची सगळी कुंडलीच माध्यमांसमोर मांडली आहे. आता इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या कारवाईमध्ये सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते काय करतात हा गंभीर प्रश्न आहे असं ते म्हणाले.  एनसीबीचा वापर करून भारतीय जनता पार्टी लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.