आता D2M मुळे इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्ही पाहणं होणार शक्य

समजा तुम्हाला जर म्हणलं की तुमच्या मोबईलमध्ये नेट नसेल तरीही तुम्ही व्हिडिओ, पिक्चर आणि लाईव्ह क्रिकेट पाहू शकता. आता तुम्ही म्हणालं, इंटरनेट शिवाय हे कसं शक्य होणार आहे. महिन्याला जिओ, अरटेल किंवा मग व्ही-आयचा पॅक मारावाच लागतो. तेंव्हा कुठे अनलिमिटेड इंटरनेट मिळतं. पण, येत्या काही दिवसात तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय हे सारं काही बघु शकणार आहात. आता तुम्ही म्हणालं ते कसं? तर, ते D2M च्या सहाय्याने शक्य होणार आहे. आता तुम्ही म्हणाल ही D2M काय भानगड आहे आणि याचा फायदा आपल्याला काय होणार? आणि जिथे फायदा येतो तिथे तोटा पण असतो. म्हणून याचा तोटा काय होणार आहे? हे कधी सुरू होणार आहे? या साऱ्या प्रश्नाची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

सुरवातीला आपण पाहणार आहोत हे D2M म्हणजे काय आहे आणि याचा वापर कशा पध्दतीने होऊ शकतो.

D2M म्हणजे डायरेक्ट टू मोबाईल. हे नाव D2H वरून घेण्यात आलेलं आहे, ज्या पध्दतीने आपण D2H च्या माध्यमातून डायरेक्ट टू होम टिव्ही पाहू शकतो. अगदी तसचं डायरेक्ट टू मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट शिवाय बातम्या, पिक्चर, लाईव्ह क्रिकेट आणि इतर कंटेन्ट पाहू शकणार आहोत. आपण मोबाईलमध्ये इंटरनेट शिवाय ज्या पध्दतीने रेडीओ एकतो अगदी तशाच पध्दतीने हे वापरता येणार आहे. इंटरनेटवर जे काही पोस्ट केले जातं, जे काही वेबसाईटवर पोस्ट केलं जातं, तो सर्व कंटेट या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत, आता त्यात यूट्यूब असू शकत, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम हे सर्व इंटरनेट शिवाय वापरू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे सर्व तर ठीक आहे. पण, OTT प्लॅटफॉर्म जसे की Hotstar, Sony Liv, Zee 5, Amazon Prime आणि Netflix यांच्यावर तर आम्ही जास्त वेळा वेब सिरीज आणि पिक्चर पाहतो त्याचं काय? तर होय, OTT प्लॅटफॉर्म जसे Amazon Prime, Netflix इत्यादी, जे काही इंटरनेटवर आहे ते सर्वकाही ऍक्सेस तुम्ही करू शकता, आणि त्यालाही इंटरनेटची गरज नाही.

आता मुद्दा येतो D2M चा आपल्याला फायदा कसा आणि किती होणार ते.

याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे याला कोणत्याही नेटवर्कची गरज लागणार नाही. म्हणजे सहजतेने आपल्याला ते कुठेही वापरता येईल. आपण कोणत्याही ठिकाणी कुठेही इंटरनेट ऍक्सेस करू शकतो, तसेच सरकारला अपतकालीन मॅसेजही इंटरनेट शिवाय देता येणार आहे. सरकारला वाटेल तेंव्हा कोणताही निर्णय घेणं सहज शक्य होईल, जसे की इंस्टाग्राम बंद करायचे असेल तर फक्त इंस्टाग्राम बंद होईल आणि बाकी सर्व काही चालू राहील.

आपण बोलताना अनेक वेळा आपले कॉल ड्राप होत असतात. यामुळे आता तेही होणार नाहीत आणि आपल्याला इंटरनेट मिळवण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याचा फायदा असा होईल की इन्टरनेट पॅक स्वस्त होतील आणि यामुळे ज्या ठीकाणी इन्टरनेट नाही त्या ठीकाणीही कुठलीही माहीती सहज पोहचेल.  याचा विशेष फायदा अनेक कंपन्यांना, ग्रामिण भागातील लोकांनां आणि विद्यार्थांना होईल.

आपण D2M बद्दल बघितलं, त्याचे फायदे देखील बरेच आहेत ते ही बघितले. पण आता प्रश्न पडतो हे D2M काम कसं करत?

D2M जोडायला सॅटेलाइटचा वापर केला जाईल, तुमचा मोबाईल सॅटेलाइटद्वारे जोडला जाईल, ज्यामुळे इंटरनेटवर असलेल्या सर्व गोष्टी बफरिंगशिवाय पाहता येतील. फक्त सॅटेलाइटच्या माध्यमातून हे संपूर्ण भारतातील लोकांना जोडलं जावू शकतं आणि भारत सरकार यावर आता मोठ्या प्रमाणात कामही करत आहे. त्याची चाचणी देखील IIT कानपूर द्वारे केली गेली आहे. आता हे किती दिवसात लॉन्च होईल हे पाहाणं महत्वाचं आसणार आहे.

या D2M चे जेवढे जास्त फायदे आहेत. तसेच तोटे ही आहेत. यामुळे अनेक कंपन्यांचं दिवाळ निघणार आहे.

सध्या तुमच्या घरी डिश कनेक्शनद्वारे चॅनेल थेट टीव्हीवर दिसत आहेत. या डायरेक्ट 2 होम सुविधेच्या धरतीवर, सरकार आता डायरेक्ट 2 मोबाइल सेवा सुरू करण्याचा विचारात आहे. म्हणजेच तुमच्या टीव्ही स्क्रीनऐवजी तुम्ही थेट मोबाइल स्क्रीनवरच टीव्ही चॅनेल पाहू शकणार आहात. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो. सध्या देशात टीव्ही सुमारे २२ कोटी घरांपर्यंत पोहचला आहे, तर देशातील स्मार्टफोन वापरणाऱ्याची संख्या 80 कोटी आहे, जी २०२६ पर्यंत १०० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या फोनवर ८० टक्के इंटरनेटचा वापर व्हिडिओवर होतो, अशा स्थितीत फोनवर टीव्ही पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देणं हे मार्केटमध्ये मोठं गेम चेंजर ठरणार आहे.

यात टिव्ही कंपन्यांनां आणि Jio, Airtel, Vodafone Idea चे सिम चालवणाऱ्या कंपन्यानां यांचा मोठा फटका बसु शकतो आणि आर्थिक नुकसानही सहन कराव लागु शकतं.

आता हे D2M कधी येणार ही उत्सुकता सर्वांनांच लागलेली आहे.

बऱ्याच टीव्ही कंपन्यानी सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध केला आहे. डायरेक्ट २ मोबाईल सुरू करण्याबाबत पुढील आठवड्यात मोठी बैठक होणार आहे. यामध्ये दूरसंचार विभागा व्यतिरिक्त माहिती प्रसारण मंत्रालय आणि आयआयटी कानपूरचे अधिकारी सहभागी होणार आहेत. यासोबतच दूरसंचार आणि ब्रॉडबँड उद्योगाचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.पण, सरकारचं म्हणंण आहे की सगळ्यांनां विचारात घेऊनच हे D2M लॉन्च केलं जाईल.

D2M मुळे होणारे फायदे लक्षात घेतले तर, हे सर्वसामान्य लोकांनां परवडेल आणि फायदा होईल असचं दिसतंय. पण, यामुळे अनेक कंपन्यांनां फटका बसणार आहे. आता यासाठी विरोधही केला जातोय. आता या सगळ्यावर काय निर्णय होईल आणि D2M हे सर्वसामन्याच्या उपयोगाला कधी येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.