दक्षिण भारतात भाजपाला पहिले यश मिळवून देणारे रेड्डी बंधू आता भाजपला अडचणीचे ठरणार आहेत

पक्षाच्या स्थापनेपासून हिंदुत्वचा पुरस्कार करणाऱ्या भाजपाला दक्षिण भारतात एंट्री मिळवायला बरेच कष्ट घ्यायला लागले. आजही कर्नाटक सोडले तर दक्षिण भारतातील दुसऱ्या राज्यात यश मिळाले नाही.

कर्नाटकात भाजपा यश मिळवून दिलं ते रेड्डी बंधूनी.  मात्र रेड्डी बंधू २०११ मध्ये खाण घोटाळ्यात अडकले आणि पक्ष सोडावा लागला. तिथून राजकीय वनवास सुरु झाला.

पुन्हा रेड्डी बंधू चर्चेत येण्याचे कारण म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतच्या पार्श्वभूमीवर नवीन पक्षाची त्यांनी केलेली स्थापना.

माजी मंत्री जनार्दन रेड्डी ने २५ वर्षांपासून भाजप सोबत असणारे नाते तोडले आहे. आता त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली आहे. कल्याण राज्य प्रगती पार्टी असे पक्षाचे नाव ठेवले आहे. कधी काळी  कर्नाटकात भाजपाला सत्ता मिळवून देणारे रेड्डी बंधू आता भाजपचा रस्त्यात आडकाठी करण्याची तयारी करत आहे.

ही गोष्ट आहे जनार्दन रेड्डी यांची. ज्यांनी भाजपाला सत्ता मिळवून दिली मात्र चुकीच्या केलेल्या कामामुळे जेल मध्ये गेले आणि सगळं गमावून बसले.

कर्नाटकातील राजकारणात जनार्दन रेड्डी आणि त्यांच्या भावांना रेड्डी बदर्स म्हणून ओळखलं जातं. ते तिघे भाऊ आहे. सगळ्यात मोठे गली कमलाकर रेड्डी, दुसऱ्या नंबरचे जनार्दन रेड्डी आणि सगळ्यात लहान भाई सोमशेखर रेड्डी हे बेल्लोरी येथून आमदार आहेत. कमलाकर आणि सोमेश्वर रेड्डी हे दोन भाऊ आमदार आहे. कर्नाटक आणि आंध्र सीमा भागांमध्ये रेड्डीच वर्चस्व राहिलं आहे.

तसे रेड्डी मूळचे कर्नाटकचे नाहीत. त्यांचे वडील आंध्रप्रदेश मधील अनंतपूर जिल्हात पोलीस कॉन्स्टेबल होते. त्यानंतर त्यांची बदली बेल्लोरी येथे झाली. ही गोष्ट त्याकाळातील आहे. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश हा मद्रास प्रेसिडेंसीचा भाग होता. १९५६ मध्ये कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा दोन राज्यांची निर्माती झाली. त्यानंतर रेड्डीचे वडील कर्नाटकातील बेल्लोरी येथे स्थायिक झाले.

अशा प्रकारे मूळचे आंध्रमधील अनंतपूर येथतील रेड्डी कर्नाटकचे झाले.

तीनही भावात जनार्दन रेड्डी हुशार होते. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर जनार्दन रेड्डी यांनी कोलकत्ता येथे जाऊन एका खासगी कंपनीत कामाला सुरुवात केली. विमा कंपनीत त्यांनी अनेक अपघाताची प्रकरणे चांगल्या प्रकारे हाताळली. त्यातून चांगले पैसे कमावले आणि स्वतःची एक कंपनी स्थापन केली.

जनार्दन रेड्डी यांनी एक पेपर सुद्धा सुरु केला होता. यातून त्यांची मोठं मोठ्या लोकांमध्ये उठबस सुरु झाली. कर्नाटकातील नेते श्रीरामुलु यांची ओळख झाली. एका खाणीच्या प्रकरणात जनार्दन रेड्डीना चांगले पैसे मिळाले. त्यांनी या पैश्याच्या माध्यमातून आंध्रमधील ओबालापुरम येथे खनन कंपनी विकत घेतली. ततसेच आंध्रमधील काँग्रेस नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रशेखर वायएसआर रेड्डी यांच्याशी जवळीक वाढवली. या काळात त्यांना आंध्रमधील काही ठिकाणी गौण खनिज लायसेन्स मिळविले.

खाण कामात त्यांनी चांगलाच जम बसवला.

जनार्दन रेड्डींची कंपनी आंध्र मध्ये होती. मात्र त्यांनी काही काळानंतर कर्नाटकातील बेल्लोरीतही कामाला घ्यायला सुरुवात केली. यातून चांगली कमाई झाली. त्यानंतर रेड्डी बंधूनी आपला मोर्चा वळवला तो राजकारणाकडे.

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अमेठी बरोबर बेल्लोरी या दोन ठिकाणावरून उभ्या होत्या. त्यांच्या विरोधात भाजपच्या सुषमा स्वराज निवडणूक लढवत होत्या. रेड्डींनी ही संधी हेरली. भलेही या निवडणुकीत स्वराज यांचा पराभव झाला झाला. यानंतर रेड्डींनी स्वराज यांच्याशी जवळीक वाढवून घेतली.

बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वखाली २००८ साली कर्नाटक मध्ये भाजपचं सरकार आलं. हे सरकार आणण्यात रेड्डी बंधूंची महत्वाची भूमिका होती.

२००८ च्या निवडणुकीत भाजपाचे ११० आमदार निवडून आले होते.  मात्र सरकार स्थापन करण्यासाठी ३ आमदार कमी पडत होते. अशावेळी रेड्डीनी ५ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला आणि भाजपचे सरकार स्थापन झाले.

कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन व्हावे यासाठी ऑपरेशन लोटस त्यांनी राबवल्याचे सांगितलं जातं. यानंतर काँग्रेस आणि जनता दलाचे काही आमदार भाजपसासाठी फोडले. यामुळे सभागृहात भाजपच्या आमदारांची संख्या ११५ पर्यंत पोहचली होती. या सरकारमध्ये जनार्दन रेड्डी आणि त्यांचा भाऊ मंत्री झाले.

सत्तेत असतांना अवैध खणन  रेड्डींकडून करण्यात येत होते. २००९ अवैध खणनप्रकरणी त्यांच्यावर सीबीआय मार्फत चौकशी सुरु झाली. २०११ मध्ये कर्नाटकचे लोकयुक्त संतोष हेगडे या प्रकरणाचा तपास केला आणि रेड्डी बंधूनी चुकीच्या पद्धतीने अवैध खणन केले. याप्रकरणात २०११ मध्ये जनार्दन रेड्डी यांना अटक झाली आणि येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला.

येडियुरप्पा आणि रेड्डी भावंडानी भाजप सोडली. दोघांनीही नवीन पक्ष स्थापन केले. २०१३ मध्ये भाजपाला हरवण्यासाठी यांनी बरीच मेहनत घेतली. रेड्डी बंधू त्यावेळी जेल मध्ये होते. कर्नाटक मध्ये काँग्रेसचे सरकार आले होते. त्यामुळे रेड्डी बंधूचा खणन व्यवसाय संकटात सापडला होता. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी येडियुरप्पा भाजप मध्ये आहे. २०१५ मध्ये रेड्डीना जमीन मिळाला.

२०१८ च्या निवडणुकीत भाजप जनार्दन रेड्डी दोन्ही भावांना सोबत घेतले. त्यांना तिकीट दिलं आणि निवडून आणले. अनेक भागात या रेड्डीनी आपली ताकत दाखवून भाजपला चांगले यश मिळवून दिले होते.

आता जनार्दन रेड्डी यांनी नवीन पक्ष स्थापन केला आणि आगामी विधानसभा निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. भाजप मध्ये असणारे त्यांचे भाऊ भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दक्षिण भारतात भाजपाला पहिले यश मिळवून देणारे रेड्डी बंधू आता भाजपला अडचणीचे ठरू शकतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.