PUB-G वर खरोखरच बंदी आल्या का..?
मारियोची गेम माहिताय का, अॅग्री बर्ड तरी, कॅण्डी क्रश सागा तरी माहिताय का बर ते पिकाचू पकडायला गल्लीबोळात हिंडलेला काय. नाव ठेवणारी लाख ठेवतील वो पण समाजासोबत चालणं म्हणतात ना ते हेच असतं प्रत्येक काळात प्रत्येक गेमबद्दल माहिती असलं पाहीजे.
माहित नसलेल्यांसाठी थोडी प्रस्तावना सादर करुन समुळ आर्टिकलला सुरवात करुया. तर PUB-G नावाचा एक गेम सध्या जगभरात हिट झालाय. विशेष काही नाही बंदुका, लाटणं, तवा अस जे असेल ते घेवून हाणामारी करायची अस या गेमच स्वरुप आहे. पॅराशूट घालून एका बेटावर उड्या टाकायच्या आणि एकमेकांना शिव्या देत राडा सुरू करायचां अस या गेमच स्वरुप असतय. त्यात सहभागी होणारे सगळे ऑनलाईन त्यामुळे दुसऱ्याचा मारल्याचा आनंद देखील काही औरच.
थोडक्यात, हि गेम हाणामारीची आहे. कमांडे टाईप.
आत्ता डिटेलींग. या गेमची मुळ कल्पना आहे ती एका जापनिज फिल्मची. बॅटल रॉयल अस त्या पिक्चरचं नाव. या पिक्चरमध्ये काय आहे तर एक शिक्षक एका बेटाव आपल्या १०० विद्यार्थांना सोडतात. एकमेकांचा खून करुन शेवटी एकजणच जिवंत राहणार असतो. आत्ता सांगणारे अस सांगतात की हा पिक्चर सुद्धा खऱ्या गोष्टींवर आधारित आहे. पण आपण इतक्यापण डिटेलमध्ये जायची गरज नाही.
तर या पिक्चरवरुन प्रभावित होवून द. कोरियाच्या ब्लुहोल कंपनीने हि गेम डेव्हलप केली. यामागे बेसिक आयडिया अशी होती की आर्मीच्या गेम अती झाल्या असल्या तरी मारामारी काय संपत नसते. मारामारीला जास्तीत जास्त लोकशाहीचं स्वरुप देवून ती लोकांची करणं. (हाण की बड्डीव). मग कपड्यांपासून इतर गोष्टींमध्ये प्रयोग करण्यात आले आणि PUB-G डेव्हलप केली. २०१७ सालात रिलीज करण्यात आली. सुरवातीच्या टप्यात मायक्रोसॉफ्टच्या Xbox one आणि Xbox Game preview रिलीज करण्यात आली. सप्टेंबर २०१८ च्या दरम्यान गेम Android आणि IOS वर आला आणि हिट झाला. (असो लय इतिहास आहे तुम्ही बोअर व्हाल वाचून).
आत्ता मेन मुद्दा गेमवर बंदी आल्या का ?
स्पष्ट आणि धडधडीत शब्दात सांगायच तर नाही. बंदी आल्या म्हणून दोन फोटो व्हायरल केले जात आहेत त्यातला हा पहिला फोटो. यात लिहलय महाराष्ट्रात बंदी आणण्यात आली आहे वगैरे वगैरे. आत्ता महाराष्ट्रात बंदी आहे आणि तुम्हाला माहित नाही. शक्यच नाही. असले फोटो बाहेर पसरवायसाठी होतं असतात. आत्ता या फोटोत “prejudge” हाय कोर्ट या नावाने नोटिस निघाल्याच सांगितलं आहे. भावांनो अशा नावाचं कोणतच पद नसतं.
आत्ता दूसरा मॅटर गुजरातचे पोलिस पबजी खेळणाऱ्याचे मोबाईल सील करत आहेत. तर या सील प्रकरणावर देखील तारिख, वार वगैरे असला काहीच प्रकार नाही. गुजरात पोलिसांनी देखील असल्या गोष्टींच खंडन केलय.
आत्ता राहता राहिला जनरल नॉलेजचा मुद्दातर अशी बंदी सरकार कवा आणतं जेव्हा त्यातून राडे चालू होतात. म्हणजे PUB G खेळून खेळून माणसं डेक्कन ते कर्वे पुतळ्यापर्यन्त तवा घेवून पळायला लागले किंवा मरिन ड्रायव्हवर पॅराशूटमधनं उड्या माराय लागले. दूसऱ्याच्या घरात शिराय लागले तर बंदी येवू शकत्या तुर्तास तशी काहीच लक्षण दिसत नसल्याने सुखात चाललय इतकच.
हे ही वाचा.
- फेसबुक घुमवणारे पाच प्रकारचे लोक, तुमचा नंबर कुठं लागतोय पहा !
- भाड्यानं घेतलेली डिव्हीडी परत करता आली नाही म्हणून त्यांनी NETFLIX उभा केलं !