पाकिस्तानमधल्या एका प्रेक्षकाने चालू मॅचमध्ये भारताच्या कॅप्टनवर हल्ला केला होता.

१९८९ साली भारताने पाकिस्तानचा दौरा केला होता. हा दौरा स्पेशल होता. पाकिस्तान संघाकडून एका मॅचमध्ये १३ जण खेळायचे. ११ खेळाडू आणि २ अंपायर. सकुर राणा नावाचे एक खतरनाक अंपायर होते. ज्या ज्या वेळी पाकिस्तानच्या बॉलरचा चेंडू बॅट्समनच्या पॅडला लागायचा त्यावेळी ते लगेच आउटचा निर्णय देऊन टाकायचे.

इम्रान खानला पाकिस्तानच्या इमेजची चिंता होती, इम्रानला वाटत होतं कि या दौऱ्यात भारतीय बोर्डाला पाकिस्तानविषयी तक्रार करण्याचा चान्स मिळाला नाही पाहिजे. म्हणून त्यासाठी पाकिस्तानी बोर्डावर प्रेशर टाकून या सीरिजसाठी इंग्लंडहून दोन अंपायर बोलावण्यात आले होते.

पण हे अंपायर बोलावून दौरा नीट पार पाडायचा होता हे राहिलं बाजूला पण भारताच्या कर्णधारावर के श्रीकांतवर पाकिस्तानच्या एका चाहत्याने हल्ला केला होता. नक्की काय विषय झाला होता सविस्तर जाऊन घेऊया.

कराचीमध्ये मॅच सुरु होती. त्याकाळात काश्मीर मुद्दा तापला होता. आतंकवाद फोफावत चालला होता. सामना सुरु असतानाही पाकिस्तानचे चाहते काश्मीर समर्थनार्थ घोषणाबाजी करत होते. पण हे झालं मैदानातील प्रकरण. पण या घटनेची सुरवात तर खूप आधी झाली होती जेव्हा एअरपोर्टवर भारतीय संघाचं आगमन झालं त्याच वेळी घोषणाबाजी सुरु झाली होती. 

हे सगळं भारतीय संघासाठी भीतीदायक वातावरण होतं. पाकिस्तानविरुद्धच्या सिरीज साठी भरपूर दबावात भारतीय संघ खेळत होता. त्यात काश्मीर प्रकरण चिघळल्याने काहीही घडू शकत होतं. पण एक घटना अशी घडली कि ज्याने सगळेच हादरले, अगदी पाकिस्तानी टीम सुद्धा.

भारतीय संघ ज्यावेळी फिल्डिंग करत होता तेव्हा अचानक एक प्रेक्षक मैदानात घुसला. पळत पळत तो के श्रीकांतजवळ गेला आणि त्याच्याशी वाद घालू लागला. सगळी टीम गोंधळात पडली कि काय विषय आहे हा. तो मैदानात घुसलेला प्रेक्षक वाद घालण्याऐवजी थेट श्रीकांतवर हल्ला करू लागला. अंपायर आणि पाकिस्तानी खेळाडू पाहतच राहिले. 

हे प्रकरण वाढणार दिसत असल्याने लगेचच भारतीय टीम त्या प्रेक्षकाच्या आजूबाजूला एकवटली. कोणी भांडण सोडवण्यात गुंतलं तर कोणी प्रेक्षकावर हात साफ करून घेऊ लागलं. सगळीकडून त्या प्रेक्षकाला भारतीय टीमने घेरलं होतं.

सगळ्यात खतरनाक दृश्य तर ते होतं जेव्हा किरण मोरे त्या प्रेक्षकाला लाथाडण्याचा प्रयत्न करत होते.

विकेट किपर किरण मोरे त्याला लाथ मारू पाहत होते पण पायात पॅड असल्याने त्यांना तसं करता येत नव्हतं पण तरी ते त्याला मारण्याचा प्रयत्न करत होते.

काही वेळाने सिक्युरिटीवाली मंडळी आली आणि त्यांनी त्या प्रेक्षकाची उचल बांगडी करून त्याला मैदानाबाहेर नेलं. संजय मांजरेकर सांगतात कि,

हि सगळी घटना मैदानातच झाली आणि मैदानातच संपली.

मीडियाला याबद्दल काहीही कळलं नाही.

आजच्या तारखेला जर मीडियाला या घटनेबद्दल समजलं असतं टीव्हीवर किती राडा झाला असता. दौरा तर त्याच वेळी कॅन्सल करण्यात आला असता.

पाकिस्तानी खेळाडू मैदानात भांडायचे पण ते आपापसांत. भारतीय खेळाडूंच्या ते नाडी लागत नसत. पाकिस्तानचा प्रत्येकी दुसरा खेळाडू कायम शिव्या देत असायचा. पण त्यांच्या रडारवर त्यांच्याच संघातील खेळाडू असायचे. एकमेकांमध्ये त्यांचं कधी जमायचं नाही. इम्रान खानच्या प्रतिष्ठेमुळे आणि आदरयुक्त भीतीमुळे हे सगळे खेळाडू एकत्र राहायचे. 

याच दौऱ्याच्या वेळी किरण मोरे आणि जावेद मियांदाद वाली कॉंट्रोव्हरसी सुद्धा चांगलीच गाजली होती. पण एखाद्या देशाच्या कॅप्टनवर थेट हल्ला करणे हे पाकिस्तानच्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून सामोरं आलं होतं. या सिरीजमध्ये चारही कसोटी सामने ड्रॉ झाले होते.

इम्रान खान पाकिस्तानची इमेज वाचवण्यासाठी इतके प्रयत्न करत होता पण खेळाडूंऐवजी पाकिस्तानी प्रेक्षकांनी ती इमेज अजून डार्क करण्यात धन्यता मानली होती.

 हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.