कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, ” प्रतिभाताई तुम आगे बढो” पण…

पुरुषप्रधान समाजाने स्त्री ने घर सांभाळावे अशी एक मर्यादाच घालून दिली ठेवली. पण जर स्त्रिया घर सांभाळू शकतात तर देश का नाही ? याच मर्यादेला छेद देत प्रतिभा ती पाटील या या रूढी मोडून स्वतःला त्या सर्वोच्च स्थानी नेलं होतं जे देशाच्या पहिल्या नागरिक होत्या…!

देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्याने प्रतिभा पाटील यांचा त्या पाच आशियाई महिला राष्ट्रपतींमध्ये सामावेश झाला. प्रतिभाताई यांच्या या यशामुळे आशियातील अपेक्षेपेक्षा कमी विकसित मानल्या जाणाऱ्या देशांतील महिला शक्तीचे प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ह्या बाबतीत आशियाने अमेरिकेला देखील मागे टाकले आहे.

जिथे लोकशाहीला दीर्घ इतिहास असूनही अजून कुणीही महिला राष्ट्रपतीपदावर पोहोचली नाही.

प्रतिभाताई यांच्या राष्ट्रपती बनण्यामुळे देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. ज्या दिवशी प्रतिभाताई च्या विजयाची घोषणा झाली त्या दिवशी साउथ एव्हेन्यू चा तो ११ क्रमांकाचा चहुबाजूंनी आनंदाने उल्हासित झाला होता.

प्रतिभाताई आता फक्त विदर्भाच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या प्रतिभा बनल्या होत्या.

परंतु विदर्भाच्या मातीमध्ये जन्मलेल्या आणि देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचलेल्या प्रतिभाताई संपूर्ण विदर्भाच्या सार्थ अभिमान आहेत. कारण त्याचं जन्मभूमीला त्यांनी कर्मभूमी बनवलं. त्यांनी विदर्भात केलेली कामं हे स्थानिक लोकं कधीही विसरणार नाहीत.

त्या राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाल्याच्या काही काळानंतर त्यांनी आपल्या कर्मभूमी अमरावतीला त्यांनी दौराही केला होता.

त्यांचे सर्वात महत्वाचे यश हेच होते कि, त्यांच्या यशामुळे विदर्भातील त्यातल्या त्यात अमरावतीमधील हर एक व्यक्ती आनंदाने बेहोष झाला होता. स्थानिक लोकं असं सांगतात कि तेंव्हा त्या प्रांतातील लोकांनी मिठाई वाटल्या होत्या.  तर कित्येकांनी त्यांचे सत्कार सोहळेही ठेवले होते.

सगळीकडे कसे उत्साहित वातावरण होते. विदर्भाची लोकंही तिथे थोडाही उशीर न करता तिथे पोहचले होते. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून लोकं त्यांना पाहायला, भेटायला आले होते. त्यांच्या माहेरचीच नाही तर सासर जळगावची मंडळी देखील तिथे उपस्थित होते.

त्यातल्या काहींनी घोषणा द्यायला सुरुवात केली,

त्यातली एक घोषणा ऐकून प्रतिभाताई चटकन उठल्या आणि त्यांना उत्तर दिलं.

ती घोषणा होती “प्रतिभाताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” ! हि घोषणा ऐकून प्रतिभाताई यांनी उत्तरल्या “तुमचं प्रेम मी समजू शकते पण मी सद्या देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहचले आहे त्यामुळे याच्या पुढे कोणतंच यश नाही. त्यामुळे याच्याही ‘आगे’ अजून तरी काही नाही”, असं म्हणून त्यांनी आपल्या जन्मभूमीवरील प्रेम आणि कार्यकर्त्यांबद्दल ची आपुलकी व्यक्त केली.

पण त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांना मात्र याची कल्पना नव्हतीच कि खरंच अजून याच्या पुढे अजून यशाची अशी कोणती पायरी नाही. पण जल्लोष-जल्लोषात कार्यकर्त्यांनी निरागसपणे ह्या घोषणा दिलेल्या नंतर त्यांच्याच लक्षात येऊन चुकलं होतं. मात्र ते जे बोलून गेले ते प्रतिभाताईंच्या प्रेमापोटी पटकन बोलून गेले होते..

तर अशाप्रकारे प्रतिभाताई जणू विदर्भाच्या गळ्यातलं ताईतच बनल्या होत्या.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.