शहाभाईच्या उदाहरणावरून कळतंय , ५०० रुपयाच्या उधारीवर हजार करोडची कंपनी उभारता येते….

आपल्या कामाप्रती जर आपण प्रामाणिक असेल तर आपलं काम हमखास होत म्हणजे होतंच. आजचा किस्सासुद्धा तसाच आहे. नितीन शहा या एका साध्या माणसाने शून्यातून सुरवात केली आणि आज त्यांची कंपनी जगातली सर्वोत्तम फायर प्रोटेक्शन प्रोडक्ट बनवते त्यात केमिकल, गॅसेस आणि पाणी यांचाही समावेश आहे. तर या कंपनीची यशोगाथा आपण जाणून घेऊया कि नितीन शहा यांनी हि गगनभरारी कशी मारली होती.

नितीन शहा यांच्या वडिलांची झिनीथ फायर सर्व्हिसेस नावाची एक छोटेखानी फायरफायटिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग फर्म होती. वयाच्या आठव्या वर्षापासूनच नितीन यांना वडिलांच्या व्यवसायात इंटरेस्ट होता, अभ्यास करायचं सोडून ते वडिलांसोबत त्यांचच काम बघत बसत असे. नितीन हे घरातले धाकडे चिरंजीव होते त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाने कंपनी आपल्या हातात घेतली. कालांतराने नितीन यांच्या मोठ्या भावाने नितीनच्या हाती काहीच लागू दिलं नाही आणि कंपनीवर आपला हक्क सांगू लागला. 

आता या वादात न पडायचं असं नितीन शहांनी ठरवलं होतं. यावर इलाज म्हणून नितीन यांनी स्वतःची कंपनी सुरु करायचं ठरवलं. आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असले तर भांडवल लागतं पण नितीन यांच्याकडे साधे १० रुपये सुद्धा नव्हते. पण काहीतरी हालचाल करावी लागेल म्हणून नितीन यांनी मित्राकडून ५०० रुपये उधारीवर घेतले आणि ते एका ऑटो गॅरेजमध्ये काम करू लागले.

१९८४ च्या काळची हि गोष्ट असेल, त्यावेळी नितीन शहा हे मॅकेनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून बसले होते. सुरवातीला वडिलांसोबत काम करताना त्यांनी काही महत्वाचे कॉन्टॅक्ट जपून ठेवलेले होते. त्यापैकीच एकजण हे डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी [ DAE  ] मध्ये सिनियर ऍडव्हायजर होते. त्यांनी नितीन शहा यांचं टॅलेंट बघून त्यांना फायर एक्स्टिंग्विशरच्या मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट दिलं.

हे कॉन्ट्रॅक्ट मिळणं म्हणजे नितीन शहा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं होतं. या कामासाठी मनुष्यबळ लागणार होतं म्हणून नितीन यांनी अजून ३ लोकांना आपल्यासोबत घेतलं आणि काम सुरु केलं. सुरवातीला लागणाऱ्या ट्रॉलीज, बेल्ट्स या गोष्टी नव्हत्या जितक्या होत्या त्यावरच त्यांनी काम सुरवात केलं. या काँट्रॅक्टमधून नितीन यांना थोडेफार पैसे मिळाले.

पण सहा सात महिन्यातच त्यांना या व्यवसायाची गणितं कळाली आणि त्यांनी २० लाख रुपये जमा करून घाटकोपरमध्ये जमीन विकत घेतली आणि नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्री नावाने स्वतःची कंपनी सुरु केली.

DAE मधल्या कामाच्या जोरावर १९८६ मध्ये ओएनजीसीमध्ये मेंटेनन्सचं कामसुद्धा मिळालं. याच काळात कंपनीने वेग धरला आणि अनेक मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवली. या दरम्यानच्या काळात ७ करोड इतका टर्न ओव्हर कंपनीने केला होता.

१९८७ मध्ये कंपनीने विस्तार करत गुजरातच्या उमरगावमध्ये जमीन खरेदी केली आणि २५ कर्मचाऱ्यांच्या जोरावर फायरफायटिंग इक्विपमेंटची मॅन्युफॅक्चरिंग सुरु केली. मुंबईमधल्या कंपनीत तेव्हा फक्त ५ कर्मचारी होते कारण त्यांच्याकडे DAE आणि ओएनजीसीचे काँट्रॅक्टस होते. दरवर्षी कंपनी प्रगतीच करत राहिली. १९८८ मध्ये नितीन शहा यांनी अजून एक ऑफिस सुरु केलं. साधनांचं डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्स  अशा सुविधा या ऑफिसमधून देण्यात येऊ लागल्या.

१९८९ मध्ये नितीन शहा यांनी युकेची कंपनी अपोलोसोबत फायर डिटेक्टर्स हातमिळवणी केली आणि  ६५ करोड रुपयाचा आयपीओ आणला. या कंपनीची खासियत म्हणजे हि एकमेव अशी कंपनी आहे जी केमिकल गॅस आणि पाण्यासहीत सगळ्या प्रकारचे फायर प्रोटेक्टिन्ग प्रोडक्ट बनवते. आज घडीला नितीन शहा यांची नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्री १००० करोडची उलाढाल करते.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.