फुले, आंबेडकर, ओबीसी राजकारण ते मराठी भाषा अभ्यासपूर्ण माहितीसाठी हरी नरकेच आठवायचे

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या आणि अशा अनेक महापुरूषांवर भाष्य करत समग्र लिखाणासाठी परिचीत आसणारे प्राध्यापक हरी नरके यांचं आज निधन झालं आहे.

मागच्या काही दिवसांपासून हरी नरके आजारी होते. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे १५-२० दिवस उपचार घेतल्यानंतर महिन्याभरापूर्वी त्यांना राजकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. राजकोटहून मुंबईला येत असताना आज सकाळी सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांना एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची ओळख अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करत आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडवून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा समजला जातो. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

कोण आहेत प्राध्यापक हरी नरके आपण त्यांच्या बद्दल जाणून घेऊयात.

हरी रामचंद्र नरके यांचा जन्म १ जून १९६३ ला झाला. हरी नरके हे मराठी भाषेतील एक अभ्यासू वक्ते होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते ब्लॉग लिहायचे आणि व्यक्त व्हायचे. सोशल मिडीयावर त्यांच्या ब्लॉगचे चाहतेही अधिक प्रमाणात होते. विशेष म्हणजे त्यांनी मृत्यू होण्याच्या वीस मिनटाअगोदर एक सोशल मिडीयावरच्या एका मुलाखती संदर्भातील पोस्टही केली होती.

प्रा. हरी नरके एक प्रसिध्द लेखक तर होतेच, त्याच बरोबर ते पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे प्रमुख होते. महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले म्हणजे प्रा. हरी नरके यांच्या जिव्हाळ्याचा विषय. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्यावर त्यांचं खुप सारं लेखण आणि आभ्यास होता. ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ ही त्यांची पुस्तकं प्रचंड गाजली.  महाराष्ट्र शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ घेऊन प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते.

डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. पुणे विद्यापिठाला सावित्री बाई फुले नाव देण्यात आणि त्यांचा पुतळा बसवण्यात हरी नरके यांचा मोलाचा वाटा होता. त्याशिवाय महात्मा फुले यांचे मुळ छायाचित्र शोधून लोकांसमोर घेऊन येण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता.

हरी नरके यांनां ओबीसीच्या प्रश्नांची जाण अधिक प्रमाणात होती .

त्यांनी आपल्या लिखाणातून असो  किंवा अन्य माध्यमातून त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उठवला होता. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसीच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. तसेच समता परीषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसीच्या प्रश्नासाठी छगन भुजबळ यांच्या सोबतही ते काम करत होते. त्यांच्या जाण्याने समता परीषदेचंही बऱ्याच प्रमाणात नुकसान झाल्याची भावना छगन भुजबळ यांनी देखील बोलून दाखवली होती.

अभ्यासू वक्ते आणि लेखक म्हणून ते परिचीत तर होतेच. या मध्यमातून अनेक सामाजीक पदावर काम करत नेतृत्वही केलं आहे.

पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होतेच तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्यही होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वय म्हणून त्यांचं मोठं योगदान होतं.  तसेच ते छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जायचे. त्यामुळे ते समता परीषदेच्या उपाध्यक्ष पदही होते. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते.

हरी नरके आपल्या बेधडक स्वभावामुळे आणि बेधडक लिखानामुळे ओळखले जायचे. त्यांनी अब्दुल कलाम यांच्या विषयी एक पोस्ट लिहण्याने पुन्हा एकदा त्यांचा बेधडक पणा समोर आला होता.

माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त देशभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र अब्दुल कलाम यांचे राष्ट्रपती होण्यासाठी काय योगदान आहे ? असा सवाल करत हरी नरके यांनी पोस्ट केली होती. त्यांची ही पोस्ट जुनीच होती. मात्र, ती नंतर व्हायरल झाली होती. तसेच ते हिंदूत्वादी होते म्हणून त्यांनां भारतरत्न दिला गेला असं त्यांनी थेट म्हटलं होतं.

आज प्रा. हरी नरके जाण्याने आपण एक पुरोगामी चळवळीतील मोठा लेखक, वक्ता, गमावला आहे. त्यांनी महात्मा फुले यांची ओळख त्यांच्या लिखानातून करून दिली. आपले स्पष्ट मत मांडत अनेक विषयावर ते व्यक्त झाले. आज त्यांच्या जाण्याने नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे. त्यानी केलेल्या कार्याला बोल भिडूकडून अखेरचा सलाम.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.