गांगुली म्हणाला होता, द्रविडमध्ये दम नाही..

दादा सौरव गांगुली आणि कोच ग्रेग चॅपेल यांच्यातील भांडण हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळे प्रकरण.

2005 साली जॉन राईट यांच्यानंतर भारताचा कोच कोण हा मुख्य प्रश्न होता.

कॅप्टन गांगुलीच्या आग्रहाखातर ऑस्ट्रेलियाचा माजी सुपरस्टार ऑल राऊंडर ग्रेग चॅपेलला कोच करण्यात आलं.

वाजत गाजत चॅपल साहेब कोच झाले, हवा केली मात्र अपेक्षित रिझल्ट काही देता आला नाही. मग अपयशाच खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडायच म्हणून चॅपेल साहेबांनी आपल्याला ज्यानं आणलं त्याच गांगुलीला गोत्यात आणलं.

भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू होता. गांगुलीला फॉर्म म्हणावा तितका चांगला नव्हता.

गांगुली शारीरिक दृष्ट्या व मानसिकदृष्ट्या फिट नाही. त्याला कॅप्टनशिप झेपत नाही, यामुळे त्याचा फॉर्म खराब झाला आहे. त्याने भारतीय टीमचे कर्णधारपद सोडावे

असा मेल गुरू ग्रेग चॅपेलने बीसीसीआयला लिहिला. प्रचंड वाद झाले. मीडिया मध्ये चर्चा झाली. टूरमध्येच गांगुली चॅपेल भांडणे झाली. गांगुलीने दौरा सोडून परत जाण्याची धमकी दिली, चॅपेलने राजीनामा देण्याच वक्तव्य केलं.

एकंदरीत भांडणे टोकाला पोहचली होती.

सिलेक्शन कमिटी मध्ये सुद्धा यावरून वाद झाले. याची परिणीती गांगुलीची कॅप्टनसी तर गेलीच पण पाठोपाठ त्याची टीम मधून सुद्धा गच्छंती झाली.

गांगुलीच्या जागी द वॉल राहुल द्रविड कॅप्टन बनला.

द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम परदेशात चांगली कामगिरी करू लागली. एकेकाळी भारतीय क्रिकेटचा महाराजा गांगुली आता निवृत्ती घेतोय की काय अस वाटू लागलं.

पण गांगुलीने एका इमोशनल जाहिरातमधून लोकांच्या हृदयाला हात घातला आणि मी पुन्हा येईनच आश्वासन दिलं.

आणि 2007च्या वर्ल्डकप वेळी तो परत आला देखील. तो वर्ल्ड कप म्हणजे भारतासाठी एक दुःखद स्वप्न ठरलं. पहिल्याच फेरीत आपण बाहेर पडलो. आपला अपमानास्पद पराभव झाला होता.

ग्रेग चॅपेलने भारतीय खेळाडूंच्या वागण्यावर वर्तवणुकीवर टीकास्त्र सोडले.

गांगुली,सेहवाग, हरभजन यांच्या बरोबरच कुंबळे, सचिन तेंडुलकरवर सुद्धा त्याने बोट उगारले.

देशभर खळबळ उडलीच होती.अखेर वर्ल्ड कप पराभवाच्या पार्श्वभूमीवर ग्रेग चॅपेल साहेबांना कोच पदावरून काढून ऑस्ट्रेलियाला परत पाठवण्यात आले.

भारतीय क्रिकेट इतिहासातील काळ्या प्रकरणावर पडदा पडला.

नंतर एकदा या विषयावर बोलताना गांगुलीने ड्रेसिंग रूममध्ये जे काय काय घडलं याची मीडियासमोर सविस्तर माहिती दिली. तेव्हा त्याने ग्रेग चॅपेल सोबतच द्रविड बद्दल ची आपली तक्रार सुद्धा उघड केली.

तो म्हणाला,

ग्रेग चॅपेल के कारण ड्रेसिंग रूम बिखरा हुआ था. राहुल द्रविड एक ऐसे इंसान है जिन्हे लगता है की सब कुछ अच्छा हो, मगर ऊस टीम मे सब गलत हो रहा था. मगर उनमें ये दम नहीं था की रिवोलट कर के बोले ये गलत हो रहा है.”

गांगुलीच्या म्हणणं होतं की झिम्बाब्वे दौऱ्यात आपल्या सोबत जे झालं ते बघून द्रविड घाबरला होता व ग्रेग चॅपेल चुकीचं करतोय हे दिसत असूनही काही बोलला नाही.

राहुल द्रविडने आपल्या सहकाऱ्यांची बाजू न घेतल्यामुळे भारतीय टीमचे खूप मोठे नुकसान झाले.

या मुलाखती वरून सरळ कळत होतं की गांगुली आणि द्रविडमधील संबंध सुद्धा बिघडले होते. त्याकाळात एका मॅचच्या आधी गांगुली, द्रविड आणि चॅपल यांचे वाद सुरू असलेला व्हिडीओ आजही इंटरनेटवर पाहायला मिळेल

गांगुलीच्या फॅन्सच तर म्हणणं होतं की दादाला टीममधून काढून टाकलं यामागे द्रविड होता.

पण गांगुलीने नंतर खुलासा केला,

मला नाही वाटत की, यात द्रविडची कोणतीही भूमिका राहिली असेल. असं होत असतं की, जेव्हा कोच काही सांगतो ते कर्णधाराला ऐकावं लागतं.

याचाच अर्थ ग्रेग चॅपेल हा यासगळ्यामागचा कळीचा नारद होता. सचिन ने देखील आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केलेला आहे.

द्रविड आणि गांगुली यांच्यातील वाद ग्रेग चॅपेलच्या गच्छंती नंतर मिटले. देशासाठी हे दोन्ही खेळाडू एकत्र आले आणि अनेक सामने जिंकून देखील दिले. आजही त्यांची मैत्री कायम आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.