जगातला सर्वात डेरिंगबाज नवरा. 

बायकोला खूष करायचं असेल तर तिला घराच्या किल्ल्या द्याव्यात. महिन्याचा हिशोब तिच्याच हातात द्यावा. बायको साधारण चुकत नाहीच. आणि चुकलीच तर तिला प्रश्न विचारायचे नाहीत. चार पाच हजारांने आपण डबऱ्यात गेलो तरी चालेल पण बायकोला कधी प्रश्न विचारायचे नाहीत. हेच सुखी संसाराच रहस्य असतय. 

पण भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठ्ठ कांड आज झालय.

झालंय काय तर भारताच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याकडे. आत्ता निर्मला सितारमण म्हणल्यानंतर तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, अगदी कट्टर भाजपवाले असलात तरी तुम्हाला पण माहिताय मॅडमच जरा चुकतच असतय.

म्हणजे ऑटो सेक्टरमधल्या मंदीला त्यांनी ओला आणि उबेरचा वापर वाढला आहे म्हणून चारचाकी गाड्यांचा खप कमी झालाय अस उत्तर दिलेलं तेव्हा कट्टर नमो फॅननी देखील नाक मुरडलेली. अधूनमधून काहीतरी वंगाळ बोलून स्वत:चा वडापाव करण्यात त्यांचा हातखंडा आहे. यापुर्वी त्या संरक्षणमंत्री होत्या. तेव्हा रॉफेलबद्दलची त्यांची मते ऐकून लोकांना आकडी यायची. आत्ता त्यांना अर्थमंत्री करण्यात आलं.

मोदी सरकारमध्ये काही ठराविक मंत्री का आहेत हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडतो. असा प्रश्न पडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या त्या क्रमांक एकच्या मंत्री आहेत. 

तर असो, मंत्री आहेत म्हणल्यानंतर त्यांना कोणी काहीच बोलत नाही. त्याचही देशाच्या किल्ल्या त्यांच्या हातात असल्यानंतर कोणी बोलणं शक्यच नाही. 

पण झालं अस की घरचा आहेर म्हणजे काय असतो ते खुद्द त्यांच्या नवऱ्याने आज सप्रमाण दाखवून दिलं.

आत्ता इथे सांगण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा नवरा अशी त्यांची ओळख नाही. बायको देशाचा अर्थव्यवहार बघते आणि हे मिस्टर भाजी आणायला जातात असही नाही. तर ते स्वत: एक नावाजलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत.

परकला प्रभाकर अस त्यांच नाव असून ते आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये ते संचार क्षेत्रासाठी सल्लागार राहिलेले आहेत. सध्या हैद्राबादस्थित असणाऱ्या राईटफोलियो कंपनीचे ते निर्देशक आहेत. बर दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साहेबांनी हे ताशेरे कुठल्या चौकात नाहीतर संध्याकाळच्या मैफिलीत आपल्या मित्रांपुढे ओढलेले नाहीत तर त्यांनी थेट द हिंदू या सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात चांगला पानभर लेख लिहून अर्थव्यवस्थेचे वाभाडे जगजाहिर केले आहेत. 

त्यांनी काय केलय तर द हिंदू मध्ये द लोडस्टार टू स्टिर द इकॉनॉमी नावाचा लेख लिहला त्यात त्यांनी काय काय म्हणलय थोडक्यात पाहू. 

१) नेहरूंवर ताशेरे ओढायचे बास करावं, नेहरूंना दोष देवून त्यांचे मॉडेल दूस सारण्यात आलं पण त्याला पर्याय काहीच नव्हता. सरकारने नरसिंहराव-मनमोहसिंग यांच्या मॉडेलचा विचार करावा व आर्थिक मंदीच्या वातावरणात राव-मनमोहनसिंग मॉडेल राबवण्यावर भर द्यावा. 

२) देशात असणाऱ्या आर्थिक मंदीवर चिंता व्यक्त करत ते म्हणालेत की, एका बाजूला मंदी नसल्याचं सरकार सांगत आहे पण आकडेवारी स्पष्ट सांगते की देशात आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. सार्वजनिक डेटा स्पष्ट सांगतो की एकामागून एक क्षेत्र संकटात येत आहे. पर्सनल कन्झमशन दरात घट आली असून गेल्या १८ तिमाहीतील सर्वांत निच्चाकी संख्येवर हा दर आला आहे. 

३) २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत GDP हा पाच टक्यावर आला आहे. गेल्या सहा वर्षातला हा निच्चांक आहे. तरिही देखील अर्थव्यवस्थेवर आपली पकड असल्याचं सांगण्यात येत आहे. 

४) ते सांगतात की, सरकारजवळ आर्थिक रोडमॅप नाही. गेल्या काही वर्षात आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात संकट येत आहेत. “नेहरूवादी समाजवादी ढांचा” हा भारतीय जनता पक्षासाठी टिका करण्याचा विषय आहे. पण त्यांच्याकडे उत्तर नाही. जर भारतीय जनता पार्टीसाठी राजकारण म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हिरो ठरू शकतात तर पक्षभेद विसरून नरसिंहराव देखील हिरो ठरू शकतील. 

आत्ता इतकं धाडस केल्यावर शांत बसतील त्या पत्नी कसल्या. त्यांनी पण लगेच थेट टिका केलीय.

त्या म्हणाल्यात, 

२०१४ ते २०१९  च्या दरम्यान मुलभूत सुधारणा करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस GST लागू करू शकली नाही. IBC आणि आधारला सार्वभोम करण्यात आलं. उज्जवला मार्फत आठ कोटी महिलांना फायदा झाला. यावर्षीच्या बजेटमध्ये टॅक्स रिफॉर्म करण्यात आला. १ ऑक्टोंबर नंतर तुम्ही बिझनेस सुरू करणार असला तर तुम्हाला जगात सर्वात कमी टॅक्स द्यावा लागणार आहे. 

यावर त्यांच्या नवऱ्यांच उत्तर असेल मैं क्या बोल रहा हूं. आप क्या बोल रहैं हैं.

माणसाने डेअरिंग केलं अस तरी मुद्दे सोडून नवऱ्यासोबत भांडण्यात जगातील सर्व महिला सारख्या आहेत हे मात्र निर्मला सितारामण यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. 

जाता जाता निर्मला सितारमण यांचे पती परकला प्रभाकर यांच्यासाठी एक पत्ता. 

पत्नी पिडीत पुरूष आश्रम.

औरंगाबादपासून १२ किलोमीटर मुंबई शिर्डी हायवेवर.

Leave A Reply

Your email address will not be published.