पुण्यात सुरू झालेल्या रोल्समॅनियाने सगळ्या भारतात मार्केट खाल्लंय

उद्योगनगरी असलेल्या पुण्याला खवय्यांची नगरी म्हणून सुद्धा ओळखतात. इथं मोठ- मोठी हॉटेलं, प्रत्येक भागात एखादी खाऊ गल्ली नाहीतर रस्त्याला कडेला खाण्या-पिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी हमखास सापडतात.

आता कारण तर आपल्या प्रत्येकालाचं माहितेय, इथं बाहेरून शिकायला, नोकरीला येणाऱ्यांची संख्या जास्त त्यात अस्सल पुणेकरांच्या तोंडाला चटका काय कमी आहे. त्यामुळे हे शहरं हळूहळू खाद्यनगरी म्हणून वाढायला लागलयं.

आणि याचाचं फायदा घेत अनेक मंडळी पुण्यात येऊन खाण्याच्या व्यवसायात उतरायला लागलीत. त्यातलेचं तीन भिडू लोक पुनीत कंसल, गगन सियाल आणि सुखप्रीत सियाल. ज्यांनी आपल्या सगळ्यांचीचं इंस्टंट भूक भागवणारं रोल मॅनिया हे स्टार्टअप सुरू केलं. जे आज करोडोंची उलाढाल करतयं. ज्यांचे शॉप आपल्याला जागोजागी पहायला मिळतील. पण तुम्हाला माहितेय, या रोल मॅनियाची सगळ्यात आधी सुरूवात एका टेबल आकाराच्या किऑस्कवर झालेली.

2009 च्या आसपासची गोष्ट, पुणे हे खाद्य उद्योगासाठी एक वाढणारी बाजारपेठ होती. त्यात मूळ असणाऱ्या काठी रोलमध्ये नवनवीन व्हरायटी येत होत्या. मथुरेवरून आलेल्या पुनीतला ही चांगली ही संधी वाटली आणि तो या व्यवसायात उतरला.

सुरूवातीला 20,000 इन्वेस्ट करून त्याने मगरपट्टा भागातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर टेबल-आकाराचे किऑस्क चालवायला सुरुवात केली, ज्याच्यासोबत फक्त एक आचारी होता. पण काही वेळातच पुनीतच्या या रोल अड्ड्यावर लोकांची गर्दी व्हायला लागली. त्याचा हा छोटा व्यवसाय झपाट्याने वाढला होता.

पुनीतने आता हा व्यवसाय वाढवायचा म्हणून आपले दोन मित्र गगन सियाल आणि सुखप्रीत सियाल यांच्याशी चर्चा केली. त्यांना अख्ख्या प्लॅन समजून सांगितला. दोघांना पुनीतची आयडिया आवडली आणि हे दोघे पुनीतचे पार्टनर बनले.

या तिघांनी मिळून रोल्स मॅनियाची रजिस्टर, कंपनी म्हणून स्थापना केली आणि 2010 मध्ये त्याचे दुसरे आउटलेट उघडले. त्यानंतर पुनीतने व्यवसाय आणि त्याच्या वाढीवरवर लक्ष ठेवलं, तर सुखप्रीत सियालने फायनान्शियल सपोर्ट केला आणि गगन हा मार्केटिंगमध्ये हुशार आहे. गगन हा मार्केटिंगमध्ये हुशार आहे.

पुण्यातल्या तीन भिडूंच्या या रोल्स मॅनिया व्यवसायाने सगळ्यांचचं मार्केट गुंडाळून खाल्ल. हळूहळू हा व्यवसाय देशभर नेण्याची वेळ आली. व्हेज आणि नॉन-व्हेज अशा दोन्ही खवय्यांसाठी हेल्दी आणि पॉकेट-फ्रेंडली रोल्समध्ये त्यांनी नवनवीन चवी अॅड केल्या. ज्याला चांगलाचं प्रतिसाद मिळाला.

तेव्हा या तिघांनी फ्रेंचायझी मॉडेल्ससाठी आपल्या व्यवसायाचे दरवाजे उघडले आणि 30 शहरांमध्ये याच्या ब्रँच उघडल्या. म्हणजे 2016 पर्यंत ते चार वरून 20 स्टोअर्स पर्यंत गेले होते आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 2017 पर्यंत पुनीत आणि सियाल भावांचे 45 स्टोअर्स होते. आणि हळू हळू त्यांनी शंभरी सुद्धा गाठली, जो त्यांच्या व्यवसायातला आजपर्यंतचा सर्वात मोठा टप्पा होता

एका मुलाखतीत पुनीतने सांगितले की,

रोल्स मॅनिया ही सेल्फ फंडेड कंपनी आहे. रोल्स मॅनिया फ्रँचायझी घेऊन आमच्या कंपनीमध्ये विश्वास ठेवणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या आमच्या फ्रँचायझी पार्टनरला 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.‍‍ त्यात स्वयंपाक करण्यात घालवलेला  वेळे कमी केल्यामुळे क्वीक सर्विस रेस्टोरंट QSR क्षेत्र वाढत आहे. आणि रोल्स मॅनिया आउटलेट्स QSRs असल्याने, ग्राहकांना ऑनलाइन ऑर्डर करणे किंवा आम्हाला कॉल करून 30 मिनिटांत डिलीव्हरी मिळवणं सोपं वाटतं.

पुनीत सांगतो की, ऐन टायमाला जर कोणता डिलीव्हरी पार्टनर किंवा कर्मचारी आले नाहीत, तेव्हा आम्ही तिघांनी डिलीव्हरी दिली आहे. या व्यवसायात आता हजारो लोकं जोडली गेलीत, आणि अनेकांचे स्वतःचे रेस्टॉरंट उघडण्याचे स्वप्न पूर्ण झालयं. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या फ्रँचायझी मालकांपैकी 70 टक्के महिला आहेत.

सध्या रोल्स मॅनिया ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप वर तर आहेच, पण त्यांचं स्वत: चं Android आणि iOS वर रोल्स मॅनिया अॅप देखील उपलब्ध आहे. ज्यावरून ते इन्स्टंट डिलिव्हरी सर्विस देतात.

आताच्या घडीला पाहिलं तर देशभरात रोल्स मॅनियाचे १३० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. जे करोडोंची उलाढाल करतयं. आणि आता देशात सोबतच देशाबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्लॅन त्यांनी सुरू केलाय.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.