या सगळ्या राड्यात खरं सरप्राईझ तर या ३ आमदारांना मिळालेलं मंत्रिपद आहे…

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. या घटनेला वर्षभर झाल्यानंतर आता अजित पवार यांनी बॉम्ब फोडला. त्यांनी अचानक सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि शपथविधी देखील पार पडला. अजित पवार यांच्याशिवाय ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवारांची भूमिका त्यांचा शपथविधी हे सरप्राईझ पचवेपर्यंत  अजित पवारांनी दुसरा बॉम्ब फुटला तो त्यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला. या सगळ्या घडामोडीमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट घडली ती अजित पवारांच्या गटात सामील असलेले नावं.  या यादीत शरद पवारांचे निष्ठावान नेते देखील सामील आहेत. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर असे मातब्बर नेते या बंडात सहभागी आहेत.

पण शपथविधी सोहळ्यावर नजर मारली तर संधी मिळालेली नाव आहेत ते म्हणजे,

  • अजित पवार
  • छगन भुजबळ
  • दिलीप वळसे पाटील
  • हसन मुश्रीफ
  • धनंजय मुंडे
  • धर्मरावबाबा आत्राम
  • आदिती तटकरे
  • संजय बनसोडे
  • अनिल पाटील

यातले भुजबळ, वळसे,हसन मुश्रीफ, मुंडे हे नेते सोडले तर बाकीच्या चार नावांची अनपेक्षित एंट्री झालेली आहे. ती नावं म्हणजे आदिती तटकरे,संजय बनसोडे,अनिल पाटील,धर्मरावबाबा आत्राम.

हि नावं पाहिल्यास लक्षात घ्या कि, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम हि नावं ना चर्चेत असतात ना त्यांच्या कसल्याही चौकशा सुरु आहेत ना त्यांच्यावर कसलेही आरोप आहेत. त्यामुळे या अनपेक्षित घडामोडींमध्ये खरं सरप्राईझ तर या ३ आमदारांना मिळालेलं मंत्रिपद आहे.  त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…

धर्मरावबाबा आत्राम कोण तर ?

अहेरी विधानसभेचे आमदार. गडचिरोली-चिमूर लोकसभा आपणच लढणार यावर काँग्रेस ठाम होती तर ही लोकसभा लढविण्यासाठी सुरुवातीपासूनच गडचिरोलीच्या अहेरी विधानसभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम हे तयार होते.लोकसभा लढवण्याचा मनसुबा त्यांनी कधीही लपवून ठेवला नाही. ते आपण ही लोकसभा लढविणार हे सातत्याने सांगत आले आहेत. त्यांनी आपली अहेरी विधानसभा त्यांची कन्या जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यासाठी सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपल्या कन्येला उभे करणार आणि स्वतः लोकसभेला उभं राहणार असा त्यांचा प्लॅन आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत ही लोकसभा काँग्रेसनेच लढवली आहे. त्यातही मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपकडून पराभूत झालीय. तरीही काँग्रेस या लोकसभेवरचा आपला हक्क सोडत नव्हती. अशा स्थितीत धर्मरावबाबा आत्राम भाजपकडे तिकीट मागू शकतात अशी चर्चा होती मात्र ती वेळच आली नाही. धर्मरावबाबा आत्राम यापूर्वीही भाजपमध्ये जाऊन आले आहेत. मात्र यावेळेस त्यांनी अजित पवारांना पाठिंबा देत आपला मार्ग निवडलेला आहे.

आमदार अनिल पाटील कोण ?

अनिल पाटील यांना लाभक्षेत्र विकास प्राधिकरण खातं देण्यात आलं आहे. अनिल पाटील यांना अजित पवार गटाचं मानलं जातं, कारण २०१९ च्या सकाळच्या शपथविधीच्या वेळेसही ते अजित पवारांच्या पाठीशी होते. अनिल पाटील म्हणजे जळगाव जिल्ह्यातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. खरं तर अनिल पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भाजपमधूनच केलेली. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि नंतर २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा अमळनेरमधून उभे राहिले होते मात्र त्यांचा पराभव झालेला. त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. आणि अचानक त्यांना मंत्रिपदाची लाॅटरी लागली असं आता म्हणावं लागेल. त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यास आता भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्यानंतर तिसरे मंत्री लाभलेत.

संजय बनसोडे कोण ?

उदगीरचे आमदार म्हणजे संजय बनसोडे. महाविकास आघाडीचं सरकार बनण्यापूर्वी गायब असणाऱ्या एका आमदाराचा शोध जेव्हा सुरू होता तेव्हा चर्चेत आलेलं नाव होतं, संजय बनसोडे यांचं. पुन्हा अजित पवार न रिचेबल झाले तेंव्हाही संजय बनसोडे यांनी अजित पवारांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. कायम दादानिष्ठ अशी ओळख असलेलं संजय बनसोडे महाविकास आघाडीत पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री झालेले, आणि आत्ताही त्यांना त्यांचं बक्षीस मिळालं आहे.

संजय बनसोडे यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसपासून झालेली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेसपासून त्यांनी कामाची सुरुवात केली. अजित पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून पराभूत झालेले मात्र २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

थोडक्यात या तिन्ही आमदारांची माहिती घेतली तर लक्षात येतं कि हे आमदार अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात.

हे हि वाच भिडू :

दस का दम : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दहा खास वैशिष्ट्ये

राज्यात मंत्री झाले तरी पंतप्रधानांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा देऊ दिला नाही

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.