मुरलीधरनच्या ८०० व्या विकेटसाठी आपली विकेट बहाल करणारा तो प्रग्यान ओझा होता…

क्रिकेट हा जंटलमन लोकांचा खेळ आहे. इथं स्लेजिंग चालते, जोक चालतात, ट्रोलिंग चालते इतकंच काय हाणामारी सुद्धा चालते आणि त्याच्या दुप्पट इथं खिलाडूवृत्ती दाखवली जाते. असाच किस्सा आहे आपल्या भारताच्या प्रग्यान ओझाचा. हा किस्सा मुरलीधरनच्या रेकॉर्डसोबत कायमचा अजरामर झाला. जेव्हा जेव्हा ८०० विकेटच्या चर्चा होतील तेव्हा ओझाच्या विकेट बहाल करण्याच्या वृत्तीचं देखील नाव घेतलं जाईल.

लहानपणासुनच त्याला क्रिकेटचा जबरदस्त नाद होता. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्याने क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि शेवटी क्रिकेटमध्येच करियर करायचं त्याने ठरवलं. विजय पॉल यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सहिद स्पोर्टिंग क्लब कडून खेळायला सुरवात केली.

स्थानिक क्रिकेट मध्ये ओझाच्या बॉलिंगच्या चर्चा झडू लागल्या. २००४ साली हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून त्याला खेळायची संधी मिळाली. नंतर काही वर्षांनी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून सुद्धा खेळत होता. मग आयपीएल आलं आणि प्रग्यान ओझा चमकू लागला. सुरवातीला डेक्कन चार्जेर्स आणि नंतर मुंबई इंडियन्स कडून त्याला खेळायची संधी मिळाली. आयपीएल मध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आणि त्या बळावर त्याची भारतीय संघात निवड झाली.

२००८ साली बांग्लादेश मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये प्रग्यान ओझाची निवड झाली. २८ जूनला ओझाने पदार्पण केल. वनडे मध्ये चांगली कामगिरी केल्याने २००९ साली त्याची लगेच टेस्ट संघात वर्णी लागली. ओझाने तिसऱ्या टेस्टमध्येच ५ विकेट मिळवल्या आणि भारताला विजय मिळवुन दिला. प्रग्यान ओझाचं क्रिकेट करियर चांगलंच बहरत गेलं.

ज्या ज्या वेळी विकेट मिळत नसे तेव्हा धोनी पार्टनरशिप ब्रेकर म्हणून ओझाला बॉलिंगला आणत असे.

सचिन तेंडुलकरच्या फेअरवेल मॅचमध्ये १० विकेट मिळवून प्रग्यान ओझा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आयपीएल टायटल जिंकणाऱ्या ३ संघांचा तो खेळाडू होता. १ वेळा डेक्कन चार्जर्स तर २ वेळा मुंबई इंडियन्स.

मुथय्या मुरलीधरनला ८०० वी विकेट मिळाली तर तो जागतिक पातळीवर मोठा रेकॉर्ड बनणार होता, तेव्हा ओझाने स्वतःहून आपली विकेट बहाल केली होती. यावरून त्याची खिलाडूवृत्ती दिसून आली आणि त्याचं भरपूर कौतुक सुद्धा झालं.

पण प्रग्यान ओझाला जास्त संधी मिळाल्या नाही. २४ टेस्टमध्ये त्याने ११३ विकेट्स मिळवल्या आणि १८ वनडे सामन्यात २१ विकेट. आयपीएलचा बेस्ट ज्युरी बॉलरचा अवॉर्ड त्याला मिळाला होता. २१ फेब्रुवारी २०२० साली प्रग्यान ओझाने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली, आता गडी आयपीएलच्या बॉडीवर अधिकारी म्हणून काम करतोय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.