या भेटीचा एकच अर्थ; किंगमेकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागलेत.

इथून पुढे मोदी नकोत रे बाबा, असं जर कुणी म्हणलंच तर त्यावर एक प्रतीप्रश्न ठरलेलाच असतो तो म्हणजे, मोदींना पर्याय कोण ?

तर याला एकमेव असा कुणी चेहरा जरी नसला तरीही तरी सर्व पक्षांची एकजूट म्हणजेच मोदींना पर्याय असं आपण सध्याच्या राजकीय वातावरणावरून अंदाज बांधू शकतो.

हा झाला अंदाज परंतु याला जर ऍक्शन मोड मध्ये आणायचं झालंच तर त्यासाठी तितकाच तगडा किंगमेकरही लागणार आहे.

आता मोदींच्या विरोधात आघाडी काढण्यासाठीही असाच व्यक्ती असावा का ज्याने मोदींनाच निवडून आणलं?

तर हो, प्रशांत किशोर ह्या नावातच सगळं आलं म्हणायला हरकत नाही. “भाजप प. बंगालमध्ये तीन आकडी जागा घेऊच शकत नाहीआणि जरी त्याने 100 जागा जिंकल्या तरी मी राजकीय रणनीती करणं सोडून देईल, वाटल्यास हे ट्विट सेव्ह करून ठेवा”, यातच त्यांचा कॉन्फिडन्स दिसून येतो.

प्रशांत किशोरांना तुम्ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणा किंवा पॉलिटिकल किंगमेकर म्हणा कारण तेच प्रशांत किशोर ज्यांनी भल्याभल्यांना निवडून आणलं.  त्यांनी फक्त मोदींनाच नव्हे तर अलीकडेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत डीएमके नेते स्टॅलिन, २०१५ मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांना, तर जगमोहन रेड्डी, लालू प्रसाद या बड्या नेत्यांना त्यांनी जिंकून आणलं तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना निवडून आणत त्यांनी महाराष्ट्रातही आपली जादू दाखवली.

इतके दिवस आपण तिसऱ्या आघाडीची कल्पना करीत होतो पण ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या तयारीला लागले असं आजच्याच त्यांच्या आणि शरद पवारांच्या भेटीवरून स्पष्ट होत आहे.

त्यांच्या या भेटीमुळे तसेच मागील काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय हालचालींवरून असं क्लिअर होत आहे कि ते कॉंग्रेस व्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेला लागले आहेत. 

जगमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी , लालू प्रसाद, स्टॅलिन आणि महाराष्ट्रात शरद पवार यां सारख्या तगड्या नेत्यांना हाताशी धरून हा तिसऱ्या आघाडीचा प्लॅन सक्सेसफुल होईल असं वाटत असलं तरी त्याचे नेतृत्व करणार कोण हा ही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे.

“आज न उद्या मी राजकारणात येणार” असं त्यांनी म्हणल्याप्रमाणे तर तर राजकारणात याच आघाडीद्वारे स्वतःच पर्याय म्हणून समोर येतील अशीही शक्यता आहे. ज्या प्रकारे ते या सगळ्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना ते अप्रोच होतायेत आणि विशेष म्हणजे ते पक्ष देखील किशोर यांना सकारात्मक प्रतिक्रिया देतायेत.

पण त्यांना आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती व्हायला नको म्हणजे झालं, त्याचं असं कि जेंव्हा त्यांनी सक्रीय राजकारणात पाऊल ठेवले आणि जेडीयु मध्ये प्रवेश घेतला होता. पण परंतु प्रत्यक्ष राजकारण आणि निवडणुकीचे मॅनेजमेंट याचा मेळ घालता आला नाही आणि मग ते राजकारणातून बाहेर पडले.

मोदी लाटेनंतर निवडणुकीत डाव्या पक्षांची मतं कमी व्हायला लागली तशी त्यांनी कॉंग्रेस ला हात मिळवणे भाग पडले, मात्र आता कॉंग्रेसकडे चेहरा नसल्यामुळे आता कॉंग्रेसव्यतिरिक्त कोणता पर्याय असू शकतो तर हि तिसरी आघाडी असू शकतो.

परंतु आघाडीत असणारया वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकमेकांना पचवू शकतात का नाही हे सांगणे कठीण आहे. त्यांचं आपापसात पटेल का? सपा -बसपा यांचे हेवेदावे ते विसरतील का ?

उदा. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाकडून झालेला पराभव दावे पक्ष अजूनही विसरले नाहीत. त्यांचं सोबत पटणार कि नाही हे सांगता येत नाही कारण ममता बॅनर्जीदेखील डाव्या पक्षांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण जेंव्हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदाच्या दावेदार म्हणून ममता दीदींची चर्चा चालूये.

आघाडीत असणाऱ्या पक्षांची त्यांच्या राज्यात असणारी पॉलिटिकल पॉवर

आघाडीत असणारे पक्ष आणि त्यांची ताकद लक्षात घेतली तर खरंच आघाडी यशस्वी होईल. तामिळनाडूमध्ये आत्ताच बहुमताने सत्तेत आलेले द्रविड पक्षाचे स्टॅलिन हे  १२६ आमदार घेऊन निवडून आलेत. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांच्या पक्षाचे तिथे चांगले वजन आहे. त्यांचे  १७५ पैकी १५० आमदार आहेत. आंध्र सरकारची जशी विधीमंडळात ताकद आहे तशीच त्यांची संसदेत देखील आहे, लोकसभेत २२ तर राज्यसभेत ६ खासदार आहेत. 

तसेच अलीकडेच २२० जागेने  जिंकून आलेल्या ममता दिदींनी जेंव्हा निवडणुकीचे रणशिंग फुंकले तेंव्हा त्यांनी भाजपविरोधी पक्षांना आणि नेत्यांना एकत्र येण्याचे आव्हान केले होते आणि त्यांना त्या सर्व पक्षांनी पाठींबा देखील व्यक्त केला होता. त्यामुळे साहजिकच त्या सर्व पक्षांना एकत्र करण्याची ताकद त्यांच्यात असून त्यामुळे त्या तिसऱ्या आघाडीचा चेहरा कदाचित असू शकतात.

महाराष्ट्रातील बोलायचं झालं तर,  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वजन असलेले राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा असणारे शरद पवारांना तिसर्या आघाडीत कोणतं स्थान दिलं जाईल, किंवा हि आघाडी पवारांवर किती विश्वास टाकणार हे राज्याच्या राजकारणातील एक ठळक मुद्दा आहे.कारण महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांना विशेष स्थान आहे आणि सध्या सत्तेवर असलेल्या आघाडी सरकार स्थापन करण्याचे श्रेय त्यांना जाते. शिवसेना आणि कॉंग्रेस ला एकत्र आणले हि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा बदल होता, यावरूनच त्यांची राज्यात किती ताकद असेल हे आपण जाणतोच.

आता हे सगळे नेते आपापल्या राज्यात तगडे आहेत हे नक्की. मात्र प्रत्येकाला मोठं होण्याची महत्वाकांक्षा असणे चुकीचं नाही. प्रत्येकाच्या आपापल्या स्थानिक लेव्हलच्या महत्वाकांक्षा आहेत, स्थाइन्क गणिते देखील आहेत. उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातल्या या सगळ्या नेत्यांना एकत्र आणणे हे म्हणजे शिवधनुष्य उचलल्या प्रमाणे आहे.

या सगळ्यांना एकत्र आणू शकणार किंगमेकर म्हणजे प्रशांत किशोर 

मात्र त्यात एक अडचण म्हणजे त्या-त्या राज्यातील प्रादेशिक राजकारण कसे असेल त्यात हि आघाडी कितपत वर्क असेल हा हि तितकाच मोठा मुद्दा आहे. परंतु आपापल्या पक्षाचे वजन वापरून प्रत्येकाने प्रादेशिक राजकारणातील वाद आणि बाकी पक्षांसोबत, नेत्यांसोबत असलेले हेवेदावे विसरून सगळेजण या आघाडीत एकत्र येतील का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.