सोळा वर्षाच्या पठ्ठ्याने चक्क क्रिकेटच्या देवाला बोल्ड केलं होतं..
सचिन तेंडुलकरची बॅटिंग कोणाला नाही माहित. त्याच्या धावांचा रेकॉर्ड ब्रेक करणं क्वचितच कोणाला जमलं असेल. विकेट घेणं तर सोडाच त्याला बॉलिंग टाकणं म्हणजे भल्याभल्या बॉलर्सना घाम फुटतो. उगीच त्याला क्रिकेटचा देवता नाही म्हणत.
पण भारतीय संघाचाचं एक खेळाडू सचिनला बॉलिंग टाकताना एकदम रिलॅक्स होता, आणि तेही पहिल्यांदाच.
हा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा अनुभवी लेग स्पिनर पियुष चावला. ज्याचं नाव भारताच्या उत्कृष्ट खेळाडूंमध्ये घेतलं जात. वयाच्या १६ व्या वर्षी त्यानं आपल्या क्रिकेट करियरला सुरुवात केली. ज्याला पाहून बऱ्याच लोकांना वाटायचं की, भारतीय संघाला त्यांचा पुढचा अनिल कुंबळे मिळाला.
‘ग्रोथिस्ट क्रिएटिव्ह’ या युट्युब चॅनलवर स्पोर्ट्स कमेंटेटर अरुण वेणुगोपाल यांच्यासोबतच्या एका चॅट शोमध्ये पियुषनं आपल्यासोबतच एक किस्सा शेयर केला. जो बराच गाजला होता.
पीयूष चावला अवघ्या १६ वर्षांचा होता, जेव्हा त्याने आपल्या करियरमध्ये पहिल्यांदा सचिन तेंडुलकरचा सामना केला होता. दिग्गज स्पिनर २००५ मध्ये चॅलेंजर ट्रॉफीच्या वेळी महान आणि अनुभवी खेळाडूंच्या विरुद्ध खेळत होता.
या अनुभवी खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा होता , जो आधीपासूनच खेळाचा एक महान दिग्गज होता. तर पियुष चावलाचं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करणं अजून बाकी होतं.
लेग स्पिनर पियुष चावला भारतीय संघाच्या सिनियर्सच्या विरूद्ध इंडिया बी साठी खेळत होता. या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये पियुष आपल्या सिनियर्सना २२ धावांवर गुंडाळण्यात यशस्वी झाला. पण तरीही भारतीय सिनियर्सनी ही मॅच तीन विकेटने आपल्या खिश्यात घातली.
तर या चॅट शोमध्ये बोलताना पियुषने सांगितले कि,
सचिन तेंडुलकरचा सामना करण्याआधी तो स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्यात यशस्वी ठरला होता, कारण या लढाईत हारण्यासाठी त्याच्याजवळ काहीच नव्हतं.
तर या सामन्यात इंडिया बी संघात स्टंपच्या मागे विकेटकिपर म्ह्णून पार्थिव पटेल होता. दिनेश या संघाचा कॅप्टन होता.
चॅट शो दरम्यान पियुष चावला म्हणतो, १५-१६ व्य वयात जेव्हा तुम्ही सचिन पाजीच्या विरुद्ध बॉलिंग करायला जाता, तेव्हा केवळ दोन गोष्टी होतातच, पहिली म्हणजे तुम्ही नर्व्हस तरी होता किंवा एकदम रिलॅक्स तरी राहता. यात माझं लक म्हणजे मी खूप रिलॅक्स होतो.
पीयूषनं म्हणाला, ‘भलेही सचिन पाजीने माझ्या बॉलवर चांगलीच धुलाई केली असती, त्याने काय फरक पडतो. कारण जर एखादा व्यक्ती ज्याने शेन वॉर्न, (मुथय्या) मुरलीधरन आणि ग्लेन मॅकग्राथसारख्या दिग्ग्जांच्या बॉलवर बाऊंड्री मारली असेल आणि नंतर माझ्या बॉलवर मारत असेल तर हि काय मोठी गोष्ट नाही. त्यावेळी माझ्याजवळ गमवण्यासारखे काहीच नव्हते. मी फक्त ‘ओह, सचिन पाजीला बॉलिंग टाकतोय’ यांचा आनंद घेत होतो.
पियुष सांगतो कि,
‘जेव्हा आपण आपल्या रन-अपने सुरुवात करता, तेव्हा आपण एक बॉलर म्हणून विचार करता कि, खरंच आपण बॉलिंग करू इच्छिता. अश्यात मला माहित नाही कि, प्रत्यक्षात काय झाले होते. जेव्हा मी आपल्या रन-अपला सुरुवात केली होती, तेव्हा मी विचार केला कि, मी लेग स्टंपपासून एक कॉमन लेग-स्पिन बॉलिंग करेल, जो बॉल त्यांच्यापासून दूर जाईल.
मला अजूनही माहित नाही, आता जवळपास १६ वर्षे झालीत, माझ्या डोक्यात नेमकं काय आलं आणि मी फक्त एकच बॉल चुकीचा टाकला.
अन पीयूषनं याच गुगलीवर सचिन तेंडुलकरला बोल्ड केलं होत. दरम्यान, लोकांना चांगलंच माहितेय कि, पियुषने सचिन तेंडुलकरला कोणत्या अंदाजात आउट केलं होत. मात्र, सचिन तेंडुलकर गोष्टी इतक्या सहजासहजी विसरणारा माणूस नाही.
पुढच्याच वर्षी चेन्नईत चॅलेंजर ट्रॉफीच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर आणि पियुष चावलाचा आमनासामना झाला. लोकांना वाटलं कि, पियुष गेल्या वेळ सारखं पुन्हा सचिनची विकेट घेईल. पण सचिनने पियुष चावलाच्या बॉलिंगच्या वेळी पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास २० रन मारले होते.
यावरूनच पियुष म्हणतं होता कि, जर सचिन पाजी माझ्या बॉलिंगवर धावा मारतात, तर ही काय मोठी गोष्ट नाही. सचिन तेंडुलकरने कित्येक बॉलर्सची धुलाई केली. त्यामुळे लोक हे काय आठवत बसत नाहीत.
आता पीयूष चावलाविषयी बोलायचं झालं तर तो सचिन तेंडुलकर नंतर टेस्टमध्ये डेब्यू करणारा सगळ्यात यंग इंडियन क्रिकेटर आहे. लेग स्पिनर म्ह्णून तो बॉलिंगमध्ये जबरदस्त तर आहेच पण सोबतच तो चांगली बॅटिंगही करतो.
२०१३ मध्ये त्यानं काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये ९ व्या नंबरवर खेळूनही शतक ठोकल होत. एवढंच नाही KKR साठी खेळताना सुद्धा पियुषने आयपीएलमध्ये १०० विकेट घेतल्यात.
दरम्यान भारतीय संघात जास्त खेळण्याची त्याला संधी मिळाली नाही. पियुष चावलाने आतापर्यंत ३ टेस्ट, २५ वनडे, ७ टी२० मॅच खेळलेत. भारतीय संघाकडून त्याने ४ वर्ल्ड कप देखील खेळाला आहे.
काल झालेल्या IPL ऑक्शन मध्ये ३४ वर्षीय पियुष चावलाला मुंबई इंडियन्सने ५० लाखात घेतले.
हे ही वाच भिडू :
- भारताकडून खेळण्यापुर्वी सचिन तेंडुलकर पाकिस्तानकडून खेळला होता.
- क्रिकेट पंढरी लॉर्ड्सवर शतक झळकवणे सचिनला फक्त एकदाच जमलं होतं..
- हे आहेत यावर्षीचं आयपीएल गाजवणारे ५ सर्वोत्तम युवा खेळाडू!!